एकूण 21 परिणाम
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 24, 2019
राहुल गांधींच्या प्रचाराचा काँग्रेसला फायदा नाहीच  मुंबई - लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या राष्ट्रीय नेत्यांसह राज ठाकरे यांच्या सभा चर्चेचा विषय राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा निकाल हा शत प्रतिशत राहिला....
मे 24, 2019
पार्थ यांच्या रूपाने पवार घराण्यात पहिला पराभव मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने आपले वर्चस्व कायम राखले असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीही कामगिरी समाधानकारक असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराण्याला पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागला...
मे 23, 2019
पुणेः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. राज ठाकरे सकाळी उठेपर्यंत मोदी पुन्हा पंतप्रधान झाले सुद्धा. साहेब आता कोणता व्हिडिओ लावायचा? कृष्णकुंजवरून राज ठाकरे आघाडीवर... अशा प्रतिक्रिया नेटिझन्सनी नोंदवल्या आहेत. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराच्या...
मे 23, 2019
पुणे : लोकसभा निवडणूकीदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात 10 ठिकाणी सभा घेतल्या असल्या तरी प्रत्यक्षात राज ठाकरे फॅक्टरचा प्रभाव पडलेला दिसत नाही. राज ठाकरे यांच्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी होत होती. सभेदरम्यान ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीच्या बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला यंदा चांगले यश मिळताना दिसत आहे. 2014 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील 10 पैकी अवघ्या तीन जागा जिंकता आलेल्या युतीला यंदा तब्बल 8 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सुरवातीच्या आघाडीनुसार भाजपला 23 आणि...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...
मे 23, 2019
'व्हीव्हीपॅट' मोजणीमुळे निकाल सरासरी पाच तास उशिरा  मुंबई - विधानसभा मतदारसंघनिहाय कोणत्याही पाच मतदान केंद्रांवरील "ईव्हीएम' आणि "व्हीव्हीपॅट'ची मोजणी झाल्यानंतरच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकृत आणि अंतिम निकालासाठी सर्वांना प्रतीक्षा करावी लागेल....
एप्रिल 25, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राज्यातील 14 मतदारसंघांत सरासरी 62.37 टक्के मतदान झाले. सर्वांत कमी मतदान पुण्यामध्ये 49.84 टक्‍के इतके झाले. तर कोल्हापूर लोकसभेत सर्वाधिक 70.70 टक्‍के मतदान झाले आहे. पुण्यातील नीचांकी मतदानाने सर्वच पक्षांचे उमेदवार हवालदिल झाले आहेत....
एप्रिल 22, 2019
मुंबई - सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील राजकीय प्रचाराचा "हाय व्होल्टेज ड्रामा' आज सायंकाळी संपला. विविध पक्षीय दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, पदयात्रा, मतदारांच्या भेटीगाठींमुळे निम्मे राज्य ढवळून निघाले होते. आता येत्या 23 एप्रिल रोजी म्हणजे...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - शहरातील ज्यांचे मतदान त्यांच्या मूळ गावी आहे, अशांशी संपर्क साधण्याचे काम त्या त्या मतदारसंघांतील उमेदवारांकडून सुरू झाले आहे. येथील काही मंडळांनी मतदारांना मतदान होईपर्यंत गावी न जाण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.  शहरात राज्याच्या विदर्भ,...
एप्रिल 12, 2019
मुंबई - ग्रामीण भागातील मतदार सरकारच्या विरोधात नाराज असल्याचा दावा केला जात असला, तरी महाराष्ट्रात मात्र कोरडवाहू व बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मतभेदाचे राजकारण सुरू आहे. विदर्भ, मराठवाडा या भागांतील मतदारांमध्ये शेती व शेतकरी हा कळीचा मुद्दा आहे, तर पश्‍चिम महाराष्ट्रातल्या...
एप्रिल 08, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्यभरात 10 सभा घेऊन, भाजपप्रणीत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वातावरण तयार करणार आहेत. राज ठाकरे यांनी या संदर्भात शनिवारी गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथील मेळाव्यात जाहीरपणे सांगितले होते....
मार्च 30, 2019
पुणे : मराठा मोर्चा आणि मराठा समन्वय समिती यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, मराठा सेवा संघ आणि मराठा मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसला ऐन...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 23, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या रिंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या सर्वाधिक उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात युवा नेत्यांचाही समावेश असल्याने या सर्व मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे मानले जाते. आतापर्यंत पक्षातील बुजुर्ग व अनुभवी नेत्यांना लोकसभेवर पाठवण्याचा जो...
मार्च 22, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार दक्षिण मुंबई - अरविंद सावंत...
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातील २३ पैकी २० ते २१ जागा जिंकण्याचा शिवसेना नेत्यांना अंदाज आहे. यासाठी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी आतापर्यंत ‘मातोश्री’ला दोन भेटी दिल्या असून, यापुढे त्यांचे मुंबई दौरे वाढणार असल्याचे शिवसेनेतील सूत्रांकडून सांगण्यात...
मार्च 15, 2019
अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे.  आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त...