एकूण 827 परिणाम
जून 18, 2019
मुंबई : राम मंदिराचा प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतो. मात्र, नरेंद्र मोदी यांना कुणीतरी चुकीचा सल्ला देतंय. यामुळे राम मंदिर उभारण्यास विलंब होत आहे, असे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले. स्वामी यांनी 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. स्वामी यांनी...
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रहाणार उपस्थित असून ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच शिवसैनिकांना मार्गदर्शन देखील करणार आहेत....
जून 18, 2019
मुंबई : शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या बुधवार (ता. 19 ) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधींना मार्गदर्शन करणार आहेत. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील यावेळी उपास्थित राहणार आहेत....
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अठरा खासदारांसह आज अयोध्येत असल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या शपथविधीसाठी ते उपस्थित राहू शकले नाहीत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रविवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. या वेळी उद्धव यांच्यासोबत शिवसेनेचे 18 खासदारही उपस्थित होते. या सर्वांनी...
जून 15, 2019
मुंबई - बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारी (ता. १६) होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असली, तरी अनिश्‍चितता कायम आहे. शिवसेनेतील धूसफूस आणि आयारामांना मंत्री केल्यास विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपातील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याच्या शक्‍यतेने मंत्रिमंडळ...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या...
जून 12, 2019
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (बुधवार) रात्री भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी आदित्य यांनी ही भेट घेतली. आदित्य यांच्यासोबत युवासेना पदाधिकारी सुरज चव्हाण आणि साईनाथ दुर्गे ही उपस्थित होते. राज्यातील शैक्षणिक धोरण...
जून 12, 2019
मुंबई : शिवसेनचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सोशल मीडियावरुन आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवून, राज्याचं नेतृत्व करण्यासाठी गळ घातली जात आहे. “हीच वेळ आहे, हीच संधी आहे,...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा...
जून 09, 2019
मुंबई - ‘भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना काहीही विधाने करू द्या, तुम्ही शांत राहा. जागा वाटपाबाबत आमचे ठरले आहे. त्यामुळे कोणी काहीही बोलू नका,’ अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नेत्यांना केल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपाचे...
जून 06, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने घवघवीत यश मिळवलं. यानंतर मोदींच्या शपथविधीत 18 खासदार असलेल्या शिवसेनेला अवघं एक मंत्रिपद मिळालं आणि तेही अवजड असे कमी महत्वाचे मानले जाणारे खाते. त्यामुळे खासदारांच्या संख्येनुसार मंत्रिपद न मिळाल्याने शिवसेना नाराज आहे. तर, शिवसेनेकडून...
जून 06, 2019
उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांसह १५ जूनला अयोध्येला जाणार मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी...
जून 03, 2019
मुंबई ः भाजपच्या वाट्याच्या 135 जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या 10 जागा मिळून 153 जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी...
मे 30, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात शिवसेनेचा कोणता खासदार असेल हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे आज शपथ घेतील हे आता स्पष्ट झालं आहे. आज (ता. 30) सकाळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शहा यांचा फोन आल्याचे...
मे 28, 2019
मुंबई : काँग्रेसचे नेते व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज (मंगळवार) दिली. याबाबतचा अंतीम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विखे पाटील व त्यांचे पूत्र आणि...
मे 27, 2019
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा अधिवेशनापूर्वी विस्तार होणार असून मंत्रिमंडळ विस्तारात राधाकुष्ण विखे पाटील यांना कृषी खात्याचे कॅबिनेट मंत्री केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपचे जेष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन आज दुपारी  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव...
मे 26, 2019
मुंबई : अनंत गिते, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव-आढळराव पाटील ही लोकसभेतील शिवसेनेची पहिली फळी निवडणुकीत पराभूत झाल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेकडून मंत्री म्हणून कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता लागली आहे. सध्या शिवसेनेत केंद्रीय मंत्रिपदासाठी राज्यसभा सदस्य अनिल...
मे 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रात लिहिलेल्या काही बाबी आता समोर आल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना तत्कालीन कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मीसह घर सोडून जाऊ, अशी धमकी दिली होती.   नारायण राणे यांनी आत्मचरित्रात...