एकूण 233 परिणाम
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही...
जून 09, 2019
मुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये  विक्री करायची....
जून 06, 2019
द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या किडीची अंडी घालण्यास सुरवात करते. अंडी अवस्थेत खोडकिडीचे नियंत्रण करणे तुलनेने सोपे असून, या काळातच नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात. द्राक्षबागेमध्ये...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत. सध्या या तालुक्यांपैकी दुष्काळाच्या सर्वाधिक झळा माण तालुका सोसत आहे. या तालुक्यातील शेकडो गावे अजूनही तहानलेली आहेत. यामुळे येथील जनतेला टँकरच्या पाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. दुष्काळामुळे शेतीचा...
मे 22, 2019
केळवद - पांरपरिक पद्धतीने शेती न करता शेतीवर भविष्यात येणाऱ्या संकटाचा विचार करून मेहनत आणि योग्य नियोजन केल्यास त्यावर मात करता येते, हे सावनेर तालुक्‍यातील केळवदजवळील जलालखेडा येथील दिनेश मांडवकर या प्रगतिशील शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. गुलाबाच्या फुलशेतीतून एका एकरात एक लाख रुपयांचा...
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय...
मे 16, 2019
ठिबक सिंचनासारख्या आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध असल्यास रुंद वरंबा पद्धतीने लागवड  करावी. या पद्धतीने लागवड केल्यास गड्डे चांगले पोसतात. परिणामी, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. ज्या जमिनीत अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त, साहजिकच तिची सुपीकता जास्त असल्याने केवळ शाकीय वाढ जोमाने होते; परंतु अशा जमिनीत...
एप्रिल 26, 2019
बाजारातील मक्याच्या स्पॉट किमती सध्या हमीभावापेक्षा अधिक आहेत. मागणी चांगली आहे. रब्बी आवकेमुळे किमती उतरतील; पण त्या हमीभावाच्या आसपास राहतील. हळदीच्या जुलै २०१९ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. देशातील निवडणुकांमधील मतदान सुरू होऊन आता महिना झाला...
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
मार्च 12, 2019
दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली. आई आणि पत्नीच्या मदतीने व्यवसायात भरभराट घेतली. स्थानिकसह देशातील मार्केटही मिळवले. मोरगव्हाण (जि. नगर) येथील आजीनाथ जगदाळे आज शेतकऱ्यांकडून दूध...
मार्च 08, 2019
स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने ''आम्ही विणकर'' म्हणत एकत्र आलेल्या पैठण (जि. औरंगाबाद) येथील सावित्रीच्या साठ लेकींची रेशीम विभागाच्या आधारानं कंपनी स्थापन झाली. स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी मजूर ते मालक असा प्रवास केलेल्या या महिलांना एकाच ठिकाणी पैठणीनिर्मिती ‘क्लस्टर’चा लाभ मिळणार आहे....
मार्च 05, 2019
आजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच दिसून येतात. लातूर जिल्ह्यातील खंडाळी येथील विनायक पौळ यांनी मात्र ठाणे जिल्ह्यातील शिक्षकपदाची नोकरी सोडून शेतीतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. हळदीची शेती व दुग्धव्यवसाय यांचा योग्य मिलाफ घडवून त्यांनी शेतीला चांगला आकार दिला. स्वतःवरील विश्‍वास आणि...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
फेब्रुवारी 05, 2019
रोहणा (ता. आर्वी, जि. वर्धा) येथील अविनाश बबनराव कहाते यांनी बाजारपेठेची गरज ओळखून भाजीपाला लागवडीवर भर दिला. पीक उत्पादनवाढीसाठी लागवडीपासूनच नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. टोमॅटो, मिरची, हळद, आले या पिकांच्या जोडीला सोयाबीन, कपाशीसारख्या पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही वाढ साधली आहे...
जानेवारी 25, 2019
नागपूर - राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अधिस्वीकृतीप्राप्त रोपवाटिकेतूनच संत्रा, मोसंबी रोपांच्या खरेदीची सक्‍ती भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेच्या मुळावर उठल्याचा आरोप फळबागधारकांकडून होत आहे. आंबा, पेरूप्रमाणे या योजनेच्या अंमलबजावणीचे निकष बदलावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे...
जानेवारी 10, 2019
सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा व लसूण पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना कराव्यात. आयरिश येलो स्पॉट  हा विषाणूजन्य रोग असून, बीजोत्पादनाच्या कांदा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो...
डिसेंबर 18, 2018
सध्या रासायनिक अवशेषमुक्त (‘रेसिड्यू फ्री’) किंवा सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. ग्राहक आरोग्याबाबत जागरूक होऊन रसायन अंशमुक्त मालाची मागणी करू लागला आहे. त्याचबरोबर रसायनांच्या अमर्याद, असंतुलित वापरामुळे माती, पाणी व एकूणच पर्यावरणाची हानी होत आहे. त्या अनुषंगाने शेतकरी ‘रेसिड्यू फ्री’...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळच्या अलीकडे तीन किलोमीटरवर अनगरकडे जाण्यासाठी फाटा फुटतो. तिथून ८-१० किलोमीटरवर अनगर हे साधारण दहा हजार लोकसंख्येचं गाव आहे. गावात प्रवेश करतानाच दोन्ही बाजूने  झाडांची हिरवाई आपले स्वागत करते. अनगर परिसरात जवळपास अठरा वाड्या असून, त्यांचा राबता...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...