एकूण 666 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
तिच्या आवाजात सहसा न आढळणारी लवचिकता, उच्चारात स्पष्टता व संवादफेकीत लयबद्धता आहे. कधी ती नुसती डोळ्यानंच बोलते. कधी केवळ डोक्‍यावर पदर घेण्याच्या लकबीतून तिला काय म्हणायचं आहे, ते सांगून टाकते. तिचं उभं राहणं, पाहणं आणि चालणंदेखील अभिनयाचा वस्तुपाठ आहे. एवंगुणवैशिष्ट्यानं मंडित असलेल्या रोहिणी...
ऑक्टोबर 10, 2019
जिच्या वयालाही तिच्या सौंदर्याचा हेवा वाटावा अशी केवळ बाह्य रुपानेच नाही तर मनानेही तितकीच सुंदर असणारी सौंदर्यवती म्हणजे रेखा. जस जसं वय वाढेल तसा रूपाचा देखणेपणा कमी होतो हा निसर्ग नियमच आहे पण सौंदर्य टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि त्या बाबतची जागरूकता या दोन गोष्टींमुळे अलीकडच्या काळात फार...
ऑक्टोबर 10, 2019
बॉलीवूडमध्ये गेले अनेक वर्ष आपला ठसा उमटवणार्या आयकॉनीक रेखा यांचा आज वाढदिवस. आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये रेखा यांनी 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. रेखा यांनी अनेकदा मुख्य प्रवाहातील चित्रपटांबरोबर  समांतर सिनेमांमध्ये काम करणं पसंत केलंय.  रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रेखा...
ऑक्टोबर 10, 2019
सिलसिला, इजाजत, उमराव जान, खुबसूरत अशा चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी रेखा! आज रेखाचा 64वा वाढदिवस... भानुरेखा गणेशन असं मूळ नाव असलेल्या रेखाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर 'रेखा' नाव वापरण्यास सुरवात केली. तिचं आयुष्य हे रहस्यमयी व इंटरेस्टिंग आहे. तिच्या जीवनात अनेक चढ...
ऑक्टोबर 07, 2019
नवी दिल्ली : गोव्यात आयोजित होणाऱ्या 50व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये  यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित...
सप्टेंबर 29, 2019
महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाचा दादासाहेब फाळके सन्मान जाहीर झाला आहे. अभिनयाचा मानदंड असलेले अमिताभ यांच्याबरोबर त्या पुरस्काराचाही हा गौरव. त्या निमित्तानं गेली पन्नास वर्षं अमिताभ यांचे रंगभूषाकार म्हणून काम करणारे दीपक सावंत यांनी व्यक्त केलेल्या भावना. अमिताभ बच्चन यांना ‘दादासाहेब फाळके...
सप्टेंबर 26, 2019
किरकोळ शरीरयष्टी आणि ताडमाड उंची असल्यानं त्याला सिनेमात काम द्यायला कोणी तयार नव्हतं...वजनदार आवाज असल्यानं त्याला आकाशवाणीवर प्रवेश नाकारला गेला.. अभिनेता होण्यासाठीचे कोणतेही गुण अंगी नसल्याचं जणू शिक्कामोर्तबच झालं; पण हे सगळं खोटं ठरवत तो ‘तरुण’ नुसता नायकच नव्हे तर ‘महानायक’ झाला आणि...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : संघ परिवारातील स्वयंसेवकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेशीमबागातील स्मृतिमंदिरात गेल्या दोन वर्षांपासून संघाशी संबंध फारसा नसलेल्या व्हीव्हीआयपींची वर्दळ वाढली आहे. देशातीलच नव्हे, तर विदेशातील नेतेसुद्धा स्मृतिमंदिराला भेट देऊन संघसंस्थापक डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजींच्या समाधीचे दर्शन...
सप्टेंबर 25, 2019
पुणे -  ‘‘वय मोजत जगलो तर जगणंच विसरून जाल. माझ्यासाठी कधीच वयाची मर्यादा महत्त्वाची नव्हती, ना आता आहे. मी माझ्याप्रमाणे जगत राहणार. मनात जगण्याची ऊर्मी आणि उत्सुकता असावी लागते. ती मनातून येते आणि सांगते, की ‘हो, मला जगायचंय,’’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी मंगळवारी त्यांच्या ७५ व्या...
सप्टेंबर 23, 2019
कोल्हापूर - किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडतर्फे 9 ते 12 ऑक्‍टोबर दरम्यान 10 वा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये होत आहे. "प्लास्टिकला नकार वसुंधरेला होकार' या संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आहे, अशी माहिती किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लिमिटेडचे सीनिअर...
