एकूण 638 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेसाठी स. प. महाविद्यालयाच्या आवारातील झाडे तोडल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात याचिका दाखल करण्यात आली. महाविद्यालय प्रशासन, भाजप, महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती आणि पालिका यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. विधीचे शिक्षण...
ऑक्टोबर 17, 2019
 राजापूर - गावच्या सर्वांगीण विकासामध्ये लोकसहभाग, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योगदानाचा सुंदर मिलाफ करताना गावची नागरी स्वच्छता, यशस्वी ग्रामसभा आणि विविध वैयक्तिक व शासनाच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार योजनेसारख्या योजनांच्या माध्यमातून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या तालुक्‍यातील...
ऑक्टोबर 16, 2019
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांत ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने वनराई बंधारे बांधण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र बंधारे बांधण्यासाठी लागणाऱ्या गोणपाटच उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक ठिकाणी अडचणी येत आहे. त्यामुळे जर कोणाकडे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या असतील त्यांनी या सामाजिक हिताच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेज चौकातील स्वास्थ्य केंद्राचे डॉक्‍टर गेल्या तीन महिन्यांपासून दिसलेले नसल्याने, ते बेपत्ता आहे का असा प्रश्‍न विद्यार्थ्यांनी विचारला आहे. या अव्यवस्थेमुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना खासगी रुग्णालयाचे उपचार घ्यावे लागत आहेत...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्डे आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांना जबाबदार कंत्राटदार, विविध विभागांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी. तसेच, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. या प्रकरणी पोलिस प्रशासन आणि महापालिकेला कठोर शब्दांमध्ये उच्च...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
ऑक्टोबर 02, 2019
मुंबई - विकासाच्या नावाखाली एवढी झाडे कापू नका, की भावी पिढीला केवळ छायाचित्रांतच झाडे आणि फुलपाखरे पाहायला मिळतील, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य सरकार आणि मेट्रो रेल्वेला सुनावले. तोडलेली झाडे पुन्हा लावण्याचा दावा केला जातो; मात्र ही झाडे पुनर्रोपणानंतर जगायला हवीत, असेही खंडपीठाने स्पष्ट...
सप्टेंबर 30, 2019
पिंपरी - सर्व प्रकारचे कर नियमित भरूनही गेल्या काही वर्षांपासून रस्ते, पाणी, वीज यांसारख्या विविध सेवा सुरळीत मिळत नाहीत. यामुळे त्रस्त झालेल्या पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशनने आपल्या मागण्यांची सनदच तयार केली आहे. विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ही सनद देण्यात येणार आहे, अशी माहिती...
सप्टेंबर 27, 2019
नवी दिल्ली - पुणे आणि बारामतीचे जनजीवन विस्कळित करणाऱ्या व अनेक बळी घेणाऱ्या महावृष्टीतील पीडितांना मदतीबाबत आपण संवेदनशीलतेने पाहत असून, पुणेकरांना यातून सावरण्यासाठी तत्काळ मदत पाठविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, नियंत्रण कक्ष व...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. 21 ऑक्‍टोबरला जिल्ह्यातील बाराही विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्यासाठी 1610 वाहनांची आवश्‍यकता आहे. मात्र, वाहन देण्यास विविध विभागांकडून टाळाटाळ होत आहे. आतापर्यंत विविध विभागांकडून केवळ 200 वाहने...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : तुफान पावसामुळे पुणे शहराची दैना उडालेली असताना आणि अकरा जणांचा जीव गेलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र दिल्लीमध्ये शिवसेनेच्या बरोबरच्या युतीच्या जागा वाटपात मग्न होते. तर, खासदार गिरीश बापट पुण्यभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात बिझी होते. पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : वडखळ-अलिबाग या २२ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. त्यासाठी १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला होता; परंतु निधीअभावी तो दुपदरी करावा, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; मात्र...
सप्टेंबर 24, 2019
सातारा ः आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलातील सुविधा वापरता येणे शक्‍य आहे का, याची पाहणी नुकतीच प्रशासनाने केली आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी क्रीडा संकुलातील सुविधांचा वापर झाल्यास आंतरशालेय क्रीडा स्पर्धा, शिवाजी विद्यापीठस्तर क्रीडा...
सप्टेंबर 22, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टॅंडर्डायझेशन (आयएसओ) मानांकन मिळाले. ट्यू सूद साऊथ एशिया प्रा. लि. कंपनीने मूल्यांकन करून ‘आयएसओ ९००१: २०१५’ मानांकन दिले.  संपूर्ण विद्यापीठाला आयएसओ मानांकन मिळवणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील चौथे विद्यापीठ...
सप्टेंबर 19, 2019
कल्याण : विविध समस्यांनी ग्रासलेले डोंबिवली सोशिक शहर असल्याचे शहरातील विद्यानिकेतन शाळेने जाहीर केले आहे. विविध डे साजरे केले जात असताना ‘वर्ल्ड टॉलरन्स डे’च्या निमित्ताने उपरोधिकपणे या शहरातील नागरिकांच्या सोशिकपणाचे कौतुक केले आहे. तसेच शाळेने डोंबिवली सोशिक शहर असल्याबद्दल हे बक्षीस जाहीर करत...
सप्टेंबर 18, 2019
सोलापूर : शासनाकडून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविला जात असला तरी शाळा, महाविद्यालय परिसरासह सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे सिगारेट ओढले जात असल्याचे दिसून येत आहे. सोलापुरात सिगारेट ओढण्याचे अड्डे वाढत आहेत. सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असूनही...
सप्टेंबर 18, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...
सप्टेंबर 17, 2019
सातारा ः सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. सहापदरी रस्त्याचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. ज्या कंपनीला हे काम दिले गेले आहे, त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे किंवा अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत. त्याची चौकशी करावी, असे...
सप्टेंबर 16, 2019
बालेवाडी - बाणेर येथील मुंबई- बंगळूर महामार्गाजवळील सेवारस्त्यावर पडलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. येथून मार्गक्रमण करताना दुचाकीस्वारांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी वाहनचालकांची मागणी आहे. बाणेर येथील मुरकुटे...