एकूण 434 परिणाम
जुलै 17, 2019
कटिहार (बिहार) -  बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.  ‘आमची घरे पुरात उद्‌ध्वस्त झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उंदीर खाऊन जगावे लागत आहे. पाण्यामुळे उंदीर बाहेर आले...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः गोव्यात कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या दहा आमदारांनी आज नवी दिल्लीत भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला. चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली या दहा जणांना घेऊन दिल्लीत आलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दुपारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. संसद भवनात झालेल्या अर्धा तासाच्या...
जून 26, 2019
कोलकता : आणीबाणीचा आज स्मरण दिन आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देशात "सुपर इमर्जन्सी' लागू आहे, अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्‌विटरवर केली आहे. ट्विट करताना म्हटले की, गेल्या पाच वर्षांत भारतात आणीबाणीसदृश्‍य स्थिती आहे. आपण इतिहासाकडून काहीतरी शिकले पाहिजे. लोकशाहीचे...
जून 21, 2019
बंगळूर : कर्नाटकातील आघाडी सरकारला धर्मनिरपेक्ष जनता दलाकडून (जेडीएस) कोणत्याच प्रकारचा धोका नाही. तसेच विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुकीचा कोणताच प्रस्ताव मी पुढे केला नसल्याचे स्पष्टीकरण माजी पंतप्रधान व जेडीएसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी दिले. ते पत्रकारांशी बोलत होते....
जून 17, 2019
कोलकता ः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या दीड तासाच्या चर्चेनंतर पश्‍चिम बंगालमधील डॉक्‍टरांनी त्यांचा आठवडाभर सुरू असलेला संप मागे घेतला. चर्चेदरम्यान डॉक्‍टरांनी त्यांच्यासमोरील अडचणींचा पाढा वाचला; त्यावर लगेच कृती करण्याचे आश्‍वासन ममता बॅनर्जी यांनी दिले आणि संप मागे...
जून 14, 2019
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत आल्यानंतर लगेच भाजपने संघटना वाढीवर लक्ष केंद्रित करताना सव्वादोन कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठरवले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व पक्षाचे उपाध्यक्ष शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान पूर्ण झाल्यानंतरच नवे राष्ट्रीय अध्यक्ष आणि...
जून 11, 2019
कोलकता ः 'बंगाल म्हणजे गुजरात नव्हे,' असा हल्ला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केला असून, भाजप राज्यात अशांतता माजवीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपविरुद्ध आवाज उठविणारी मी एकमेव असल्यामुळे माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.  लोकसभा निवडणुकीत...
जून 09, 2019
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्ष काँग्रेसचा सत्तेत राहण्याचा विक्रम मोडीत काढणार असून भाजप 2047 पर्यंत सत्तेत राहील असा दावा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव यांनी केली आहे. स्वातंत्र्यानंतर भारतात सर्वात जास्त काँग्रेस सत्तेत राहिली आहे. मात्र, मोदीजी काँग्रेसचा विक्रम तोडतील. असा दावा...
मे 21, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बहुतेक मतदानोत्तर कल चाचण्यांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त झाला असला, तरी विरोधक मात्र या चाचण्यांवर विश्‍वास ठेवण्यास तयार नाहीत. विशेषत: प्रादेशिक पक्षांनी या चाचण्यांकडे दुर्लक्ष करीत...
मे 20, 2019
बंगळूर - राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निमंत्रणावरून कर्नाटकातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झाले आहेत. राज्यातील काँग्रेस-धजद युतीत निर्माण झालेल्या तणावावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष दिनेश...
मे 16, 2019
भारतीय राजकारणात 2014 हे वर्ष कधीच विसरले जाण्यासारखे नाही, त्याला कारणही तसेच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीची (यूपीए) दहा वर्षांची सत्ता उलथवून लावण्यासाठी भाजपने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा चेहरा समोर केला अन् बघता बघता देशभर हाच चेहरा देशाचे भविष्य आहे असे वातावरण तयार झाले. आजच्याच...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि...
मे 12, 2019
सिमला : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास जम्मू-काश्‍मीरला विशेषाधिकार देणारे राज्यघटनेचे कलम 370 रद्द करू, असे आश्‍वासन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिले. येथील चंबा जिल्ह्यातील सभेत त्यांनी विरोधकांवर टीका केली. जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री उमर...
मे 11, 2019
पणजी : विधानसभा पोट निवडणुकीत माहिती हक्क कार्यकर्ते ऍड आयरीश रॉड्रिग्ज यांनी गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांना पाठिंबा जाहीर केला. पणजीवासियांनी राजकारण शुद्ध करण्यासाठी, कोणताही डाग नसलेले वेलिंगकर यांनाच निवडून देण्याचे आवाहन करतानाच सामाजिक कार्यकर्ते वेलिंगकर यांना पणजीत प्रचार...
मे 08, 2019
बंगळूर - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्‍यता व्यक्‍त होत असतानाच सिद्धरामय्यांच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी मागणी काँग्रेस आमदारांतून होऊ लागली आहे. चिक्कबळ्ळापूरचे आमदार डॉ. सुधाकर यांनी सोमवारी (ता. ६) तशी अपेक्षा व्यक्त करून पक्षश्रेष्ठींनी युतीचा...
मे 02, 2019
अहमदाबाद : यंदाच्या लोकसभेचा निकाल 23 मे रोजी जाहीर होणार असून, या निकालानंतर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार राहणार नाही. तसेच गुजरातमध्येही भाजपचे सरकार पडेल, असा दावा गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी केला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी...
एप्रिल 28, 2019
जागावाटप, समझोत्याचे गुऱ्हाळ अयशस्वी ठरल्याने दिल्लीतल्या सातही जागांसाठी आता तिरंगी लढत रंगणार आहे. भाजप, काँग्रेसने दिग्गजांना रिंगणात उतरवलंय, तर ‘आप’ची मदार तरुणांवर आहे. दिल्लीतल्या सातही जागांसाठी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध आप (आम आदमी पक्ष) अशा तिरंगी लढत रंगेल, हे स्पष्ट झालंय. काँग्रेस...
एप्रिल 20, 2019
माजी पंतप्रधान आणि कर्नाटकाचे भूमिपुत्र (‘मन्नीन मगा’) एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे दोन नातू लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. सध्या त्यांच्या कुटुंबात एक मुख्यमंत्री, एक कॅबिनेट खात्याचे मंत्री, एक आमदार, एक जिल्हा पंचायत सदस्य अशी पदे आहेत. आता देवेगौडांच्या संपूर्ण कुटुंबानेच लोकसभेसाठी प्रचाराच्या...
एप्रिल 15, 2019
पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राफेल करारामुळे गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांना गोव्यात पुन्हा परतावे लागले असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे पर्रिकर कुटुंबाला मोठा धक्का बसला असून याचे भावनीक उत्तर देणारे पत्र मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी...
एप्रिल 12, 2019
मठ, मंदिर यांच्याभोवतीचे राजकारण कर्नाटकमध्ये नवे नाही. ही मतपेढी पदरात पाडून घेण्यासाठी भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यामध्ये चढाओढ असते. याच कारणाने राष्ट्रीय नेत्यांची पावले मठ, मंदिरांकडे आपसूकच वळतात. विविध मठाधीश राजकारणापासून दूर दिसत असले, तरी त्या-त्या...