एकूण 28 परिणाम
एप्रिल 01, 2019
मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे.  राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे....
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११३ अंशांची वाढ झाली. तो ३६ हजार ५८२.७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १८.६० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१२.२५ वर बंद झाला. दिवाळखोरीत निघालेल्या...
जानेवारी 29, 2019
मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला. व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
नोव्हेंबर 30, 2018
मुंबई - जागतिक बाजारातील तेजी आणि वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने गुरुवारी (ता. २९) शेअर बाजारात तेजीची लाट आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ४५३ अंशांची उसळी घेत ३६ हजार १७० वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १२९.८५ अंशांची वाढ झाली आणि तो १०...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात सकारात्मक राहिलेला शेअर बाजार आजदेखील तेजीत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी वधारून 35,771 अंशांवर आहे. तर,...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी आरआयएलचे बाजारभांडवल 7 लाख 12 हजार 386.67 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) बाजारभांडवल सध्याच्या शेअरच्या...
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 79.13 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 158.55 अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स  १३१.५२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ८६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ४० अंशांची कमाई केली आणि तो १० हजार ५१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 16, 2018
मुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...
ऑक्टोबर 06, 2018
जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण, डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, इंधनाचे वाढते दर, अमेरिका आणि चीन दरम्यान टोकाला पोहचलेले व्यापार युद्ध, छोट्या देशांतील चलनांचे झालेले प्रचंड अवमूल्यन इतके सारे नकारात्मक वातावरण असताना भारतीय शेअर बाजाराचा वारू मात्र ऑगस्ट महिन्यामध्ये चौफेर उधळला होता...
ऑक्टोबर 05, 2018
मुंबई - खनिज तेलाची भाववाढ, रुपयाचे अवमूल्यन, रिझर्व्ह बॅंकेची संभाव्य रेपोदरवाढ आदी घडामोडींनी आज सेन्सेक्‍स आणि रुपया भुईसपाट झाला. अनिश्‍चित वातावरणाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी तुफान विक्री केल्याने दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स तब्बल ८०६ अंशांनी कोसळून ३५ हजार १६९...
सप्टेंबर 18, 2018
मुंबई - चलन बाजारातील कमकुवत रुपया, इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडण्याची शक्‍यता आणि अमेरिका-चीनमधील व्यापारीयुद्धामुळे शेअर बाजारात सोमवार गुंतवणूकदारांसाठी ‘ब्लॅक मंडे’ ठरला. विक्रीच्या माऱ्याने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५०५ अंशांनी कोसळून ३७ हजार ५८५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
सप्टेंबर 11, 2018
सेन्सेक्‍समध्ये घसरण; दोन लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका आणि चीनमधील व्यापारी संघर्षाची धग आज भारतीय शेअर बाजारांना जाणवली. रुपयातील अवमूल्यन आणि "मुडीज'चा नकारात्मक मानांकनाचा इशारा, देशांतर्गत अस्थिरता या घडामोडींना धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.10) तुफान विक्री केल्याने...
ऑगस्ट 27, 2018
मुंबई: देशातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक असलेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीने सकाळच्या सत्रात नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. सेन्सेक्सने सकाळच्या सत्रात तब्बल 400 अंकांची उसळी घेत 38,652 अंशांची नोंद केली. तर, निफ्टी देखील 115 च्या वाढीसह 11,671 या सर्वोच्च पातळीवर पोचला.  जागतिक बाजारांतील...
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट झाली आणि तो १०...
एप्रिल 11, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह...
जानेवारी 18, 2018
मुंबई - रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांची पश्‍चिम बंगालमध्ये पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान होणारे करार या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्‍स, निफ्टीने पुन्हा...
जानेवारी 17, 2018
मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर...
जानेवारी 12, 2018
मुंबई - कंपन्यांच्या तिमाही निकालांबाबत आशावादी असलेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर खरेदीने तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीने गुरुवारी (ता. ११) नवा उच्चांक नोंदवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ७०.४२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ५०३ अंशांच्या पातळीवर बंद झाला....