एकूण 34 परिणाम
जानेवारी 17, 2020
सोलापूर : राज्यात सध्या 8 विभागीय आणि 5 लघु न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून वर्षभरात जवळपास अडीच लाख प्रकरणांची तपासणी केली जात आहे. सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये रक्त, विष आणि व्हिसेरा तपासणी होणार आहे. भविष्यात फॉरेन्सिक लॅबमध्ये अल्कोहोल...
जानेवारी 16, 2020
रायगड : कोल्हापूर, वसईनंतर मटण भाववाढीचा मुद्दा रायगड जिल्ह्यात पेटण्याची शक्‍यता आहे. सध्या जिल्ह्यात त्याचा प्रति किलो भाव ६०० रुपये आहे. गेल्या वर्षी मकर संक्रांतीपर्यंत हा भाव अवघा ५०० रुपये होता. दर महिन्याला १० ते २० रुपयांनी भाववाढ ही लूट असल्याची तीव्र प्रतिक्रिया जिल्ह्यातील मटणप्रेमी...
डिसेंबर 25, 2019
नाशिक : नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायधीश आर.एम. जोशी यांची ठाणे येथे मुख्य न्यायधीश म्हणून बदली झाली आहे. तर, अलिबाग जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायधीश ए. एस. वाघवसे हे लवकरच रुजू होणार आहेत. राज्यातील पाच जिल्हा न्यायधीशांच्या बदल्या झाल्या आहेत.  न्या. ए.एस. वाघवसे नवीन मुख्य...
डिसेंबर 16, 2019
सोलापूर : गतविजेत्या ठाणे व उपविजेत्या रत्नागिरीस नमवून पुण्याच्या महिलांनी वरिष्ठ गटाच्या 56व्या राज्य अजिंक्‍यपद खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. तर, पुरुष गटात मुंबई उपनगरने विजेतेपद कायम ठेवले.  ह. दे. प्रशालेच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात पुण्याने ठाण्याचा 11-9 असा 2.40...
डिसेंबर 04, 2019
नागपूर : कारागृह रक्षक, शिपाईची पदे रिक्त असल्याने ती उपलब्ध होईपर्यंत राज्यातील 28 जिल्ह्यांमधील कारागृहात 300 होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. कारागृहाच्या सुरक्षेसाठी पहिल्या टप्पात 126 होमगार्डच्या तैनातीला मान्यता दिली आहे. बुधवारपासूनच (ता.4) त्याची अंमलबजावणी होणार आहे.  राज्यातील सर्वच...
नोव्हेंबर 21, 2019
नंदुरबार : पथराई (ता. नंदुरबार) येथील के. डी. गावित क्रीडा संकुलात सुरू असलेल्या तिसाव्या राज्यस्तरीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धेत पुण्याच्या खेळाडूंची यशस्वी घोडदौड कायम असून, नागपूर, मुंबई उपनगर व ठाणे येथील खेळाडूंनी आपल्या खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर करीत ते पदकतालिकेत अनुक्रमे १६ व...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. ...
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी...
ऑक्टोबर 14, 2019
कोल्हापूर - रस्ते महामार्ग होण्यापूर्वी कोल्हापुरात व्यापारासाठी समुद्र मार्गाचाच म्हणजे कोकणातल्या बंदराचाच कसा आधार होता, याची प्रचिती पुन्हा जयगड बंदरामुळे येथील वाहतूक व व्यापारी क्षेत्राला आली आहे. जयगड येथील आंग्रे पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (चौगुले ग्रुप) च्या आंग्रे बंदरातून गेल्या वर्षात...
ऑक्टोबर 11, 2019
मुंबई : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका 2019 दरम्यान आचारसंहिता भंगासंदर्भातील तक्रारी मतदारांनी करण्यासाठी ‘सी व्हिजील’ ऍप निवडणूक आयोगामार्फत तयार करण्यात आले आहे. या ऍपवर कालपर्यंत विविध प्रकारच्या 1 हजार 192 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातील 692 तक्रारी योग्य आढळून आल्या असून,...
ऑगस्ट 24, 2019
नवीन पनवेल : पनवेल परिसरात दहीहंडी उत्सवाची मोठी परंपरा आहे; परंतु न्यायालयाने या उत्सवाला अनेक निर्बंध घातल्याने मुंबई आणि ठाणे शहराप्रमाणेच येथील अनेक मंडळांनी दोन वर्षांपूर्वीच माघार घेतली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर...
जुलै 28, 2019
मुंबई : मुसळधार पावसात बदलापूर-वांगणी स्थानकांदरम्यान महालक्ष्मी एक्‍स्प्रेस अडकल्याच्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या आपत्ती व्यवस्थापनातील ढिसाळपणा पुन्हा उघड झाला आहे. ही गाडी शुक्रवारी (ता. 26) रात्री दहा वाजता अडकली, तेव्हा रेल्वेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक बंद होता. याबाबतची सूचना...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
मार्च 14, 2019
नागपूर - राईट टू एज्युकेशन (आरटीई)च्या बाबतीत सर्वाधिक जागरूक नागपुरातील पालक आहेत. राज्यभरात सर्वाधिक अर्ज नागपूर जिल्ह्यात दाखल झाले असून हे प्रमाण एकूण जागेच्या 226 टक्के आहे. विभागाच्या प्रयत्नाचे हे यश असल्याचे दिसते.  आरटीईच्या नियमानुसार 25 टक्के जागा शाळांना आरक्षित ठेवण आवश्‍यक आहे....
डिसेंबर 25, 2018
नागपूर : नागपूर पोलिस दलातील तब्बल 2 हजार 200 पोलिस कर्मचारी अजूनही वर्दीवर "टू स्टार' लागण्याच्या आशेवर आहेत. पोलिस अधिकारी बनण्यास पात्र असतानाही केवळ शासनाच्या दफ्तरदिरंगाईमुळे त्यांना आजही हवालदार या पदावर काम करावे लागत आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांमध्ये...
ऑगस्ट 05, 2018
जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू...
जून 17, 2018
सोलापूर : केंद्र सरकारने नवउद्योजकांसाठी स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 22 हजार 890 नवउद्योजकांनी नोंदणी केली. त्यापैकी फक्‍त 3 हजार 203 नवउद्योजकांनाच लाभ मिळाला आहे. त्यावरून स्टार्टअप इंडियात महाराष्ट्र अद्यापही 'डाउन'च असल्याचे स्पष्ट होते.  महाराष्ट्रासह देशातील...
मार्च 07, 2018
मुंबई - राज्यात वीजचोरीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी व वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने राज्यात 132 पोलिस ठाण्यांमध्ये वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यास परवानगी दिली आहे.  या संदर्भात गृह विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे. या 132 पोलिस ठाण्यांमध्ये महावितरण,...
ऑक्टोबर 03, 2017
पुणे - राज्यभरातील अनेक प्रमुख शहरांतील रस्त्यांवर सोमवारी सकाळी स्वच्छतेचा गजर झाला अन्‌ बघता- बघता तो परिसर चकाचकही झाला! त्याचे निमित्त ठरले, ते "सकाळ माध्यम समूहा'च्या स्वच्छता मोहिमेचे. या शहरांतील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मोहिमेत...
जुलै 13, 2017
आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 96 पेट्रोल पंपांवर छापे ठाणे - पेट्रोल पंपांच्या मशिनमध्ये तांत्रिक फेरफार करून त्याद्वारे पेट्रोल-डिझेलची चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात ठाणे पोलिसांना यश मिळाले असून, यातील मुख्य आरोपी प्रकाश नुलकर याला हुबळी येथून अटक केली आहे....