एकूण 43 परिणाम
मे 24, 2019
मुंबई - देशात भाजपप्रणीत आघाडीच पुन्हा सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट होताच भाजप-शिवसेना नेत्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची खिल्ली उडविण्यास सुरवात केली. ‘लाव रे ते फटाके’, ‘वाजव रे ढोल’ अशी पोस्टर लावण्यात आली. युतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर करीत फटाक्‍यांची आतषबाजी केली. ...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
एप्रिल 27, 2019
मुंबई - देश मजबूत करण्यासाठी मजबूत सरकारची गरज आहे. यासाठी चौकीदार मजबूत करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे झालेल्या प्रचारसभेत मुंबईकरांना केले. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांतील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुंबईतील बांद्रा येथील सभेत ते बोलत होते....
एप्रिल 24, 2019
मुंबई - उत्तर मुंबई मतदारसंघात मतदारांना वाटण्यात आलेल्या मतपावत्यांवर केवळ भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे दिसत असल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या पावत्या न वाटण्याचा निर्णय घेतला आहे. मतदानासाठी अवघा आठवडा शिल्लक असताना युतीतील हा नवा वाद काँग्रेसच्या पथ्यावर पडू शकतो...
एप्रिल 22, 2019
मुंबई - कॉंग्रेसने 60 वर्षे देशावर दरोडा घातला, अशी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. धारावी येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.  कॉंग्रेसने केलेला भ्रष्टाचार जनता कधीच विसरू शकत नाही. या काळ्या कारभाराचे परिणाम जनता अजून भोगत आहे, असा हल्ला ठाकरे यांनी चढवला...
एप्रिल 19, 2019
एके काळी महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्षांना संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्‍नावरून पराभवाची धूळ चाखावी लागली होती. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न अद्याप सुटलेला नाही; मात्र निवडणुकांच्या अजेंड्यावरून हा प्रश्‍न गायब झाल्याचे चित्र आहे. सीमाप्रश्‍न हा मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्‍न असूनही राजकीय...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची...
एप्रिल 16, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंग भरला असतानाच राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे विरुद्ध शरद पवार आणि राज ठाकरे असा सामना रंगल्याचे चित्र आहे. हे चित्र राज्यातील सर्व टप्प्यांतील मतदान पार पडेपर्यंत कायम राहणार असल्याने...
एप्रिल 13, 2019
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. धनंजय मुंडे यांनी सरकारी बंगल्यावर जाहीरनामा प्रसिद्ध करून आचारसंहितेचा भंग केला. आयोगाच्या तपासात तसे सिद्ध झाले आहे. याबाबत त्यांच्यावर...
एप्रिल 09, 2019
मुंबई - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘फ्रस्टेड’ झाले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केली. राज ठाकरे पूर्णपणे ‘फ्रस्टेड’ आहेत. मनसे आता ‘उनसे’ झाली आहे. ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’, अशी टीकाही फडणवीस यांनी केली. ‘राज ठाकरे...
मार्च 29, 2019
मुंबई : ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप नेते आणि विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची धावपळ सुरू आहे. 'मातोश्री'वर जाऊन जाहीर लेखी माफीनामा देण्याची त्यांची तयारी असली तरी शिवसैनिकांच्या रोषामुळे पेच कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'वर्षा' निवासस्थानी आमदार ...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती...
मार्च 28, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील जागावाटप आणि उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेत ‘माझं ते माझं अन्‌ तुझ्याकडचंही माझंच’ अशी खेळी खेळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती होण्याआधी...
मार्च 27, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सत्ताधारी पक्षात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. युतीतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेतील नाराज नेत्यांची समजूत काढण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, काल रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' बंगल्यावर खलबते सुरू होती. या वेळी नाराजांना...
मार्च 26, 2019
मुंबई - देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांना हद्दपार करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर मनसैनिक मैदानात उतरले आहेत. त्यांनी सोशल मीडियातून युतीला लक्ष्य करण्यास सुरवात केली असून त्यांच्या ट्विटना प्रतिसाद...
मार्च 25, 2019
मुंबई - औरंगाबादमध्ये सुभाष झांबड यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र काल मध्यरात्री ते अचानक गिरीश महाजन यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अब्दुल सत्तार यांच्यात बराच...
मार्च 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीने घटक पक्षांतील कुठल्याच पक्षाला उमेदवारी न दिल्याने रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवलेंपासून राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरांपर्यंत सर्वांनीच नाराजीचा सूर आळवायला सुरवात केली होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत...
मार्च 23, 2019
मुंबई : माझ्या मागं...एवढी लोक आहेत...त्यांच्या माग एवढी जनता आहे...हो का मग दाखवा...जाऊद्या मला एकही जागा दिली नाही तरी मी समाधानी आहे...बर झालं...आपण एक काम करू, तुमच्या पक्षांना एकही जागा मिळणार नाही...तरिही आपण एकत्र निवडणूक लढवू...आणि अगदीच उमेदवारी मिळवायची असेल तर शक्ती प्रदर्शन...
मार्च 23, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या २१ उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी उमेदवार जाहीर करताना सातारा आणि पालघर मतदारसंघातील नावे लवकरच घोषित केली जातील, असे सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांची नावे जाहीर करण्याची...
मार्च 23, 2019
मुंबई - ‘देशात राष्ट्राभिमान जागा झाला असताना पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर केलेल्या हल्ल्यांवरून प्रश्न उपस्थित करणारे विरोधक पाकिस्तानचीच भाषा बोलत आहेत. अशा विरोधकांच्या राष्ट्रवादाबद्दलच आता प्रश्न निर्माण होतील,’’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मुंबईत...