एकूण 3382 परिणाम
ऑक्टोबर 22, 2019
अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे उमेदवारांसह मतदारांनी धसका घेतला होता. परंतु आज सकाळपासून पावसाने उघडीप घेतल्याने दिलासा मिळाला.  जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस पडत आहे. त्याचे विघ्न प्रचारातही होते. त्यावर मात करत...
ऑक्टोबर 21, 2019
नगर  : आरोपी कोठेही लपला, तरी "सीआयडी'ची यंत्रणा त्याला शोधून काढतेच. "सीआयडी'चा ससेमिरा मागे लागला, की भल्याभल्यांची पाचावर धारण बसते. मात्र, आपल्या कार्यालयात कोण दडून बसलंय, याचा थांगपत्ता मात्र त्यांना लागला नाही. ही अजब घटना नगरच्या "सीआयडी'च्या कार्यालयात घडली. हे नेमके कसे घडले, याचे...
ऑक्टोबर 21, 2019
भिवंडी : भिवंडी शहर महापालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून मलेरिया, टायफाईड आदींसह डेंगीसारख्या जीवघेण्या तापाच्या आजाराने थैमान घातले आहे. सोमवारी सकाळी शहरातील गोकुळनगर येथे राहणाऱ्या नवविवाहित तरुणाचा डेंगीच्या तापाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विशाल भंडारी (26, रा. शंखेश्वर...
ऑक्टोबर 21, 2019
सकाळ वृत्तसेवा  मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त केली आहे. प्राप्तिकर विभाग मौल्यवान वस्तू व रोख रकमेच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवून आहे. त्या अंतर्गत करण्यात आलेल्या अशा कारवाया...
ऑक्टोबर 21, 2019
मुंबई : मुंबईत ९७ लाखांहून अधिक मतदार आहेत. ३३३ उमेदवार मैदानात असून ८१ हजारांहून अधिक कर्मचारी आणि पोलिस निवडणूक सुरळीत करण्यासाठी तैनात असतील. केंद्रांत पाळणाघरही सुरू करण्यात आले आहे. दहा टक्के मतदान केंद्रांवरील कार्यवाही वेबकास्टिंगच्या मदतीने लाईव्ह केली जाणार आहे. लोकसभा...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : चर्चगेट रेल्वेस्थानकाबाहेर टॅक्‍सीचालकांची मुजोरी सुरू आहे. बेस्टच्या बस स्थानकांवरच टॅक्‍सीचालकांनी अनधिकृत थांबा तयार केला असून, प्रवाशांना मिळवण्यासाठी या टॅक्‍सीचालकांची झुंबड उडत आहे. प्रवाशांना रस्त्यावरच उतरवले जात असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ताडदेव...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : विदेशी चलनाची तस्करी करणाऱ्या महिलेस केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) ने अटक केली आहे. मूळची केनिया येथील रहिवाशी असणा-या या महिलेचे नाव उन्शूर फसीहीया हुसैन आहे. तिच्याकडे 9 लाख 12 हजार रुपयांचे अमेरिकन डॉलर सापडले असुन, या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याची माहिती...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून प्राप्तिकर विभागाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 29 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम जप्त केली. प्राप्तिकर विभाग मौल्यवान वस्तू व रोख रकमेच्या देवाणघेवाणीवर लक्ष ठेवून आहे.  प्राप्तिकर विभागाने मुंबईतील सर्व 36 विधानसभा...
ऑक्टोबर 20, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : ऑक्टोबर महिना संपत आला तरी देखील पाऊस जाण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांनासमोर पाऊस नक्की  जाणार कधी असा प्रश्न पडला आहे. मात्र नुकत्याच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वमध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे पाऊस आणखी काही दिवस ठाण मांडून...
ऑक्टोबर 20, 2019
नैऋत्य मोसमी वारे परततांना परिस्थिती पाहून शेतकरी खरीपाच्या पिकाच्या काढणीला लागतो. तर ईशान्य मोसमी वार्याच्या आधारे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार त्यावर विश्वास ठेवून शेतकरी नियोजन करतो. नेहमी ढोबळ मानाने 1 सप्टेंबरला नैऋत्य मोसमी वार्याच्या परतीचा प्रवास...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : परतीच्या पावसामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. मान्सूनने महाराष्ट्राचा निरोप घेतल्याचे जाणवत असतानाच बिगर मोसमी पावसाला सुरवात झाली आहे.  हवामान शास्त्र विभाग पुणेने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकण,...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : नियोजित नवी मुंबई शहरात वाहनचालकांच्या बेपर्वा बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यात पार्किंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या परिसरात नो पार्किंगमध्ये पार्किंग केले जात आहे. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, बेलापूर आणि...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत टोलनाक्‍यावर अवैधरित्या वाहतूक केला जाणारा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने सदरची कारवाई करीत कारसह मद्यसाठा असा सुमारे पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  विधानसभा निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : नागपुरात स्वाइन फ्लू, स्क्रब टायफस व डेंगीचा कहर सुरू आहे. उत्तर नागपुरातील मिसाळ ले-आउट परिसरात घरोघरी डेंगीचा रुग्ण आढळून येत आहे. मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग साखर झोपेत आहे. निवडणुकीच्या कामात गुंतला असून, जनतेचे आरोग्य धुऱ्यावर सोडल्याची चर्चा परिसरात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग...
ऑक्टोबर 17, 2019
वज्रेश्‍वरी : तीर्थक्षेत्र असलेल्या गणेशपुरी, वज्रेश्‍वरी, अकलोली या गावासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांसाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित रस्तेकामाचा ठेका शिवसाई कन्स्ट्रक्‍शन कंपनीने घेतला आहे. या रस्त्याचे काम...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : वाहतुकीचे नियम मोडल्याच्या प्रकरणांत आता पेटीएमद्वारेही दंड भरता येईल. त्यासाठी राज्य पोलिसांनी या कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारे ऑनलाईन दंड स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील सातवे राज्य आहे.  मुंबईसह राज्यातील अन्य शहरांत वाहतुकीचे नियम मोडल्यास दंडाचे चलान ऑनलाईन पाठवले...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक सिगारेटवर बंदीचा अध्यादेश लागू केला असून, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सर्व विभागांना त्याचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्येक कार्यक्रमात तंबाखू व ई-सिगारेटविरोधी शपथ घ्यावी लागणार आहे...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची...