एकूण 261 परिणाम
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे...
जुलै 16, 2019
मुंबई - महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानांतर्गत सुरू असलेल्या शेतकरी कौशल्यविकास कार्यक्रमाचा भाग म्हणून स्थापन करण्यात आलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात...
जुलै 10, 2019
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांचा आज ५० वा स्मृतिदिन. या निमित्ताने त्यांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप. ‘श्‍लाघ्य: स एव गुणवान्‌ रागद्वेषबहिष्कृत:। भूतार्थकथने यस्य स्थेयस्येव सरस्वती।।’ अर्थात, जी व्यक्‍ती राग आणि द्वेष यांपासून कायम अलिप्त असते, तसेच जिची वाणी भूतकाळातल्या...
जुलै 05, 2019
नाशिक - वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेसाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा ठिकाणी असलेल्या कागदपत्र पडताळणीमुळे विद्यार्थी व पालकांच्या उडालेल्या तारांबळीविषयी ‘सकाळ’ने आवाज उठविला होता. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असताना...
जुलै 03, 2019
मुंबई : जूनच्या अखेरीला जोर धरलेल्या पावसाची संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार 'बॅटिंग' सुरू असताना आज (बुधवार) मुंबईत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे.  मुंबईत गेले दोन दिवस झालेल्या ...
जुलै 01, 2019
भोपाळ - येथे झालेल्या पिन्चॅक सिलॅट राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राने चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा चषक सातव्यांदा पटकावला. यात कोल्हापुरातील खेळाडूंनी सर्वाधिक 14 पदके मिळवून स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे उत्कृष्ट खेळाडूचा चषकही कोल्हापूरला मिळाला. या स्पर्धेत जम्मू-काश्‍मीर संघाने दुसरा तर...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
मुंबई -  राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वीपणे राबवण्यात येत असून त्यात आणखी सुधारणा व्हावी म्हणून उपाय योजना आखण्यात येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये संपूर्ण राज्यात दिवसाला 23702 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो, त्यातील 12548 मेट्रिक टन घनकचऱ्यावर प्रक्रिया केली...
जून 24, 2019
मुंबई - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उद्या (ता. 24) ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानात "मराठीच्या भल्यासाठी' या व्यासपीठाद्वारे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात राज्यभरातील मराठीप्रेमी, लेखक आणि कवी सहभागी होणार आहेत. या माध्यमातून प्रथमच 25 संस्था...
जून 21, 2019
मुंबई - महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ह्या तीन राज्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी नदीवरील तेलंगणा येथील जगातील सर्वात मोठ्या कालेश्वरम सिंचन प्रकल्पाचे लोकार्पण आज होणार आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार आहे. ही बाब लक्षात...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा...
जून 19, 2019
मुंबई - आदिवासी आरक्षणाला आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक तरतुदीला स्पर्श न करता धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय, धनगर समाजातील बेघरांना पहिल्या टप्प्यात १० हजार घरकुल बांधून दिली जाणार आहेत. धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा पक्षाने तडकाफडकी राजीनामा घेतला. शासकीय विश्रामगृहावर त्यांना बोलवून पक्षाने त्यांना दिलेले वाहनही काढून घेतले. देसाई यांचा अचानक राजीनामा घेतल्याने भाजप वर्तुळात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.  देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा का घेतला? याची...
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 06, 2019
पुणे - नमाजपठणासाठी मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, मध्यवर्ती पुण्यात सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून फिरणारे चिमुकले आणि शिरखुर्म्याचा आस्वाद घेऊन ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देत बुधवारी मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे रमजान ईदला संपले...
मे 31, 2019
तसे पाहिले तर माझे शिक्षण डिप्लोमा इन इलेक्‍ट्रॉनिक्‍स; पण करिअर म्हणून प्रवास सुरू झाला तो एका जाहिरात कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून. कधी प्रॉडक्‍शन हेड, कॅमेरामन, तर कधी व्हिडिओ एडिटर म्हणूनही काम केले; पण २०११ साली स्वतःचाच एडिटिंग स्टुडिओ सुरू केला आणि आजवर अनेक चित्रपट, लघुपट,...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 28, 2019
गणनेनंतरची आकडेवारी प्रसिद्ध; संख्या वाढली मुंबई - देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. भारतीय वन्यजीव...
मे 28, 2019
मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांना नोटीस पाठवून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. डॉ. पायल यांनी 22 मे रोजी आत्महत्या केली. याप्रकरणी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहर आणि अंकिता खंडेलवाल या तिघींविरुद्ध...
मे 27, 2019
मुंबई - पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचे म्युझियम बनणार आहे. या म्युझियममध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्यासाठी राज्य शासन आग्रही असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब...