एकूण 15 परिणाम
मार्च 13, 2019
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेपुढे असलेले आव्हान हे भारतीय जनता पक्षाशी अखेर ‘भूतो न भवति’ अशा वादंगानंतर झालेल्या ‘युती’नंतरही कायम आहे. त्याचे कारण या निवडणुकीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विश्‍वासार्हतेवरच मोठे प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. शिवसेनेने आपली पहिली-वहिली लोकसभा निवडणूक...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 23, 2019
राज्यात विरोधी पक्ष म्हणून २०१४ पर्यंत शिवसेनेचाच मान होता. भाजप हा शिवसेनेच्या मागे राहून राजकारण करणारा पक्ष अशी ओळख होती. शिवसेनेवर एकही शब्द बोलण्याची हिंमत भाजपचे नेते करत नव्हते. मुंडे, महाजन असताना युतीत कितीही वाद झाले, तरी ते विकोपाला जाऊ दिले जात नव्हते. बाळासाहेबांच्या इशाऱ्यावर भाजप...
जानेवारी 19, 2019
निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा "ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा हा रजतमार्ग किती फळतो ते पाहावे लागेल.  बॉलिवूड, अंडरवर्ल्ड आणि शिवसेना या परदेशातून किंवा परकी नजरेतून मुंबईकडे पाहणाऱ्या अभ्यासकांच्या तीन आवडत्या...
नोव्हेंबर 25, 2018
अयोध्येतील निर्वासित रामाचे दर्शन घेऊन शिवसेनेची चतुरंगसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात कर्मभूमी महाराष्ट्रात, मुंबईत परतली आहे. गेली तीन वर्षे सतत मानहानी स्वीकाराव्या लागलेल्या छोटे सरकार होऊन बसलेल्या या पक्षाला अयोध्यास्वारीमुळे कित्येक दिवसांनी सकारात्मक प्रसिद्धी खेचता आली. चलो...
मे 14, 2018
आजवर डोकेदुखी ठरलेले शिवसेनेचे राजकारण कुरघोडीचेही असू शकते हे भाजपला पालघरमधील पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रथमच जाणवले आहे. तेथील शिवसेनेची आगळिक भाजपच्या जिव्हारी लागली आहे. राजकारणात टायमिंग साधणे महत्त्वाचे असते. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा स्वयंघोषित आवाज असलेल्या शिवसेनेला उण्यापुऱ्या चार...
फेब्रुवारी 23, 2018
पुण्यात राज ठाकरे यांनी घेतलेल्या महामुलाखतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ही मुलाखत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. एक तर दोन पिढ्यांमधील आणि दोन विचारांमधील तो संवाद होता. हि मुलाखत संपली आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या. त्याच शिवसेनेचे...
मार्च 26, 2017
परिवर्तनाचे कितीही ढोल वाजवले, हाकारे दिले तरी जिल्हा परिषदांचे निकाल सांगतात, की ग्रामीण भागातली परंपरागत सत्ताकेंद्रं शाबूत आहेत. पक्षांचे झेंडे थोडे इकडचे तिकडं झाले असले तरी गढ्या, त्यांचे बुरूज कायम आहेत. मिनी मंत्रालयांच्या सत्तासुंदरीला त्या जुन्या गढ्यांच्या ओसाड भिंतींचंच आकर्षण अजूनही आहे...
फेब्रुवारी 26, 2017
महाराष्ट्राच्या राजकारणाला केवळ कलाटणीच देणारे नव्हे, तर संपूर्ण राजकारणाची ‘कूस’ बदलून टाकणारे निकाल १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांमध्ये दिसले आहेत. ‘कमळा’च्या विजयी झंझावातानं आता राज्याच्या राजकारणात ‘देवेंद्रपर्वा’ची मजबूत उभारणी झाल्याचं शिक्‍कामोर्तबच केलं आहे. या यशाचं नक्की इंगित काय...
फेब्रुवारी 23, 2017
मुंबई व ठाण्याचा गड राखत शिवसेनेने पर्यायाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्विवाद बाजी मारली आहे. या यशाने त्यांच्या नेतृत्वावर प्रथमच खऱ्या अर्थाने शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळची निवडणूक ठाकरे व शिवसेनेच्या दृष्टीने कमालीची महत्वाची होती. एका अर्थाने त्यांची ही लिटमस टेस्टच होती....
फेब्रुवारी 10, 2017
राजकारणाच्या आखाड्यात दोन वजनदार मल्ल उतरले असले तरी ते कडवी झुंज देणार नाहीत. त्यांची ही नुरा कुस्तीच असल्याचे दिसून येते. नाही तरी राज्यात भाजप, शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद आहे. त्यांचेही काही हक्काचे मतदारसंघ आहेत. ते उखडून टाकण्याची हिम्मत शिवसेनेत नाही. त्यामुळे युती...
फेब्रुवारी 05, 2017
दादू आणि राजादोन भाऊ शेजारी, भेट नाही जन्मभरी, सांगा रे कोण? हे महाराष्ट्रातल्या मुलांना विचारले जाणारे कोडे. त्याचे उत्तर म्हणजे डोळे; पण आताच्या पिढीतल्या एखाद्या राजकीय समज असलेल्या मुलाने या कोड्याचे उत्तर उद्धव आणि राज असे दिले, तर वाईट वाटून घेऊ नका. दोघेही राजकीयदृष्ट्या आता जवळ येणार...
जानेवारी 31, 2017
पुणे शहरात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकमेकांसमोर लढणार आहेत. त्याच्या पाठोपाठ आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही निवडणुकीत एकमेकांसमोर येतील. खरेतर या दोन्ही पक्षांच्या साठी ही घातक गोष्ट आहे. पण शेवटी निवडणुकीतला हट्ट तो हट्ट. मग त्यापुढे स्वतःचे हितही बाजूला पडते.  सेना-भाजपची युती ही...
जानेवारी 20, 2017
मुंबईत ज्या ज्या व्यक्तीला गरज आहे तिला पाणी मिळायला हवे. मग तो अनधिकृत घरात राहणारा का असेना, त्याची पाण्याची गरज भागली गेली पाहिजे, अशी भूमिका महापालिकेने ठेवायला हवी. पाण्याच्या वाटपात विषमता होता कामा नये; मात्र नागरिकांनीही तितक्‍याच जबाबदारीने पाण्याचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी...
डिसेंबर 30, 2016
शिवसेना आणि भाजपविषयी थोडा वेगळा विचार करू. हे दोन्ही पक्ष सर्वांत जुने मित्र. आता युतीत बेबनाव असला तरी खांद्याला खांदा लावून ते एकत्र लढलेच होते ना ? युतीचे नेते एकत्रितपणे कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांचा उद्धार करीत होते ना ? आज जर तीच शिवसेना तुमच्यावर (भाजप) टीका करू लागली तर तिळपापड होण्याचे...