एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 14, 2018
शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली, त्याला एका तपाहून अधिक काळ लोटला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 1987 मध्ये मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघातील पोटनिवडणुकीत हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. त्यामुळे राज यांनी आपल्या सेनेस शिवसेनेच्या मूळच्या...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि कुठल्या कुठे झेप...
ऑक्टोबर 16, 2017
मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे भाजपने आकांडतांडव करण्याचे काहीच कारण नव्हते. पण, उद्धव यांच्या या अनपेक्षित खेळीमुळे या तथाकथित मित्रपक्षांचे संबंध विकोपाला गेल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या धक्‍कातंत्राबद्दल प्रसिद्ध होते आणि त्यांनी...
सप्टेंबर 11, 2017
छोट्या महापालिकांमध्ये महापौर थेट जनतेतून निवडण्याचा सरकार विचार करीत आहे. पण खरा मुद्दा हे प्रतिष्ठेचे पद शोभेचेच राहणार की महापौरांना काही प्रशासकीय अधिकार मिळणार, हा आहे.    नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेतून निवडण्याच्या निर्णयानंतर आणि या पद्धतीमुळे नगराध्यक्ष निवडणुकांत मिळालेल्या भरघोस यशानंतर...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
मार्च 25, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलक्षण विकासवाद आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे विचक्षण नियोजन अशा दुहेरी शक्‍तीचा संयोग असतानाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तब्बल ६३ जागा जिंकल्या. शिवसेनेने चिवट लढाई दिली. अशा लढवय्या पक्षाचे आज काय झाले आहे? मुंबई आणि ठाणे ...
मार्च 15, 2017
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळवलेला दणदणीत विजय आणि गोवा व मणिपूर या राज्यांत बहुमत नसतानाही सरकार स्थापनेच्या दिशेने सुरू झालेल्या हालचाली! "अच्छे दिन...अच्छे दिन!' म्हणजे भारतीय जनता पक्षाला आणखी काय हवे होते? मात्र, महाराष्ट्रातील तथाकथित मित्र पक्ष म्हणून मिरवणाऱ्या शिवसेनेने भाजपच्या...
मार्च 09, 2017
शेतकऱ्यांचे नष्टचर्य, शेतीचे हाल, त्यातून ग्रामीण भागावर पसरलेले दैन्य-दारिद्र्याचे मळभ हे तात्कालिक राजकारणापलीकडचे गंभीर विषय आहेत. तेव्हा त्यावर कायमस्वरूपी उपाय सापडेपर्यंत कर्जमाफीच्या मागण्या आणि त्यावरचा विचार अनिवार्य आहे. कांद्याचे कोसळलेले भाव आणि तूरखरेदीच्या प्रश्‍नांकडे लक्ष...
मार्च 06, 2017
अखेर अपेक्षेप्रमाणेच मुंबईच्या सुप्रतिष्ठित महापौरपदावरून शिवसेनेशी ‘राडा’ करण्याचे भारतीय जनता पक्षाने टाळले! महापालिकांच्या निवडणुकांत झालेल्या प्रचंड अकटोविकट आरोप-प्रत्यारोपांनंतर मुंबईत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकूनही हा असा माघारीचा निर्णय घेणे, भाजपला भाग पडले असले तरी, तो घेताना देवेंद्र...
मार्च 02, 2017
महाराष्ट्रात गेले महिनाभर सुरू असलेल्या ‘मानापमान’ नाटकाच्या प्रयोगावर अखेर पडदा टाकला, तो गेल्या आठवड्यात राज्यातील २५ जिल्हा परिषदा, तसंच १० महापालिकांच्या निकालांनी! या निकालांत कोण जिंकलं आणि कोण हरलं, यापेक्षाही महत्त्वाची बाब अर्थातच होती ती मुंबईच्या महापौरपदाच्या शर्यतीची... पण रंगदेवतेनं...
फेब्रुवारी 24, 2017
भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील दहा महापालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत राज्यभरात जोरदार मुसंडी मारली आहे! या विजयाचे निर्विवाद श्रेय फडणवीस यांचेच आहे; कारण पायाला चाके लावल्यागत ते गेले महिनाभर राज्यभरात फिरत होते. एकीकडे...
फेब्रुवारी 24, 2017
महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल म्हणजे लोकसभा व विधानसभा मिरवणुकींची झेरॉक्‍स प्रत ठरली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला पाठिंबा मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. या वाटचालीत भाजपची लोकप्रियता वाढली. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा उदय विरोधी पक्ष म्हणून झाला. ही अवस्था या...
फेब्रुवारी 22, 2017
दहा महापालिका व २६ जिल्हा परिषदा यांची सत्ता काबीज करण्यासाठी झालेल्या निवडणुका मुद्द्यांऐवजी गुद्यांवरच लढवल्या गेल्या! आता निकालांनंतर राज्यात राजकीय उलथापालथ होते काय, हा लाखमोलाचा प्रश्‍न आहे. संपूर्ण देशाच्या राजकारणाला नवे वळण देण्याची ताकद असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी उत्तर...
फेब्रुवारी 13, 2017
देशाच्या पातळीवर पाच राज्ये आणि महाराष्ट्रात महापालिका-जिल्हा परिषदांच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचे "सुपर मार्केट' जोरात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत डॉ. मनमोहनसिंग यांना उल्लेखून समोर आणलेला बाथरूममध्ये अंघोळ करताना वापरायचा "रेनकोट', त्यावरून संतापलेला कॉंग्रेस...
फेब्रुवारी 06, 2017
इच्छुकांची अनावर गर्दी, त्यातून उफाळणारी बंडखोरी आणि सर्वच पक्षांनी साधनशूचितेला दिलेली तिलांजली, यांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नागरी हिताचे प्रश्‍न मात्र अडगळीत गेले आहेत.  महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने इच्छुकांनी भरवलेली तुफानी गर्दीची "जत्रा'...
जानेवारी 28, 2017
युती तोडण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देऊ शकतो; शिवाय ही शिवसेनेबरोबरच भाजपचीही सत्त्वपरीक्षा आहे.   भारतीय जनता पक्षाशी सव्वादोन वर्षे सुरू असलेल्या हमरीतुमरीचे रूपांतर महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रणकंदनात झाल्यानंतर या असलेल्या, नसलेल्या किंवा...
जानेवारी 21, 2017
मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी युतीत मानापमान नाट्याचे नवे प्रयोग सुरू झाले आहेत. पंधरा वर्षांनी सत्तेत परतलेल्या भाजप- शिवसेना युतीच्या संबंधांचे संदर्भ पार बदलले आहेत. संख्याबळात तर बदल झालेला आहेच, शिवाय धाकटेपणा सांभाळण्याची भाजपची गरज संपली आहे....
जानेवारी 17, 2017
महाराष्ट्रातील सत्तांतरानंतरच्या काळात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमधील लोकमत आजमावले जाणार असल्याने महापालिका व जिल्हा परिषदांसाठी होत असलेल्या निवडणुकांचे महत्त्व विशेष आहे. या स्थानिक आखाड्यातील राजकीय मुद्दे, डावपेच, आघाड्या, नेतृत्वाचे अग्रक्रम, सामाजिक समझोत्यांचे अग्रक्रम...
जानेवारी 12, 2017
राज्यातील दहा महापालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका कमालीच्या चुरशीच्या होतील अशीच चिन्हे आहेत. एका अर्थाने ही सर्वच राजकीय पक्षांची २०१९ मध्ये होणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या आधीची पूर्वपरीक्षाच आहे, असे म्हणता येईल. सा ऱ्या देशाचे लक्ष उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक आणि...