एकूण 355 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या इडली विक्रेत्याचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द-वाशी स्थानकांदरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.  मानखुर्द येथे राहणारा 19 वर्षाचा चुलबुल कुमार हा इडली...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : दिवाळी सण तोंडावर आला असून महिलावर्गाला घर साफसफाईचे वेध लागले आहेत. सणाच्या तोंडावर नेमक्‍या निवडणुका आल्या. त्यात घरकाम करणाऱ्या बहुतांश महिला या प्रचारासाठी जात असल्याने घरकामासाठी कामगार महिला मिळेनाशा झाल्या आहेत. निवडणूक प्रचार काळात कामगार महिला सुट्टीवर गेल्याने आधीच घरातील रोजच्या...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई : दिवाळी जवळ आली की घराघरातून भाजणीचा खमंग वास दरवळू लागतो. चकलीच्या भाजणीबरोबरच रवा, बेसन, करंजीचे पुरण तयार करण्यात गृहिणी मग्न होऊन जातात. नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या महिलांना मात्र कामाच्या व्यापातून फराळ तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्यांचा कल...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात कोकण अव्वल; भंडारा, गोंदिया, नवापूरचाही समावेश मुंबई - प्रगतिशील व पुरोगामी महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ १३ मतदारसंघांतच पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असून, त्यात कोकणातील नऊ विधानसभा मतदारसंघ असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ तसेच...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : आंदोलनात सहभागी झाल्याने सेवा समाप्त केलेल्या होमगार्ड जवानांना थेट सेवेत घ्यावे, असे आदेश शासनाने दिले होते. त्या आदेशाला होमगार्ड महासमादेशकांनी केराची टोपली दाखवीत मैदानी चाचणी घेण्याची अट घातली आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या होमगार्ड जवानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यानिमित्ताने...
ऑक्टोबर 13, 2019
पोलिसांसमोर आव्हान : चैनस्नॅचिंग, विनयभंगाच्या प्रकारांमध्ये वाढ  नाशिक : एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधुम तर दुसरीकडे ऐनसणासुदीचा काळ असताना, शहरातील महिलांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी दहशत पसरविली आहे. गेल्या 12 दिवसांमध्ये 10 सोनसाखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या असून यातील एकाही गुन्ह्याची...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : महिलांनी बाळंतपणाच्या काळात योग्य ती काळजी घ्यावी; अन्यथा भविष्यात त्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वरवर निरोगी दिसणारी स्त्री ही शारीरिक दृष्टीने निरोगी असतेच असे नाही. यासंदर्भातही विचार करण्याची आवश्‍यकता आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्री-रोगतज्ज्ञ व येरळा मेडिकल...
ऑक्टोबर 11, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून जास्तीत जास्त मते मिळवण्यासाठी उमेदवार प्रचार रॅली काढून मतांचा जोगावा मागत आहेत. या प्रचार रॅलीमध्ये पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत नसल्याने उमेदवारांकडून प्रचारार्थ महाविद्यालयीन तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, महिलांचा...
ऑक्टोबर 11, 2019
पौडरस्ता - हागणदारीमुक्तची चर्चा सगळीकडे असली तरी कोथरूडमधील लक्ष्मीनगर मात्र अद्यापही त्यापासून दूरच आहे. पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होत असून, त्यांना नाईलाजाने बाहेर जावे लागते. आरोग्य निरीक्षक व मोकादम यांनी स्वच्छतागृहांची पहाणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे...
ऑक्टोबर 08, 2019
पुणे महापालिकेच्या एसआरए व  बीएसयूपी योजनेंतर्गत मिळण्याची शक्यता पुणे - पुरात बेघर झालेल्या झोपडीधारकांना महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) आणि आर्थिक दुर्बल घटकांच्या योजनेत (बीएसयूपी) घरे मिळण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी झोपडीधारकांचा रहिवासी पुरावा, घराची नोंद आदी बाबी तपासण्यात...
ऑक्टोबर 07, 2019
सोलापूर : अर्धनग्न तान्हुल्या मुलांना कडेवर घेतलेल्या महिला... एका पायाने दिव्यांग असलेली तरुणी... दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी... एक हात नसलेला वृद्ध... हे चित्र आहे सोलापुरातल्या प्रमुख चौकांतील. नगर जिल्ह्यातून आलेल्या भिकाऱ्यांच्या टोळीने सिग्नलवर ठिय्या मांडला आहे. शारीरिक अपंगत्वाचा...
ऑक्टोबर 07, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील किल्ले गावठाण बेलापूर येथील पुरातन अशा पेशवेकालीन श्रीगोवर्धनी माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  श्रीगोवर्धनी माता मंदिरात हळदी-कुंकू समारंभ तसेच पारंपरिक वेशभूषा, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते...
ऑक्टोबर 06, 2019
मुंबई : जागतिक आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक स्पर्धेतील एकाही प्रकारात भारतीय महिलांना अंतिम फेरी गाठता आली नाही; त्यामुळे त्यांच्या ऑलिंपिक पात्रतेच्या आशा दुरावल्या आहेत. या स्पर्धेतून तरी त्यांना ऑलिंपिक पात्रता गवसणार नाही. महिलांच्या सर्वांगीण क्रमवारीत प्रणती नायक 127 वी; तर प्रणती...
ऑक्टोबर 06, 2019
नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका देवीचा यात्रोत्सव सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासून शहर-परिसरातील भाविक महिलांची गर्दी होते आहे. त्यातच ऑक्‍टोबर हिटच्या तडाख्याने रांगेत उभ्या असलेल्या भाविक महिलांची तहान मुंबई नाका पोलिसांनी भागविली. दर्शनासाठी रांगेत ताटकळत भर...