एकूण 2090 परिणाम
जून 16, 2019
नवी दिल्ली : महामार्गावरून (हायवे) प्रवास करताना टोल भरावा लागत असतो. मात्र, आता या टोलबाबत केंद्र सरकार नवी नियमवाली आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे या नव्या नियमावलीनुसार वाहनाचा प्रकार, दर याबाबत नवे वर्गीकरण केले जाणार असून, खासगी कारच्या टोलमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.  टोलच्या नियमावलीत...
जून 16, 2019
"देशात बेरोजगारीची समस्या आहे,' हे सांगणारी आकडेवारी सरकारी यंत्रणेकडून नुकतीच जाहीर झाली. या आकडेवारीनं रोजगारसंकटाचं गंभीर स्वरूप समोर आणलं आहे. शिवाय, "बेरोजगारीची समस्या जेवढ्या प्रमाणात असल्याचं चित्र विरोधकांकडून निर्माण केलं जात आहे तेवढ्या प्रमाणात ती अस्तित्वात नाही. उलट भरपूर रोजगार...
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
जून 14, 2019
महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या...
जून 13, 2019
नवी दिल्ली :  गुजरातच्या दिशेने सरकत असलेल्या 'वायू' चक्रीवादळाचे रूपांतर 'अतितीव्र' झाले असले तरी ते गुजरातच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या वादळामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर जोरदार वारे वाहणार असून, पावसाची शक्यता आहे. गुजरातेतील दहा जिल्ह्यांना बुधवारी दक्षतेचा आदेश देण्यात आला....
जून 13, 2019
घटनेतील ३७०व्या कलमाचे समर्थन करणारे विरोधी पक्ष पराभूत झाले आहेत, तर जगभर दहशतवादाच्या विरोधात लोकमत तयार झाले आहे. काश्‍मीरचा खास दर्जा संपवून देशात आपले राजकीय स्थान आणखी मजबूत करण्यासाठी ही अनुकूल संधी आहे, अशी मोदी सरकारची धारणा झाल्याचे दिसते. भा रतीय जनता पक्षाने केंद्रातील सत्ता राखल्याने...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
जून 11, 2019
माडाच्या झावळ्यांनी डोलणाऱ्या कर्नाटकाच्या किनारपट्टी भागातली मातीच कमालीची सकस. कारण, या मातीतूनच अनेक कलेचे कंद रुजले, फळले, फुलले. शास्त्रीय गायन, नृत्य, नाटक, ललित लेखन आदी अनेकविध कलांचा इथला परिपोष इतका अलौकिक पातळीचा, की तिथे रुजलेला कलावंत केवळ ‘भारतीय’ न राहता अवघ्या तारामंडळाचा झाला. अशा...
जून 10, 2019
मुंबई - राज्यातील महापौरांना विशेष प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार द्यावेत, या मागणीवर राज्यातील महापौर ठाम असून, ठरावाची सरकार दखल घेत नसल्याबद्दल महापौर परिषदेत खंत व्यक्त करण्यात आली. महापौर परिषदेने यंदाही विशेषाधिकाराचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच...
जून 09, 2019
बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मसुदा केंद्र सरकारनं खुला केला आहे. त्यावर जनतेच्या सूचना, हरकती मागवण्यात आली आहेत. इयत्तांच्या व्यवस्थेपासून परीक्षांच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल सुचवणाऱ्या या मसुद्यात नेमकं काय आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
जून 09, 2019
नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा कागदोपत्री उत्तम प्रतीचा आहे. विद्यार्थी आणि शिक्षकहिताच्या दृष्टीनं संपूर्ण चित्र योग्यच आहे. या सगळ्याचं चित्र प्रत्यक्षात उतरवणं यातच खरं कसब आहे. आजपर्यंत अशी अनेक धोरणं भारतीयांनी पाहिली आहेत; परंतु त्यांची प्रत्यक्षात योजना करताना मात्र आपली चांगलीच तारांबळ उडते....
जून 09, 2019
आरटीजीएस आणि एनईएफटी व्यवहारांवरचं सेवाशुल्क रद्द करण्याचा निर्णय रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरणात घेतला. हे व्यवहार म्हणजे नक्की काय आणि त्याचे काय परिणाम होतील आदी गोष्टींवर एक नजर. दैनदिन जीवनात आर्थिक व्यवहार करताना पैसे द्यावे किंवा घ्यावे लागतात. ते पूर्वी रोख स्वरूपात किंवा...
जून 06, 2019
‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
जून 04, 2019
नवी दिल्ली - नव्या शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यात त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून अहिंदी राज्यांतदेखील ‘हिंदी’ सक्ती करू पाहणाऱ्या केंद्र सरकारला आज पाहिली ठेच लागली. दक्षिणेतील राज्यांनी या धोरणाला कडवट विरोध केल्यानंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने यू-टर्न घेत धोरणाच्या मसुद्यात दुरुस्ती करत हिंदी भाषा...
जून 03, 2019
तारळे : राज्य सरकार गेली तीन वर्षे वृक्षारोपण मोहीम राबवित आहे. एक, चार कोटी करत गेल्या वर्षी तेरा कोटी वृक्षलागवड करण्यात आली. यातील किती झाडे जगली हा संशोधनाचा विषय आहे. मात्र ढोरोशी ता. पाटण या छोट्याशा ग्रामपंचायतीने फळबाग वृक्ष लागवड योजनेतून खातेदारांना घरपट्टीत सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय...
जून 03, 2019
जळगाव जिल्ह्याच्या व विशेषत: जळगाव लोकसभा क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे महामार्ग चौपदरीकरण म्हणजे "ग्रहण' लागलेले कामच म्हणावे लागेल. थेट जिवाशी संबंधित असलेल्या या कामास मंजुरी मिळून दहा वर्षे झालीत, तरी ते पूर्ण होऊ शकलेले नाही. या क्षेत्राचे खासदार उन्मेष पाटलांनी चौपदरीकरण तातडीने...
जून 02, 2019
राजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा नाही. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर...