एकूण 135 परिणाम
मे 29, 2019
प्रतिकूलतेवर मात करत कऱ्हाडची अनु झाली न्यायालयीन परीक्षेत उत्तीर्ण  कऱ्हाड - रविवार म्हणजे कऱ्हाडचा बाजार... आजही ती बाजारात भाजी विकत होती... वयाच्या दहाव्या वर्षापासून भाजी विकणाऱ्या अनुने कष्ट करत आज मोठे यश मिळवले. नुकत्याच झालेल्या न्यायालयीन भरती परीक्षेत तिची येथील न्यायालयात निवड झाली. अनु...
मे 12, 2019
पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर...
मे 09, 2019
येरवडा - वाघरी आणि शिकलगार समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. या समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश चेतन भागवत यांनी...
एप्रिल 15, 2019
महाराष्ट्रातील पालघर हा तसा सर्वात तरुण जिल्हा. पालघर जिल्ह्याचा बहुतांश भाग दुर्गम आणि आदिवासी पाड्यांचा. येथील आदिवासी संस्कृतीतील वारली चित्रकला, पारंपरिक गाणी-नृत्य तसेच खाद्य पदार्थ म्हणजे संपूर्ण देशाची शान ! अशा या जिल्ह्यातील माळकरी-पाडा या छोट्याशा वस्तीवरील मधुकर त्याच्या बहुविविध कौशल्य...
एप्रिल 11, 2019
पुणे - आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा तब्बल वीस वर्षांनी तेलुगू मडेलवार धोबी समाजात समावेश करून घेण्यात आला. याबाबत खडकी न्यायालयात दाखल असलेला खटला तडजोडीतून मिटविला. बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा बुधवारी समाजात समावेश करून घेण्यात आला. या वेळी महाराष्ट्र...
मार्च 11, 2019
बारामती - इस्माचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुष्काळग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळीची (मेस) सुरवात केली आहे. त्याचा फायदा मराठवाडा व दुष्काळी भागातील ४० विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने होणार आहे.   रोहित पवार यांनी महिला दिनाचे...
मार्च 08, 2019
महिला दिन 2019  तुर्भे  - रुग्ण सेवा ही ईश्‍वर सेवा आहे, असा ध्यास घेऊन अनेक डॉक्‍टर आज त्यांचे कार्य करत आहेत; पण त्याच्याही एक पाऊल पुढे टाकून कोपरखैरण्यातील एक डॉक्‍टर रुग्णसेविका घडवत आहेत. डॉ. विजया तांबे असे त्यांचे नाव आहे. नवी मुंबईतील नव्हे तर ठाणे, डहाणू, पालघर, भिवंडी,...
जानेवारी 21, 2019
हिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍वविक्रमाची लिम्का बुकमध्ये नोंद झाली आहे. वैष्णवी हिने खिळ्यांच्या फळीवर झोपून पाच मिनिटे २४ सेकंदांत एक टन वजनाच्या फरश्‍या फोडण्याचा विक्रम केला होता...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
डिसेंबर 04, 2018
नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
ऑक्टोबर 25, 2018
टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.  भारतीय सैन्यदलातील गजानन...
ऑक्टोबर 20, 2018
माळेगाव - बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापडलेल्या २३ वर्षीय परप्रांतीय मुस्लिम युवतीला अखेर येथील निर्भया पथकाच्या अथक प्रयत्नातून पुन्हा वडलांची छत्रछाया मिळाली. या घटनेतील मुलीचे नाव आहे अलिशा अमिदअली खातून (वय २३, रा. गोहालीभंगा, आसाम). अलिशा ही युवती अशिक्षित असून, ती १०...
ऑक्टोबर 02, 2018
रेठरे बुद्रुक - गाव करील ते राव काय करील, याची प्रचिती देत शेरेतील शेकडो तरुणांनी एकत्र येत ग्रामस्वच्छता अभियान राबवले. हातात फावडे, खोरे, खुरपे व बकेट घेऊन केवळ चार तासांमध्ये सर्वांनी गावातील कोपरा न्‌ कोपरा स्वच्छ करून दाखवला. पदवीधर तरुण, उच्चपदस्थ नोकरदार, महिलांसह, चिमुरडे व ज्येष्ठांचा या...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - वय वर्षे अवघे ऐंशी, या वयातही शिकण्याची ऊर्मी असलेल्या डॉ. विक्रम मेहता यांनी दुसरी पीएच.डी. नुकतीच पूर्ण केली आहे. शिक्षणाला वयाची अट आणि अडसर नसतो हेच डॉ. मेहता यांनी दाखवून दिले आहे. केवळ ‘पीएच.डी.’ करून ते थांबले नाही, तर आपल्या शिक्षणाचा समाजाला उपयोग व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत....
ऑगस्ट 22, 2018
राजगुरुनगर - रस्त्यावर फिरणाऱ्या एका मनोरुग्ण महिलेस महिलाश्रमामध्ये पोचविण्याच्या निमित्ताने राजगुरुनगरमधील काही सहृदय नागरिक पुढे आले आणि त्यातूनच निराधारांची सेवा करण्यासाठी हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. राजगुरुनगर येथे पुणे- नाशिक महामार्गावर, पेट्रोलपंपासमोर...
ऑगस्ट 07, 2018
नागपूर - यकृत निकामी होऊन मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या भावाला यकृताचा काही भाग दान करीत बहिणीने जीवनदान दिले. नागपुरातील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच लाइव्ह  लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी झाले आहे.  ऐन रक्षाबंधनाच्या पर्वावर भावाला मृत्यूच्या दारातून परत आणण्याचे अनमोल सत्कर्म बहिणीने यकृत...
ऑगस्ट 05, 2018
पुणे - वडिलांच्या निधनानंतर आईने भाजीपाला विकून परिस्थितीशी दोन हात केले. आईने घेतलेल्या कष्टाचे चीज करीत जिद्द अन्‌ मेहनतीच्या जोरावर नारायण केंद्रे हा सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट- सीए) बनला आहे. मूळचा लातूर जिल्ह्यातल्या आनंदवाडीचा असलेल्या नारायणने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हे यश मिळविले...
जुलै 28, 2018
पिंपरी - जन्मतःच कोणी गुन्हेगार नसते, परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. मात्र, त्यांचे मन परिवर्तन झाल्यास तेही सुखी आयुष्य जगू शकतात. या विश्‍वासाने निगडीतील भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बाहेती हे महाराष्ट्रातील विविध कारागृहात जाऊन प्रबोधन करत आहेत.  डॉ. बाहेती "आकाश भरारी' या पसायदानावरील...