एकूण 331 परिणाम
जुलै 19, 2019
पुणे - स्वच्छतेबाबत बेजबाबदारपणा दाखविणाऱ्यांविरोधात आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कचरा साठल्याने महात्मा फुले मंडईतील सतीशशेठ मिसाळ वाहनतळाच्या ठेकेदाराला त्यांनी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. तसेच, रस्त्याची सफाई न झाल्याने महापालिकेच्या...
जुलै 18, 2019
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याच्या कामाला विलंब होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर एक एप्रिल पासून काम पुर्ण होईपर्यंत दंड आकारण्याचा निर्णय स्मार्ट सिटी कंपनीने घेतला असून त्यानुसार प्रतिदीन 36 हजार रुपये दंड आकारला जाणार असून 15 ऑगष्ट पर्यंत काम...
जुलै 18, 2019
पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांच्या धोकादायक झालेल्या वसाहतींचे "बांधा वापरा आणि हस्तांतरित करा' (बीओटी) तत्त्वावर पुनर्विकसन करण्यास विरोध होतो. हे लक्षात घेऊन या वसाहतींच्या पुनर्विकासासंदर्भात नवीन धोरण तयार करावे, असा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका प्रशासनाला...
जुलै 18, 2019
पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांना अधिकाधिक सुविधा कशा देता येतील, पीएमपीच्या उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील, बसच्या देखभाल-दुरुस्तीचे नियोजन डेपोनिहाय कसे करता येईल, मनुष्यबळाचा वापर योग्य पद्धतीने कसा करता येईल आदींबाबत मार्गदर्शक ठरेल असा पुढील पाच वर्षांसाठीचा ‘बिझनेस प्लॅन’...
जुलै 18, 2019
मुंबई - मुंबईत अनधिकृत बांधकामे फोफावली असून, महापालिकेकडे तक्रारींचा ओघ वाढला आहे. गेल्या तीन वर्षांत महापालिकेकडे ९४ हजार ८९१ तक्रारी आल्या; त्यापैकी पाच हजार तक्रारींची दखल घेण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी अवैध बांधकामांवर तत्काळ...
जुलै 17, 2019
पिंपरी - शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर पूर्ण माफ करावा. एक हजार चौरस फुटांच्या पुढील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफीचा निर्णय होत नाही, तोपर्यंत निवासी, वाणिज्य व औद्योगिक कारणांसाठीच्या बांधकामांचा शास्तीकर वगळून केवळ मूळ मिळकतकर स्वीकारण्यात यावा. लघू उद्योजकांकडूनही मूळ मिळकतकरच स्वीकारावा,...
जुलै 16, 2019
मुंबई : भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्या राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज (मंगळवार) करण्यात आल्या. यामध्ये पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली. तसेच सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे...
जुलै 13, 2019
मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा...
जुलै 13, 2019
पिंपरी - पावसाळ्यातील पहिल्या चार दिवसांतच ‘स्मार्ट सिटी’ची ओळख खड्डेपुरम झाली आहे. शहरातील एकही रस्ता असा राहिलेला नाही, की त्यावर खड्ड्यांचे जाळे नाही. वाहनचालक व पादचाऱ्यांना रस्ते म्हणजे मरणयात्रेवरील प्रवास वाटू लागला आहे. पावसात खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि रस्ते कोरडे झाल्यावर खड्ड्यांना...
जुलै 11, 2019
पुणे - पुणेकरांच्या सुरक्षिततेच्या ‘देवदूत’ योजनेतील गैरव्यवहार अंगलाट येत असतानाच महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनुने यांचा खुलासा खोटा असल्याचे बुधवारी (ता. १०) पुन्हा दिसून आले. ‘देवदूत’ची वाहने ज्या कंपनीची आहेत, त्या कंपनीच्या सर्वच वाहनांना निर्मितीपासूनच ‘मर्सिडिज...
