एकूण 3710 परिणाम
जून 27, 2019
औरंगाबाद - रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांना शिस्त लावण्यासाठी महापालिकेने अनेक नियम करून ठेवले आहेत; मात्र हे नियम कागदावरच राहतात. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी थेट आयुक्तांनाच पुढाकार घ्यावा लागला. बुधवारी (ता. २६) रस्त्यावर रॅपर्स फेकणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाला...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 26, 2019
मुंबई : खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. खासगी वाहनावर '...
जून 26, 2019
इंदूर: भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या मुलाने सरकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीला बॅटने मारहाण केली. विजयवर्गीय यांचा पहिल्यांदाच आमदार झालेला मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी आज(ता.26) बुधवारी इंदूर महापालिका अधिकारी आपले काम करत असताना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ...
जून 26, 2019
नवी मुंबई -  नवी मुंबई पोलिसांच्या मालमत्ता व अमली पदार्थविरोधी पथकाने १६ किलो अमली पदार्थांचा साठा तळोजा येथील एका कंपनीत नष्ट केला आहे. यात गांजा, ब्राऊन शुगर, चरस, एमडी या पदार्थांचा समावेश होता. नवी मुंबईच्या सहपोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या देखरेखीखाली हा...
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक...
जून 26, 2019
नाशिक - येथील गंगाघाटावर दिवसभर तळपत्या उन्हात, कडाक्‍याच्या थंडीत अन्‌ ऊन, वारा, पावसात बसलेले काही भिकारी हे दानशूरांनी दिलेल्या पै-पैच्या जिवावर सावकार झालेत. व्यापाऱ्यांना गंगाघाटावरील काही भिकारी हे १२ टक्के व्याजाने पैसे देतात. त्याच वेळी फुलेनगरमधील काही गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तींकडून...
जून 26, 2019
पुणे - पालखी काळात शहरातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने वेबपेज तयार केले आहे. त्यावर पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील कोणते रस्ते वाहतुकीस खुले किंवा बंद राहतील, याबाबत माहिती देण्यात येणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत...
जून 26, 2019
मुंबई - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांशी संबंधित लोकमंगल मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या गैरव्यवहारांवर आज विधान परिषदेत विरोधकांनी घोषणाबाजी केली. या प्रकरणात गुन्हा झाल्याचे लोकायुक्तांनी मान्य केल्याने प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी विरोधकांनी केली. तर,...
जून 25, 2019
नवी मुंबई -  पावसाळी वातावरणामुळे कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रात पोहोण्यासाठी उतरू नये, असे आवाहन मुरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी केले आहे. रविवारी (ता. 24) अलिबाग येथील काशिद...
जून 25, 2019
बुलडाणा : राज्यातील पावसाळी अधिवेशन हे 17 जूनपासून सुरू असून, यानिमित्त राज्यातील आमदार हे मुंबईकडे दर आठवड्याला प्रवास करत असतात. पहिला आठवडा संपल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राहुल बोंद्रे, आमदार डॉ. संजय रायमूलकर तसेच आमदार डॉ. शशिकांत खेडेकर हे दुसर्‍या आठवड्यातील अधिवेशनात हजेरी...
जून 25, 2019
पुणे - कोलकता व बांगलादेश यांच्या सीमारेषेजवळ सुरेखा मंडल (नाव बदलले आहे) हिचे गाव. घरी हलाखीची परिस्थिती. गावात कधीतरी शंभर-सव्वाशे रुपयांचा रोजगार मिळायचा. त्यातच पाच-सहा जणांचे पोट भागविताना या मुलीचे हृदय अक्षरशः पिळवटायचे. मग कोणीतरी पुणे, मुंबईत नोकरी मिळवून भरपूर पैसे कमविण्याचे आमिष दाखवितो...
जून 24, 2019
पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मंगळवारी, 25 जूनला दुपारी एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी आणि पुण्याकडे येणारी वाहतूक अर्ध्या तासांकरिता पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. त्यादरम्यान सर्व अवजड व मालवाहतूक करणारी वाहने...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू येथून...
जून 23, 2019
मुंबई - लोकलच्या महिला डब्यावर बीयरची बाटली भिरकावल्याने तीन प्रवासी महिला जखमी झाल्या. शुक्रवारी (ता. २१) रात्री कळवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान हा प्रकार घडला. रुळांलगतच्या झोपडपट्टीनजीक असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे रात्री प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा...
जून 22, 2019
पुणे :  भाजपच्या माथाडी संघटनेचा अध्यक्षश्याम शिंदे यास पाच लाख रुपयांची रोकड लुटण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्यास धमकावत त्याच्याकडील पाच लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात ही घटना घडली होती.  श्...
जून 22, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावर संतोष हॉलजवळ ब्रँड फॅक्‍टरीसमोरील पदपथावर वाहनांच्या पार्किंगबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलिस व महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊ कार्यवाही केली. 'सकाळ'चे मनापासून अभिनंदन!  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक...
जून 22, 2019
मुंबई  - महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करीत असल्याची घोषणा गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी आज विधान परिषदेत केली. सुरक्षेचे नियम...
जून 22, 2019
गोव्यातून करोडोंची बनावट दारू देशभरात पोचवण्याचे कोकण हे प्रवेशद्वार बनले आहे. यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरली गेली आहे. यामुळे महसूल तर बुडतोच; पण अशा दारूमुळे अनेकांच्या संसारात विष कालवले जात आहे.  बनावट दारू विक्रीचे गोवा हे '...
जून 21, 2019
मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती. या हल्ल्यासाठी पोलीस...