एकूण 131 परिणाम
मार्च 01, 2017
मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी शिवसेनेबाबतची भूमिका कॉंग्रेस स्पष्ट करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मंगळवारी येथे केले. तटकरे म्हणाले, की जिल्हा परिषद सत्तेमध्ये कॉंग्रेस व आम्ही एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू...
मार्च 01, 2017
नाशिक - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षातील संबंध ताणल्यामुळे अनिश्‍चिततेची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सत्तेचे गणित जुळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही मोर्चेबांधणीस सुरवात करून या अनिश्‍चितेचा फायदा उठविण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 28, 2017
औरंगाबाद - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत "पतंग' कटला असला तरी दहा महापालिका निवडणुकीत त्यांनी 25 नगरसेवक निवडून आणले आहेत. नांदेड, औरंगाबाद महापालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळविल्यानंतर राज्यातील इतर महापालिकांतसुद्धा या...
फेब्रुवारी 28, 2017
शेतकरी कर्जमाफीवरून भाजपची सत्त्वपरीक्षा मुंबई - विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सहा मार्चपासून सुरू होत असताना भाजप सरकारची मात्र या अधिवेशनात कसोटी लागणार आहे. मुंबई महापालिका सत्तास्थापनेत भाजपने शिवसेनेला लक्ष्य केल्यास अधिवेशनात शिवसेना आमदार...
फेब्रुवारी 28, 2017
शिवसेनेचा निर्णय दोन दिवसांत मुंबई - महापालिकेतील समित्यांमध्ये पाच वर्षे सुरळीत कारभार करण्यासाठी मनसेची मदत घ्यावी की राष्ट्रवादी कॉंग्रेसची, यावरून शिवसेनेत सध्या खल सुरू आहे. याबाबत दोन दिवसांत शिवसेनेकडून निर्णय होण्याची शक्‍यता आहे. सध्याच्या संख्याबळावर शिवसेना महापौर...
फेब्रुवारी 28, 2017
जिल्हा परिषद निवडणूक; राष्ट्रवादी दुसऱ्या, तर कॉंग्रेस तिसऱ्या स्थानावर मुंबई - नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा 46ने कमी झाल्या असल्या तरी भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मतांच्या टक्‍केवारीत केवळ 2.66 टक्‍क्‍यांचाच फरक...
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने...
फेब्रुवारी 26, 2017
नांदेड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शंकरराव चव्हाण पुण्यतिथीनिमित्य रविवारी (ता. २६) शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयास भेट देऊन पाहणी केली. या वेळी पवार यांच्यासमवेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती कॉंग्रेसचे...
फेब्रुवारी 26, 2017
नागपूर - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्य सरकाराला अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत असल्याने मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करणेच योग्य राहील, असे मत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. मुंबई महापालिकेच्या...
फेब्रुवारी 25, 2017
शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यासच कॉंग्रेस विचार करणार मुंबई - राजधानी मुंबईवर सत्ता स्थापन करण्याच्या शिवसेना - भाजपमधील स्पर्धेचे पडसाद राज्याच्या सत्तेवरदेखील पडण्याची शक्‍यता आहे. मुंबईत शिवसेनेच्या महापौरपदाला पाठिंबा द्यावा का, यावर कॉंग्रेस नेत्यांचा विचार सुरू...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे 98 उमेदवार निवडून आले असले, तरी तब्बल 50 जागांवर पक्षाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे 162 पैकी तब्बल 148 जागांवर भाजपचे लक्षणीय अस्तित्व असून, एका "धक्‍क्‍याने' भाजपच्या धावफलकात मोठी भर पडू शकली असती. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 52...
फेब्रुवारी 25, 2017
मुंबई - महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या जबाबदाऱ्या चोख सांभाळत भाजपला यश मिळवून दिल्याबद्दल मंत्री गिरीश महाजन, संभाजी निलंगेकर, डॉ. रणजीत पाटील यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूष आहेत. हे सर्व मंत्री फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. या मंत्र्यांबरोबरच...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - प्रतिस्पर्ध्यांबरोबरील लढाई झाल्यावर आता महापौरपदासह महापालिकेतील अन्य विविध पदांसाठीची स्पर्धा नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याबाबतच्या घडामोडी येत्या आठ दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, महापौर-...
फेब्रुवारी 24, 2017
पुणे महापालिकेतील कॉंग्रेसची बावीस वर्षांची राजवट 2007 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने संपुष्टात आणल्यानंतर पुणे पॅटर्नच्या नावाने स्थापन झालेल्या त्या पक्षाबरोबरच्या आघाडीत भारतीय जनता पक्ष सहभागी झाला होता. आता त्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसला चितपट करीत भाजप पुण्यात सत्ताधारी झाला आहे. गेल्या पंचवीस...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका आणि पंचवीस जिल्हा परिषदांतील भाजपची प्रगती ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू ठेवलेल्या पारदर्शी, भ्रष्टाचारमुक्‍त आणि प्रामाणिक कारभाराला दिलेली जनतेची पसंती आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. मुंबई...
फेब्रुवारी 24, 2017
शहरांसह ग्रामीण भागांत भाजपच; दोन्ही कॉंग्रेसना फटकामुंबईत वाघाच्या काळजात "कमळ' घुसले मुंबई - राज्यातील स्थानिक संस्था निवडणुकांत भाजपच्या "पारदर्शक' कारभाराला मतदारांनी जोरदार पसंती देत मुख्यमंत्र्यांच्या "हा माझा शब्द आहे,' या वचनावर विश्‍वास ठेवत "परिवर्तन' करून दाखविले....
फेब्रुवारी 24, 2017
नवी मुंबई - पनवेलमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजपच्या उमेदवार वैशाली ठाकूर व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते प्रकाश शिवकर यांनी एकमेकांच्या श्रीमुखात लगावली. दोघांनी परस्परविरोधी तक्रार दिली असून, शिवीगाळ व हाताने मारहाण केल्याबाबतचे गुन्हे दाखल...
फेब्रुवारी 24, 2017
पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक चेहऱ्यांना पसंती; कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेची आघाडी मुंबई - कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आठ वॉर्डात शिवसेनेला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले, तर स्वबळावर लढणाऱ्या भाजपची पाटी कोरी राहिली. शिवसेनेची मक्तेदारी असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेस...
फेब्रुवारी 24, 2017
मुंबई - मुंबईत शिवसेना-भाजप दोघेही सत्तेच्या जवळ आल्याने महापालिकेत सत्ता कोणाची याचे उत्तर लगेच देणे कठीण आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यापैकी कोणता पक्ष शिवसेना किंवा भाजपला पाठिंबा देतो वा तटस्थ राहतो, यावर सत्तेचे गणित अवलंबून आहे. दोन्ही कॉंग्रेस तटस्थ राहिले; तर...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...