एकूण 51 परिणाम
नोव्हेंबर 26, 2018
पुणे : मराठा क्रांती मोर्चाच्या 'मराठा संवाद यात्रा'च्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी चिंचवड येथून मोर्चाचे प्रमुख व समन्वयकांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली. याबरोबर पुण्याहुन मुंबई येथे जाणाऱ्या गाड्या अडवुन अनेकांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.  ...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या संतप्त आंदोलनाने राज्यभरातले व्यवहार रोखल्यानंतर आता सरकारने कठोर कारवाईला सुरवात केल्याचे चित्र आहे. या आंदोलनात हिंसक घटना घडलेल्या भागात आंदोलकांच्या अटकेचे सत्र सुरू झाले असून, दहा हजारांहून अधिक आंदोलकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद झाल्याची...
ऑगस्ट 11, 2018
औरंगाबाद  - वाळूज एमआयडीसीतील कंपन्यांच्या तोडफोड प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत करावी, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मराठा समाजाला यात विनाकारण गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही तोडफोड उद्योगांची नसून, संपूर्ण शहराचीच असल्याचे सांगत त्यांनी या घटनेचा...
ऑगस्ट 10, 2018
औरंगाबाद - वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा आणि औरंगाबाद या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योगांनी बंद पाळत मराठा बांधवांच्या आंदोलनाला सहकार्य केले. उत्पादन बंद असल्याने औरंगाबादेतील औद्योगिक क्षेत्राला सुमारे तीनशे कोटींचे नुकसान सहन करावे लागले.  मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला...
ऑगस्ट 10, 2018
पिंपरी - बंद असलेली दुकाने, ओस पडलेले रस्ते, ना स्कूल बस ना विद्यार्थी, सारे काही शांत शांत. अशा वातावरणात शहरवासीयांना गुरुवारची सकाळ अनुभवायला मिळाली. मात्र, साडेआठ-नऊ नंतर वेगवेगळ्या भागांतून निघालेल्या दुचाकी रॅली; रावेत, किवळे, पिंपळे गुरव, हिंजवडीत झालेल्या सभा आणि भोसरी व पिंपरीत दिवसभर...
ऑगस्ट 10, 2018
वडगाव मावळ - आरक्षणाच्या मागणीसाठी मराठी क्रांती मोर्चाने गुरुवारी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला मावळ तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगाव, तळेगाव, लोणावळा, देहूरोड, कामशेत या मोठ्या शहरांसह छोट्या- छोट्या गावांतही कडकडीत बंद पाळण्यात आला. तळेगाव, लोणावळा, ऊर्से, बेबडओहोळ, टाकवे बुद्रूक या...
ऑगस्ट 09, 2018
महाड - एक मराठा लाख मराढाच्या घोषणा देत  मराठा आरक्षणाच्या मागणी साठी सकल मराठा समाजाच्या वतीने महाडमध्ये आज मुंबई गोवा महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तर बंदचे आवाहन केलेले नसतानाही महाडमधील व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपली दुकाने बंद ठेवल्याने शहरात शुकशुकाट होता. महाराष्ट्र...
ऑगस्ट 09, 2018
चिपळूण - महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर आज चिपळूण तालुक्यात मराठा समाजातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. एसटी वाहतुकीसह खासगी वाहतूक, पेट्रोल पंप व सर्व दुकाने बंद राहिली. शहरातून मोर्चा काढून एक मराठा, लाख मराठ्याच्या घोषणा दिल्याने शहर परिसर दुमदुमले. भगवे ध्वज हाती घेत काढलेल्या मोर्चाने शहर...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
औरंगाबाद, मुंबई - मराठा आरक्षणासाठी आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. अहिंसक, असहकाराने आंदोलन करण्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. औरंगाबादेत झालेल्या समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. या बंदमधून...
ऑगस्ट 09, 2018
जगाला नोंद घ्यायला लावणारी कर्तबगारी, रणांगणातील शौर्य, तसेच संघर्षकाळातही सद्‌वर्तन- संयमाच्या देदीप्यमान इतिहासाचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासाठी आजचा, नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन अत्यंत महत्त्वाचा, समाज म्हणून कसोटी पाहणारा आहे. नव्या पिढीच्या भवितव्यासाठी चिंतेत असणारा समाज आरक्षण व अन्य...
ऑगस्ट 09, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी विविध संघटनांनी गुरुवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मार्गावरील बससेवा बंद, तर आठ मार्गांवरील बस शहराच्या हद्दीपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय पीएमपी व्यवस्थापनाने घेतला आहे. तसेच १४ मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उर्वरित मार्गावरील वाहतूक...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आरक्षणासाठी उद्या (ता. 9) क्रांतीदिनी महाराष्ट्र "बंद'ची एसटीला धास्ती लागली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय नियंत्रकांना काळजी घेण्याच्या सूचना व्यवस्थापनाने दिल्या आहेत. आंदोलनाची सर्वाधिक झळ एसटीला बसल्यामुळे "बंद'च्या दिवशी सेवा सुरू ठेवायची की बंद या संभ्रमावस्थेत...
ऑगस्ट 09, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघटनांकडून केल्या जाणाऱ्या राज्यव्यापी बंद आणि आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरासह पिंपरी-चिंचवडसाठी गुरुवारी (ता. ९) सात हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. आंदोलनकर्त्यांनी शांततेत आंदोलन करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी केले...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज पोलिस, वाहतूक, रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुरक्षेचा आढावा घेत बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता यंत्रणांनी अधिक दक्षता घ्यावी,...
ऑगस्ट 08, 2018
मिरज - मागासवर्गीय आयोगाने अहवाल सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितली आहे; तोपर्यंत मराठा आरक्षणाबाबत सरकार काहीच करु शकत नाही, अशी माहीती महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी ते बोलत होते. उद्याचे आंदोलन मराठा आंदोलकांनी संयमाने व हिंसाचार न...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई : राज्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या (ता. 9) राज्यभर आरक्षणाच्या मुद्यावर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनास सक्रिय सहभाग आणि पाठींबा देण्यासाठी  कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांनी विधानभवन प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर 'आत्मक्लेश' आंदोलन...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना मराठा आंदोलकांनी आंदोलन करणे चूक आहे, असे स्पष्ट मत मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले. त्याच वेळी, आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांबाबत चिंताही व्यक्त केली. कोणतीही हिंसक पावले उचलू नका, प्रत्येकाचा जीव...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - भाजपच्या खासदार हीना गावित यांच्या मोटारीवर केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांच्या हल्ल्याचा निषेध मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. कोणत्याही महिलेला त्रास होणार नाही, ही मराठा आंदोलनाची आचारसंहिता आहे. मात्र, धुळेच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेला प्रकार निश्‍चितच...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाची सुरवात आपल्यापासून झाल्याचा दावा आमदार विनायक मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. ""गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सरकारबरोबर संघर्ष करत असून, आरक्षणाचे नाव घेण्यासही समाजातली लोक धाडस दाखवत नव्हते, तेव्हा मतांचा...