जुलै 11, 2019
पुणे - शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाचे (एचसीएमटीआर) भूमिपूजन जूनअखेर करण्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा हवेतच विरली आहे. यासाठीच्या निविदा अजूनही छाननी प्रक्रियेत अडकल्या आहेत. त्यामुळे त्या स्थायीला सादर होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्यासाठी अजून बराच...
जुलै 10, 2019
मुंबई : मुंबईतील अनधिकृत ठिकाणी रस्त्याच्या कडेला मुंबईकरांनी आपली वाहने पार्क केली होती. अशा वाहनांवर बृहन्मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या तीन दिवसांत महापालिकेने 243 वाहनांवर कारवाई केली असून सुमारे साडे आठ लाख रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती पालिका...
जुलै 10, 2019
पुणे - पुणे महापालिकेच्या ‘देवदूत’ योजनेची चाके आणखी खोलात गेल्याचे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांसमोर केलेल्या खुलाशावरून स्पष्ट झाले आहे. ‘देवदूत’च्या वाहनांना ‘मर्सिडीज बेंझ’चे इंजिन असल्याने या वाहनांसाठी मूळ किंमत म्हणून एक कोटी ८४ लाख रुपये दिले...
जुलै 08, 2019
मुंबई - बेस्टचे पहिल्या पाच किलोमीटरसाठी 5 रुपये दर मंगळवार(ता.9)पासून लागू झाले आहेत.तर,आता पर्यंत पहिल्या दोन किलोमीटरच्या टप्प्यासाठी 8 रुपये किमान तिकीट होते.नव्या तिकीट दरानुसार बेस्टचे जास्तीत जास्त तिकीट 20 रुपये असेल.मात्र,यात हाफ तिकीट मिळणार नाही.  बेस्टला तोट्यातून बाहेर...
जुलै 08, 2019
नाशिकः जुन्या नाशिकमधील काझीगढीवासीयांच्या पुनर्वसनासाठी चुंचाळे शिवाराचा पर्याय सुचविण्यात आला आहे. चुंचाळे येथील घरकुले ताब्यात देऊनही तेथे वास्तव्याला न गेलेल्या नागरिकांची कागदपत्रे तपासून काझीगढीवासीयांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची तयारी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी...
जुलै 08, 2019
महापालिकेकडून 81 लाखांच्या वाहनांची 11 कोटींना खरेदी; शोरूम प्राइज व खरेदीत मोठी तफावत  पुणे - महापालिकेच्या "देवदूत' योजनेतील एका वाहनाची किंमत (शोरूम प्राइज) आजघडीला साडेतेरा लाख रुपये आहे. परंतु, हेच वाहन महापालिकेने दोन वर्षांपूर्वी तब्बल 1 कोटी 84 लाखांत खरेदी केल्याच्या नोंदी सापडल्या आहेत....
जुलै 07, 2019
पुणे - आपत्ती निवारणाच्या तब्बल ५३ कोटी रुपयांच्या ‘देवदूत’ वाहनांची खरेदी वादग्रस्त ठरत असतानाच, या योजनेवर आता आणखी ८१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ‘देवदूत’ची कामगिरी योग्य असल्याची शाबासकी देत, पावणेनऊ कोटी रुपयांचे एक अशी नऊ वाहने खरेदी करण्याबाबतचे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी ...
जुलै 04, 2019
पिंपरी -  नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली निवासी बांधकामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचा फायदा शहरातील सुमारे 40 हजार कुटुंबांना अर्थात दीड लाखाहून अधिक नागरिकांना होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  भोसरी, मोशी, चिखली, निगडी,...
जुलै 03, 2019
मुंबई  - मुसळधार पावसातही मुंबई तुंबली नसल्याच्या महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या दाव्यानंतरही शिवसेना नेत्यांनी ‘धाडसी’ वक्तव्ये करणे सुरूच ठेवले आहे. ‘मालाड येथील दुर्घटना म्हणजे महापालिकेचे अपयश नसून, मोठ्या पावसामुळे घडली आहे,’ असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी...