एकूण 40 परिणाम
मार्च 08, 2019
   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण...
फेब्रुवारी 15, 2019
     गेल्या महिन्यात पुण्यात खेलो इंडियांतर्गत राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत महाराष्ट्रांच्या संघाने सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. प्रत्येक क्रीडाप्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नोंदवलेले यश हे कौतुकास्पद आणि इतर खेळाडूंसाठी उत्साह वाढविणारे, प्रोत्साहन देणारे...
ऑगस्ट 17, 2018
काहीतरी गोंधळ होतो. आपण अस्वस्थ होतो. मग गोंधळ आणखी वाढतो. मग चित्त होते वाराभर... दोन मैत्रिणींबरोबर युरोपला निघाले. प्रवासाच्या चौकशीसाठी गेले. पासपोर्ट पाहिल्यावर ते म्हणाले, ""पासपोर्टचे बाईडिंग योग्य नाही. तेव्हा नवीन पासपोर्ट करावा लागेल.'' शेवटी पासपोर्ट, व्हिसा हातात आला आणि मी निघाले....
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
ऑगस्ट 14, 2018
15 ऑगस्ट जवळ आल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु होते. यावेळी भारतीय स्वातंत्र्याचा 72वा वर्धापनदिन! आजची पिढी स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेत बऱ्यापैकी सुखावलेली आहे. काही जण दुर्दैवाने स्वैराचारात बुडाले आहेत. पण स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मागील कैक पिढ्यांनी आत्यंतिक हालअपेष्टा सोसल्या आहेत, असीम...
जुलै 04, 2018
महाविद्यालयात असताना पाषाण तलावावर अनेकदा गेलो होतो. मध्यंतरीच्या काळात तिकडे जाणे झाले नव्हते. आता निघालो, तर आठवणीतल्या सगळ्या जुन्या वाटा बंद झालेल्या. पार वळसा घालून पाणवठ्याला भेट दिली. पाणवठा बदलला होता. कित्येक वर्षे लोटली. पाषाण तलावावर जाणे काही जमले नव्हते. नुकतीच छायाचित्रणकला शिकायला...
जून 29, 2018
पुणे महापालिका आयुक्तांबरोबर एका महत्त्वाच्या प्रकरणासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलो होतो. आमचे पहिले काम अपेक्षेहून कमी काळात आटोपले. दोन दिवसांनी पुन्हा काम होते. त्या वेळी आतासारखी विमानसेवा सहज नव्हती. आयुक्तांना अन्य काही काम असल्याने ते दिल्लीतच राहणार होते. या मधल्या दोन दिवसांत...
जून 26, 2018
अजून ती आठवण मनातून जात नाही. मुंबईची तुंबई कधीही होऊ शकते पावसात. माणसे कोंडली जातात घरातली घरात, ऑफिसातील ऑफिसात. तरीही जिवाच्या कराराने मुंबईचे जीवनगाणे सुरूच असते. "हतबलता' म्हणजे काय हा अनुभव मला मुंबई येथे सर्वप्रथम गेल्या वर्षी 26 जुलैला आला. मुंबईचा पाऊस, मुंबईची वाहतूक व...
जून 19, 2018
वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...! नुकतेच एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका कलाकाराने निरनिराळ्या आवाजांची नक्कल करून दाखवली. रूळ बदलताना रेल्वेचा होणारा आवाज अगदी हुबेहूब काढला. त्याच वेळी मी 40-50 वर्षे मागे...
मे 04, 2018
अमरनाथच्या परतीच्या वाटेवर पावसाने गाठले. अनेकांचे सामान वाहून जाताना दिसत होते. आमचे सामान सुरक्षित होते; पण बूट तेवढे हरवले होते. टाटा मोटर्समधील आमचा नेहमीचा ट्रेकिंग ग्रुप मनाली-लेह, कारगिल, लडाखला निघाला. मी व करंदीकर या सहकाऱ्याने अमरनाथ बघितले नव्हते. वाटेतच बालताल होते. तेथून अमरनाथ यात्रा...
एप्रिल 17, 2018
एका गोंडस मुलाच्या स्नायूंतील बळ संपत जाते आणि तो खुर्चीला जखडतो; पण त्याची जिद्दी आई त्याच्या कल्पनांना "कॅनव्हास'चे पंख मिळवून देण्यासाठी धडपडते. यशस्वी होते. "मिस्टी-रोज' आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन झाले आणि टाळ्यांचा गजर केला. या आर्ट गॅलरीचा निर्माता, अवघ्या सव्वीस वर्षांचा आदित्य निकम याच्या...
