एकूण 839 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंटचे महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांनी झोपडीधारकांचा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा असून त्यांचे जागेवरच पुनर्वसन करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखल्याचे सांगितले. आमच्या प्रतिनिधीने कांबळे यांच्याशी साधलेला संवाद. निवडणुकीविषयीची आपली भूमिका काय? - बालपणी ...
ऑक्टोबर 18, 2019
ठाणे : विधानसभा निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून प्रचारासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. ठाणे जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी प्रचारफेरीच्या माध्यमातून मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर आता समाजमाध्यमांतून मतदारराजावर गारूड घालण्यास सुरुवात केली आहे. यात ठाण्यातील चारही विद्यमान आमदारांनी आपल्या...
ऑक्टोबर 17, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणता मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी राहील हे सांगता येत नाही. आतापर्यंत महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात कलम 370 हा मुद्दा प्रचारात असताना गेले दोन दिवस स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर हे प्रचाराच्या केंद्रस्थानी आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्यातील जाहीर सभेत...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई, ता. 16 : निवडणूक यंत्रणाही डिजिटायझेशनच्या स्पर्धेत उतरली असून, विविध सेवा एका क्‍लिकवर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आणलेल्या "सी-व्हिजिल' "एनजीआरएस सिटीझन' आणि "पीडब्लूडी' या तीन ऑनलाईन ऍपना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता मुंबई उपनगर जिल्ह्यात अपंगांसह सर्व...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 14, 2019
भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी अनेकदा आंदोलने झालीत. प्रत्येक निवडणुकीत त्यांना आश्‍वासने दिली जातात; पण नंतर ती सोईस्कररीत्या विसरलीही जातात. त्यामुळे अनेकदा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचेही निर्णय घेतले गेले. पण, आता गोसेखुर्द संघर्ष समितीने एकाच...
ऑक्टोबर 14, 2019
ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्य नेत्यांच्या सभा झाल्यानंतर प्रचारासाठी उरलेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रभागातील कोपरान्‌ कोपरा पिंजून काढताना दिसून आले. प्रचार रॅली, गृहसंकुलांना भेटीगाठी देत...
ऑक्टोबर 13, 2019
औरंगाबाद : राज्यात युती असताना भाजपच्या काही इच्छुकांनी केलेल्या बंडखोरी विरोधात भाजपतर्फे बडतर्फे करण्याची करवाई केली जात आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात पश्‍चिम मतदारसंघात आणि कन्नड येथे केलेल्या बंडखोरा विरोधातही संघटनमंत्र्यांशी बोलून कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव मंगळवारी रेशीमबाग मैदानावर सकाळी 7.40 वाजता प्रारंभ होणार आहे. एचसीएलचे संस्थापक, अध्यक्ष "पद्मविभूषण' शिव नाडर यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत राष्ट्राला संबोधित करतील. राष्ट्रीय...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर : माध्यमांमधून होणाऱ्या राजकीय चर्चांचा स्तर घसरला आहे. मनोरंजन म्हणून का होईना, पण त्याचा आनंद घेणारी जनताच या परिस्थितीसाठी दोषी असल्याचा सूर प्रमुख राजकीय पक्ष प्रवक्‍त्यांच्या चर्चेत उमटला. माध्यमांवरील चर्चा पूर्णत: "बिझनेस गेम' असल्याचा दावासुद्धा प्रवक्‍त्यांनी केला.  रविवारी...
ऑक्टोबर 06, 2019
गडचिरोली : प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाद्वारे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना "गार्जियन्स ऑफ ह्युमॅनिटी' या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजस्थानमधील माउंट अबू येथील विश्‍वविद्यालयाच्या जागतिक मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ....
ऑक्टोबर 02, 2019
गिरीश महाजनांचा षटकार  रोखण्याचा आघाडीकडून प्रयत्न  जामनेर : राज्यभरातील राजकारणी मंडळीचे लक्ष लागून असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघातून राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे आपली उमेदवारी गुरुवारी (ता. ३) दाखल करणार असल्याचे भाजप सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे काँग्रेस आघाडीच्या वतीने...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : वयाच्या निकषामुळे विधाधनसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. 75 वर्षाच्या निकषावर मात करत हरिभाऊ बागडे यांना फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी विषय असलेला सस्पेन्स सुद्धा संपला आहे. भाजपने जाहिर...
ऑक्टोबर 01, 2019
नाशिक : माणसाच्या आयुष्यातला सर्वांत मोठा दानधर्म म्हणजे रक्तदान असे म्हटले जाते. अपघात किंवा अन्य विविध कारणांमुळे रूग्णांना रक्‍तपिशवीची आवश्‍यकता भासले. विविध स्तरावरील संस्था व वैयक्‍तिक दात्यांच्या सहकार्याने रक्‍तपेढ्यांकडून रक्‍त संकलीत केले जात असले तरी सद्य स्थितीत मागणीपेक्षा उपलब्धता कमी...
सप्टेंबर 27, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनतर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगश्री पुरस्कारासाठी तीन उद्योजकांची निवड करण्यात आली आहे. सुधाकर ऊर्फ भाऊसाहेब कुलकर्णी यांची यशवंत कंपनी इंजिनियर्स, दुधाणे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, जे. पी. इंजिनियर्स यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वर्गीय...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : वडखळ-अलिबाग या २२ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. त्यासाठी १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला होता; परंतु निधीअभावी तो दुपदरी करावा, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; मात्र...
सप्टेंबर 25, 2019
नागपूर : उस्मानाबादेतील 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाली अन्‌ "नेटकऱ्यांनी' निर्णयाचा खरपूस समाचार घेतला. विशेष म्हणजे या निर्णयाला आता धार्मिक रंग प्राप्त झाला असून, हे साहित्यप्रेम नसून धर्मपरिप्रसार असल्याच्या प्रतिक्रिया सोशल...
सप्टेंबर 24, 2019
भुसावळ : सध्या विधानसभा निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र राजकारणाची चर्चा सुरू आहे. मात्र, काल (22 सप्टेंबर) माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे यांनी काही महिलांशी चक्क "वनभाज्या' या विषयावर चर्चा केली. निमित्त होते चारठाणा (ता. मुक्ताईनगर) येथे आयोजित भाजी स्पर्धेचे.  चारठाणा हे गाव...