एकूण 75 परिणाम
जून 03, 2019
बेळगाव - भुतरामहट्टी राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना यापुढे जंगलचा राजा ‘सिंहा’चे दर्शन घडणार आहे. वन विभागाने पाठविलेल्या प्रस्तावाला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने अनुमती दिल्यामुळे भुतरामट्टीत वाघ आणि अस्वलाबरोबरच सिंहही दिसणार आहेत.  सिंह म्हैसूर प्राणीसंग्रहालयातच आहे. आता...
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
फेब्रुवारी 10, 2019
नवी दिल्ली : बेरोजगारी वाढल्याच्या मुद्यावरून राष्ट्रीय पातळीवर चर्चा होत असतानाच मोदी सरकारने 2017 ते 2019 या काळात विविध सरकारी, निमसरकारी संस्थांद्वारे 3.79 लाख नोकऱ्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. नुकत्याच सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात याबाबत सरकारने माहिती दिली आहे. ...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : शबरीमला येथील अय्यप्पा मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा आणि बिंदू या दोन महिलांना चोवीस तास सुरक्षा पुरविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज केरळ पोलिसांना दिले.  बिंदू (वय 42) या भाकपच्या मार्क्‍सवादी-लेनिनवादी गटाच्या कार्यकर्त्या असून कनकदुर्गा (वय 44) या नागरी पुरवठा विभागात काम...
जानेवारी 06, 2019
नवी दिल्ली : बेकायदा वाळू उत्खननप्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यादव यांच्याशी संबंधित सर्व खटल्यांचे दस्तावेज पुन्हा एकदा पडताळून पाहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्रिपदी असताना अखिलेश यांच्याकडे...
जानेवारी 05, 2019
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या मालकीची माध्यम संस्था "प्रसार भारती'ने आता "ऑल इंडिया रेडिओ'च्या राष्ट्रीय वाहिन्या आणि अन्य पाच राज्यांतील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत्या खर्चाला कात्री लावण्याबरोबरच सर्व सेवांचे एकत्रीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात...
जानेवारी 03, 2019
बिहारशरीफ : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात संतप्त जमावाच्या मारहाणीत दोन जण ठार झाले. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या खुनामुळे जमाव अनावर झाला होऊन ही घटना घडली.  "राजद'...
जानेवारी 01, 2019
नवी दिल्ली- देशात 2015 पासून शेतकरी आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नसल्याच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो-एनसीआरबी) माहितीमुळे नाराज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच सरकारवर...
डिसेंबर 30, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही त्यांना...
डिसेंबर 28, 2018
नवी दिल्ली : सरकारने आता रेल्वे सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी पहिले पाऊल उचलले असून, या दलाच्या सुरक्षा साहित्यामध्ये छुपे कॅमेरे, फायरिंग सिम्युलेटर्स, बॉडी कॅमेरे आणि अन्य आधुनिक गॅझेटचा समावेश असेल. या आधुनिक संसाधनांची खरेदी करण्याचे सर्वाधिकार रेल्वे पोलिसांना दिले असल्याचे रेल्वे मंडळानेच...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली : कर्जबाजारीपणा, हमीभाव यांसारख्या कारणांमुळे शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत आहेत. मात्र, या आत्महत्यांची नोंदच सरकार दफ्तरी नसल्याचे समोर आले आहे. मागील तीन वर्षांपासून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंग यांनी...
डिसेंबर 17, 2018
नवी दिल्ली : देशातील प्रसिद्ध वारसा स्थळांचा प्रवाशांना आभासी प्रवास घडवून आणण्याची रेल्वेने योजना आखली असून, त्यानुसार प्रवासादरम्यान किंवा शाळेतील वर्गात बसल्या ठिकाणी स्थळदर्शन घडवून आणण्यात येणार आहे. ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी गुगलचे तंत्रज्ञान मदत करणार असून, थ्रीडी चष्म्याची आवश्‍यकता...
डिसेंबर 16, 2018
कल्याण : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर 'पप्पू' नव्हे तर पापा होण्याची वेळ आली आहे. म्हणून आता त्यांनी लग्न करावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कल्याण येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आज (रविवार) दिला. कल्याण येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी रामदास आठवले...
नोव्हेंबर 22, 2018
अंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित "जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय बालनाट्य महोत्सवात यंदा "राजा सिंह' या एकमेव मराठी बालनाट्याची निवड झाली आहे. यासाठी आलेल्या शेकडो प्रवेशिकांमधून केवळ एका मराठी बालनाट्याची निवड...
नोव्हेंबर 19, 2018
पणजी : देशभरात 2018 हे वर्ष महात्मा गांधीचे 150 वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या जयंती वर्षाचे औचित्य साधत इफ्फी म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2018 मध्ये महात्मा गांधी यांना आगळ्या-वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. गोव्यात उद्यापासून सुरु होणाऱ्या 49व्या...
नोव्हेंबर 19, 2018
पाटणा : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अंतर्गत संघर्षामुळे आता बिहारमधील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. या सर्वोच्च तपास संस्थेचे संचालक आलोक वर्मा यांनी केंद्रीय दक्षता आयोगाला (सीव्हीसी) दिलेल्या माहितीमुळे बिहारमध्ये भाजपची चांगलीच कोंडी होऊ शकते. बिहारमधील भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी...
ऑक्टोबर 28, 2018
बंगळूर : वाद्‌ग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा रा. स्व. संघातील नेत्याच्या वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहेत, ज्याला...
ऑक्टोबर 23, 2018
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या सुमारे 128 कोटींच्या मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता आहे. बेहिशेबी मालमत्तेच्या कायद्यांतर्गत आयकर विभागाकडून ही कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. दिल्लीतील दोन घरे आणि पाटणातील बंगला...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्ली : सशस्त्र सीमा बलाच्या (एसएसबी) दोन हजार जवानांना इंटेलिजन्स ब्यूरोकडे (आयबी) वर्ग करण्यात आले. भारतीय सीमेवरील मनुष्यबळ वाढवून "आयबी'ची ताकद वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा हा एक भाग मानला जात आहे.  वर्ग करण्यात आलेले जवान हे "एसएसबी'च्या नागरी विभागातील आहेत. केंद्र सरकारने 12...
ऑक्टोबर 09, 2018
नवी दिल्ली : 'स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप'च्या (एसपीजी) अध्यक्षपदी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल यांची नियुक्त करण्यात आली आहे. अजित दोवल यांच्याकडे यापूर्वी 'एसपीजी'च्या कॅबिनेट सचिवपदाचा कार्यभार होता. मात्र, केंद्र सरकारने आता त्यांच्या जबाबदारीत वाढ केली आहे.    परदेशी...