एकूण 39 परिणाम
जून 12, 2019
दुसऱ्यांचे कौतुक कराच; पण सध्याच्या काळात मनातील ताणतणाव दूर करायचे असतील, तर स्वतःलाही शाबासकी द्या. प्रत्येकाला चांगल्या कामाच्या कौतुकाची अपेक्षा असते. एखादी गृहिणी नवीन काही पदार्थ केले, की आपल्या चेहऱ्याकडे पाहत असते. आपण पटकन चांगला अभिप्राय दिला तर ते एक प्रकारे तिच्या मनाला आनंददायक असते;...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
मार्च 08, 2019
   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण...
फेब्रुवारी 15, 2019
     गेल्या महिन्यात पुण्यात खेलो इंडियांतर्गत राष्ट्रीय स्पर्धा झाली. या स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावत महाराष्ट्रांच्या संघाने सांघिक कामगिरीचे दर्शन घडवले. प्रत्येक क्रीडाप्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नोंदवलेले यश हे कौतुकास्पद आणि इतर खेळाडूंसाठी उत्साह वाढविणारे,...
डिसेंबर 03, 2018
मिताली राजने नुकताच आयर्लंड विरुद्ध एक सणसणीत स्क्वेअर कट मारलेला पाहिला अन्‌ मला स्क्वेअर कटवर जिची हुकमत होती अशा महाराष्ट्राच्या भारती दातेची आठवण झाली. फरक एवढाच, की मिताली उंचीपुरी, बॉबकटवाली तर भारती बुटकी अन्‌ लांबसडक दोन वेण्या राखणारी! ओपनिंग बॅट्‌स (वु)मन आणि ओपनिंग बोलर अशी दोन्ही...
नोव्हेंबर 15, 2018
एसएनडीटी विद्यालयाच्या माझ्या विद्यार्थिदशेतील म्हणजे 1989मधील ही घटना आहे. मी संगीत विषयात एम.ए. करत होते. त्या वर्षी मुंबईला झालेल्या युवा महोत्सवातील मी शास्त्रीय संगीत स्पर्धेत यशस्वी होऊन उदयपूरला गेले. तिथे झालेल्या पश्‍चिम विभागीय स्पर्धेत माझा क्रमांक आल्यामुळे मी आता राष्ट्रीय...
ऑक्टोबर 24, 2018
वंचिताचे जिणे लहानपणीच वाट्याला आले; म्हणून इतरांची वंचना होऊ नये यासाठी आयुष्यभर झटत राहिले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. मला मामाच्या घरी राहणे भाग पडले. शिक्षणाची तीव्र इच्छा होती, पण ते शक्‍यच झाले नाही. स्त्रियांना घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडता येत नसे. घरातील सर्व कामे करावी लागत....
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
जुलै 31, 2018
2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...
जुलै 03, 2018
साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. त्यावेळी गरवारे कॉलेज मध्ये मी ग्रॅड्युएशनला होतो. बाईक जोरात चालवायची आणि कचकन ब्रेक मारायचा. गाडीवर स्टंट करायचे म्हणजे लोक आपल्याला वळून बघतात आणि आपल्याला "काय मस्त गाडी चालवतो'' म्हणतात असा गैरसमज मनामध्ये होता. त्या वेळी वडिलांनी नवीन बाईक घेऊन दिली होती....
मे 26, 2018
मंगेशकर भगिनींच्या आवाजाचा निस्सीम चाहता असल्याने एका अनोखा छंद जोपासला गेला. या छंदामुळेच मला लता मंगेशकर यांच्यासह सर्व भगिनींना थेट भेटून बोलता आले. आयुष्यात समजायला लागल्यापासून ज्या सुरांनी अव्याहतपणे मनावर अधिराज्य गाजवलं ते सूर म्हणजे अर्थातच मंगेशकर या वलयांकित नादब्रह्माचे. शाळेत असताना...