एप्रिल 06, 2018
आधार कार्ड म्हणजे आपले अस्तित्व. गॅस सिलेंडर, मोबाईल, बॅंक खाते, पेन्शन खाते कुठे कुठे जोडायचे असते. मोबाईल व आधार कार्ड यांची जोडणी करताना एका निवृत्त कर्नलना आलेला हा अनुभव... माझे वय ऐंशी वर्षे. सध्या आधार कार्ड गॅस सिलेंडर, बॅंक खाते, पेन्शन खाते इत्यादींना जोडलेले असले पाहिजे, असा आग्रह सुरू...
एप्रिल 05, 2018
चीनच्या प्रचंड भिंतीपलीकडे काय असेल? आता व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने चीनमध्ये भारतीय जा-ये करीत असले तरी उत्सुकता कायम आहे. एका युवतीने अनुभवलेला चीन तिच्या शब्दांत. शांघायमधले चांगशू स्टेशन. दुपारचा एक वाजला होता. मेट्रो पीपल्स स्क्वेअरकडे निघाली होती आणि मी हताशपणे स्टेशनवर राहिलेल्या माझ्या...
एप्रिल 04, 2018
शाळा भरली, प्रार्थनेची घंटा झाली, सर्व विद्यार्थी आपापल्या वर्गाच्या ओळीत उभे राहिले. एका सुरात धीरगंभीर आवाजात प्रार्थना म्हटली गेली. आमच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण गुरुजी सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले. ‘‘मुलांनो, उद्या आपल्या शाळेची तपासणी आहे. शाळा तपासणीसाठी कोल्हापूरहून...
मार्च 22, 2018
समारंभात पाहुण्यांसाठी हार हवेच होते आणि नेहमीचा फुलवाला आला नव्हता. व्यवस्थापकाने एका हरकाम्याला कामाला लावले आणि त्याने आणलेल्या हारांचीच गोष्ट झाली. कलादालनात एका सरकारी समारंभाचे आयोजन केले होते. आयोजक नामवंत "इव्हेंट मॅनेजर' असल्याने त्यांनी सकाळीच येऊन कार्यक्रमाची तयारी सुरू केली होती....
मार्च 20, 2018
भाषा संवादासाठी असते. राजकारण्यांना भाषा वादासाठी लागते. आपण वादापलीकडे जात भाषेच्या जवळ जायला हवे आणि भाषेपलीकडे माणसाला भेटायला हवे. माझी मातृभाषा कानडी. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. अकरावीला शास्त्र शाखेत प्रवेश घेतल्यामुळे शिक्षणाचे माध्यम इंग्रजी झाले. मातृभाषा कन्नड...
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
फेब्रुवारी 13, 2018
पहिल्या नोकरीचे गाव अजूनही मनात वसले आहे. कोकणातील निसर्ग, अंगाला शेतीतल्या कामाचा गंध येणारे विद्यार्थी पुन्हा आठवले आणि पावले त्या गावाकडे वळली. मुंबई-गोवा महामार्गावरचे खारेपाटण हे एक छोटे गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. पदवी मिळाल्यावर दोन वर्षं तिथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम...
डिसेंबर 12, 2017
श्रीदेवीचा "इंग्लिश-विंग्लिश' मधला विमानप्रवास पाहताना हसू येत होते; पण तिची झालेली गमाडीगंमत कधी तरी माझ्याही वाट्याला येईल याची कल्पनाही केली नव्हती. एके संध्याकाळी दळण घेऊन घरी आले, तेव्हा मुलाने सांगितले, की तुझे जर्मनीचे तिकीट बुक केले आहे. तुला जर्मनीला फिरायला जायचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे...
नोव्हेंबर 21, 2017
विवाहानंतर सात वर्षांनी सासरच्या उत्सवाला प्रथमच जाणं हे आपल्या संस्कृतीत ऑडच. पण तसं घडलं खरं. उत्सवाला हजेरी लावल्याच्या क्षणापासून मी गावाच्या आणि उत्सवाच्या प्रेमात आहे. मुंबई-गोवा महामार्ग आणि रत्नागिरी-कोल्हापूर राज्य महामार्गाच्या मधल्या त्रिकोणात वसलेलं खानू गाव. त्यातलं भवानी...