एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
ऑगस्ट 14, 2018
15 ऑगस्ट जवळ आल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापनदिन! आजची पिढी स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेत बऱ्यापैकी सुखावलेली आहे. काही जण दुर्दैवाने स्वैराचारात बुडाले आहेत. पण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागील कैक पिढ्यांनी आत्यंतिक हालअपेष्टा सोसल्या आहेत, असीम...
जून 19, 2018
वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...! नुकतेच एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका कलाकाराने निरनिराळ्या आवाजांची नक्कल करून दाखवली. रूळ बदलताना रेल्वेचा होणारा आवाज अगदी हुबेहूब काढला. त्याच वेळी मी 40-50 वर्षे मागे...
एप्रिल 05, 2018
चीनच्या प्रचंड भिंतीपलीकडे काय असेल? आता व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने चीनमध्ये भारतीय जा-ये करीत असले तरी उत्सुकता कायम आहे. एका युवतीने अनुभवलेला चीन तिच्या शब्दांत. शांघायमधले चांगशू स्टेशन. दुपारचा एक वाजला होता. मेट्रो पीपल्स स्क्वेअरकडे निघाली होती आणि मी हताशपणे स्टेशनवर राहिलेल्या माझ्या...
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
डिसेंबर 12, 2017
श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' मधला विमानप्रवास पाहताना हसू येत होते; पण तिची झालेली गमाडीगंमत कधी तरी माझ्याही वाट्याला येईल याची कल्पनाही केली नव्हती. एके संध्याकाळी दळण घेऊन घरी आले, तेव्हा मुलाने सांगितले, की तुझे जर्मनीचे तिकीट बुक केले आहे. तुला जर्मनीला फिरायला जायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे...
सप्टेंबर 28, 2017
अंधांनाही चित्रं "पाहता' येतील? त्यांच्या अंतर्चक्षूनी ती समजावून घेता येतील? कॅनव्हासवरच्या रंग-रेषांतील संवेदन स्पर्शातून पोचेल? ही किमया एका चित्रकाराने साधली आहे. दोन लहान मुलं हत्यारबंद सैनिकांना फुलं देत आहेत. सीमेवरील कुंपणाच्या काटेरी तारा नजरेत भरणाऱ्या. मध्यभागी पृथ्वीचा गोल... ते चित्रं...
सप्टेंबर 16, 2017
बोर्डिंग पास. कागदाचा एक तुकडा. विमानतळावरची आसपासची गंमत पाहण्याच्या नादात या कागदाच्या तुकड्याकडे दुर्लक्ष होते. पण एखाद्या परदेशातील विमानतळावर विमानात बसण्याची वेळ संपत चाललेली असताना बोर्डिंग पास सापडत नसेल तर...! एवढ्याशा कागदाच्या तुकड्याला कधी आणि किती महत्त्व प्राप्त होईल, हे काही सांगता...
ऑगस्ट 11, 2017
पम्मा, धाकटी बहीण. वैद्यकीयदृष्ट्या दिव्यांग; पण किती समज होती तिला. किती प्रेम करायची ती माझ्यावर. लहान मुलासारखी. निरागस. या एकाकी आयुष्यात तिची आठवण दाटून येते. धाकट्या बहिणीचे निर्व्याज, निरपेक्ष, निर्मळ प्रेम मी अनुभवले. पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातात माझी आई गेली. त्यानंतर सात...
जून 09, 2017
मी लग्नाआधी मुंबईकर होते. लग्नानंतर पुणेकर झाले आणि आता नेदरलॅंडकर झाले आहे. किती तरी बदल होतात आयुष्यात, शहर आणि लोक  बदलल्यावर. मुंबईतील आयुष्यं रोजच्या धावपळीचं, व्यस्त, तरी मुक्त पक्ष्यासारखं! लग्नानंतर दीड महिना सासू-सासऱ्यांसोबत राहून मी नेदरलॅंडला आले. माझ्यासारखी बॅंकेत नोकरी करणारी...
मे 29, 2017
संपूर्ण प्रवासात तो तरुण आमच्याशी बोलला नाही की हसला नाही. सहप्रवास असा नव्हताच जणू. पण त्यानंच आम्हाला एका संकटातून वाचवलं. मी व माझी पत्नी रेखा अमेरिकेत सॅंडिएगो शहरात वास्तव्यासाठी गेलो होतो. मुलीकडे. सॅंडिएगो एक अतिशय देखणं शहर आहे. एका बाजूला समुद्रकिनारा, तर दुसऱ्या बाजूला डोंगर-दऱ्यांचा...
डिसेंबर 02, 2016
आम्ही दोघी बहिणी जन्मानं अमेरिकन, पण अंतःकरणानं पक्‍क्‍या पुणेकर. इथं अमेरिकेतल्या फळांना चव नाही की फुलांना गंध नाही. अमेरिकेतल्या कोरड्या बेचव वातावरणापेक्षा पुण्यातलं चवदार वातावरण आम्हाला भावतं. माझा जन्म अमेरिकेत सेंटरव्हील, व्हर्जिनिया इथे झाला. माझे आजोबा तेव्हा त्याच भागात नोकरी करत होते....
नोव्हेंबर 25, 2016
स्पीड पोस्टनं पाठवलेली पुस्तकं टपाल खात्यानं हरवली आणि सुरू झाली एक लढाई. सरकारी दिरंगाई आणि बेजबाबदारपणा यांच्याविरुद्धची लढाई सामान्य माणसानं जिंकली. "डोण्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन! सर्वसामान्य माणूस हा स्वतःला नेहमीच "हेल्पलेस' समजतो. विशेषतः कुठल्याही सरकारी यंत्रणेशी संबंध आला की...