एप्रिल 27, 2018
बुद्धिबळाच्या पटावरील घरांमधून प्यादी, हत्ती, घोडे, उंट चालवण्याच्या नादाने ते सारे घरच बुद्धिबळाचे नादी बनले आहे. माझे वडील मोहन फडके ऊर्फ अण्णा यांना तरुण वयातच बुद्धिबळाची गोडी लागली. त्या वेळी ते आपली आवड भागवण्यासाठी मामा व इतर भावंडे यांच्याबरोबर डाव मांडून बसायचे. त्यानंतरच्या काळात त्यांना...
एप्रिल 21, 2018
ई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे नेतो, आनंद देतो, सहानुभव देतो. या सुंदर भूतलावरील आपले आगमन आणि निर्गमन या गोष्टी प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात अटळ असतात. आपल्या आगमनाने सारे आप्त...
एप्रिल 12, 2018
गेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून...
एप्रिल 05, 2018
शस्त्र नव्हे, मनातला विश्‍वास महत्त्वाचा. गुंड मनाने दुबळे असतात म्हणून शस्त्र बाळगतात. नम्रपणा व आत्मविश्‍वास हीच सज्जनांची ताकद असते. पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळी दहा वाजले असावेत. नगरचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांचा ‘सरहद’च्या क्रमांकावर दूरध्वनी आला. मी फोन घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘कुठे...
फेब्रुवारी 13, 2018
पहिल्या नोकरीचे गाव अजूनही मनात वसले आहे. कोकणातील निसर्ग, अंगाला शेतीतल्या कामाचा गंध येणारे विद्यार्थी पुन्हा आठवले आणि पावले त्या गावाकडे वळली. मुंबई-गोवा महामार्गावरचे खारेपाटण हे एक छोटे गाव. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील. पदवी मिळाल्यावर दोन वर्षं तिथल्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले आणि...
जानेवारी 30, 2018
अचानक पैसे सापडले. सत्तर हजार. काही क्षण मोहही झाला. पण लगेच संस्कार जागे झाले. ज्याचे त्याला पैसे परत केले, त्यामुळे एकावर शस्त्रक्रिया होऊ शकली. संस्कारांचे महत्त्व जीवनात अनन्यसाधारण आहे. आम्ही चार वर्षांपूर्वी नागपूरला होतो, तेव्हाची गोष्ट. माझी मैत्रीण रश्‍मी पांडे आणि मी गिरी पेठेतील गजानन...
जानेवारी 06, 2018
विदुला उत्तम ज्युडो खेळाडू होती. तिने अनेक राष्ट्रीय ज्युडो स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या व्यक्तीला ती लीलया पाडत असे. असाच खेळ तिला चार वर्षे कर्करोगाशी खेळावा लागला. नातवाचे बारसे थाटात झाले. मुलगी आदिती विशाखापट्टणला तिच्या घरी गेली. सगळे...
डिसेंबर 04, 2017
तुमच्या ‘बारी’ कादंबरीवर चित्रपट काढायचाय, असं सांगताच रणजित देसाई प्रचंड संतापले; पण ते जिद्दीनं त्याला सामोरे गेले... ‘नागीण’ हा माझे पती रमाकांत कवठेकर यांचा पहिला चित्रपट. त्याची कथा प्रसिद्ध लेखक रणजित देसाई (दादा) यांची होती. चित्रपटासाठी कथा पाहिजे म्हणून हे दादांना भेटायला गेले, तेव्हाचा...
ऑक्टोबर 29, 2017
रावसाहेब’ या पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील हे वाक्‍य... ‘काही काही माणसं वीस-वीस, पंचवीस वर्षांच्या परिचयाची असतात; पण शिष्टाचाराची घडी मोडण्यापलीकडे त्यांचा अन्‌ आपला कधी संबंधच येत नाही आणि काही माणसं क्षणभरात जन्मजन्मांतरीचं नातं जमवून जातात!’ या वाक्‍याचं प्रत्यंतर आयुष्यात खरं तर प्रत्येकालाच...