सप्टेंबर 21, 2019
मुंबई : रणवीर सिंग आणि आलिया भट यांच्या 'गली बॉय़' या ब्लॉकबस्टर चित्रपटाची ऑस्कर 2020 साठी निवड झाली आहे. ऑस्करच्या 92 व्या अकॅडमी अवॉर्डससाठी भारताकडून अधिकृतरित्या 'गली बॉय'ची निवड करण्यात आली आहे. ऑस्करच्या 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीमध्ये हा चित्रपट निवडला गेला आहे. फिल्म फेडरेशन ऑफ...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - ‘पिस्तुल्या’पासून ‘सैराट’पर्यंत झालेला प्रवास.... ‘सैराट’ची सुचलेली कथा... ‘जब्या’ कसा सापडला..अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा अनुभव....याची गुपितं उलगडतानाच उनाड विद्यार्थी, प्रख्यात दिग्दर्शक कसा झाला, याचे पैलू पुणेकरांसमोर शुक्रवारी उलगडत गेले ते संवेदनशील कवी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या...
सप्टेंबर 20, 2019
पुणे : चित्रपट क्षेत्रातील लोकप्रियतेमुळे राजकारणात येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर एखाद्या मुरब्बी राजकारण्यांच्या शैलीत देत कवी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता नागराज मंजुळे यांनी राजकारण्यासारखी क्षमता आपल्याकडे नसल्याचे सांगितले. मात्र, राजकारणात उतरणार का, तेव्हा कोणता पक्ष असेल, या प्रश्‍नांवर...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई : कलाकारांचा सन्मान करणारा सर्वांत मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे 'आयफा अॅवॉर्ड्स'! इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अर्थात आयफा पुरस्कार म्हणजे सर्व कलाकारांसाठी आनंदोत्सवच असतो. विविध देशांमध्ये होणारा हा पुरस्कार यावेळी मुंबईत साजरा झाला. यंदा आलिया भट आणि...
सप्टेंबर 16, 2019
पिंपरी - ‘मला हा पहिलाच पुरस्कार मिळाला आहे. आशा भोसले यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे ही स्वप्नापलीकडील गोष्ट वाटते. हृदयनाथ मंगेशकर हे द्रोणाचार्य असून मी एकलव्य आहे. मंगेशकर यांच्याकडून मिळालेले ज्ञान पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहे,’’ असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - बॅरिस्टर जयकर यांनी वास्तव्य केलेला जयकर बंगला हा पुण्याचे वैभव आहे. म्हणूनच हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. आता नव्या स्वरूपातील जयकर बंगला व त्यातील चित्रपटाशी संबंधित डिजिटल लायब्ररी चित्रपट अभ्यासक व रसिकांसाठी उपयुक्त ठरेल, असे मत केंद्रीय सूचना व माहिती...
सप्टेंबर 15, 2019
  ज्येष्ठ कवी-गझलकार रमण रणदिवे येत्या २० सप्टेंबर रोजी सत्तरी पूर्ण करत असून त्यांच्या काव्यलेखनालाही पन्नास वर्षं होऊन गेली आहेत. त्यानिमित्त त्यांच्या व्यक्तित्वाचा, त्यांच्यातल्या कवित्वाचा घेतलेला हा वेध...   ‘प्रौढत्वी निजशैशवास जपणे बाणा कवीचा असे’ असं कविवर्य केशवसुत गाऊन गेलेत....
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : वेगवेगळे रोल करून आपले बाॅलिवूडमध्ये बस्तान बसविणारा आजचा प्रसिद्घ असणारा अभिनेता म्हणजे आयुष्यमान खुराणा हा होय. या अभिनेत्याचा आज 35 वा वाढदिवस आहे. त्याने नेहमाच वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. त्याच्याविषया आज जाणून घेऊयात..          View this post on Instagram...
सप्टेंबर 12, 2019
पुणे - राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेत असते. मात्र, अधिकाऱ्यांकडून त्या निर्णयांची तंतोतंत आणि प्रभावी अंमलबजावणी होत नाही. जे समाजाच्या हिताचे आहे, त्याकडे दुर्लक्ष करायचे आणि हिताच्या नसलेल्या गोष्टींमध्ये मात्र जास्त रस घ्यायचा, असे अधिकाऱ्यांचे धोरण आहे. हे उलटे...
सप्टेंबर 12, 2019
मुंबई - महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या...