एकूण 17 परिणाम
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
जून 16, 2019
अभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो? असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल? शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...
फेब्रुवारी 17, 2019
सात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः ""तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत?'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः ""खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...
फेब्रुवारी 17, 2019
छकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः "खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं?' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती...
जानेवारी 13, 2019
  आम्ही केलेल्या अंदाजानुसार एका ठराविक झोपडीत तीनजण बसलेले होते. आम्ही ज्याच्या शोधात आलो होतो तो शांताराम आणि इतर दोन मुलं. शांतारामची बोटं झडली होती; पण त्याच्या चेहऱ्यावर आणि बाकी अंगावर रोगाचा फारसा परिणाम झालेला दिसत नव्हता. ""यांना ठाण्यात घेऊन चला,'' मी माझ्याबरोबरच्या कर्मचाऱ्यांना...
ऑक्टोबर 28, 2018
"वा! म्हणजे दुसऱ्या ऑफिसमध्ये जर मुलगी असेल तर पुन्हा तू हेच म्हणशील..."आता हीही नोकरी सोड आणि तिसरीकडं नोकरी पाहा,' मला स्वतःचं काही मत आहे की नाही? तूही नोकरी करतेस... तुलाही पुरुषांशी बोलाव लागतं. मग त्यातल्या कुणाबरोबर तुझंही काही प्रकरण असेल, असं मी म्हणतो का कधी?'' धो धो पाऊस पडत होता. "आज...
एप्रिल 29, 2018
मी गावाला जायला निघालो होतो खरा; पण माझा पाय काही इथून निघत नव्हता. माझ्यासमोरून गाड्या निघून जात होत्या. माझ्या डोळ्यांसमोर घर येऊ लागलं...आशेनं वाट पाहणारा अमोघ...तो नवीन पुस्तकांची वाट बघत असणार. गिरकी घेत बोलणारी राधिका...तिचं पहिला नंबर काढायचं प्रॉमिस...तिच्या चेहऱ्यावरचा आनंद... आणि...आणि या...
डिसेंबर 10, 2017
रोज शेकडो तरुण मुंबईत भाकरीचा शोध घेतात. सगळ्यांनाच ती सापडते, असं नाही. या शोधात मुंबईत या तरुणांचं काय होतं, हेही मुंबईला ठाऊक आहे. मुंबईला जाऊन आल्यानंतर बहुतेक तरुण सांगतात ः ‘नोकरी मिळेल, न मिळेल ती वेगळी गोष्ट; पण नोकरीच्या प्रयत्नात सरकारी परीक्षा देण्यासाठी जाणाऱ्या आम्हांसारख्या धडपड्या...
नोव्हेंबर 19, 2017
वाऱ्यावर उडत गेलेलं रुईचं एखादं बीज दूरदेशी पडतं आणि तिथं रुजतंदेखील. अंकुरतं. फुलतं. फळतंही. अशाच एका तिथं रुजलेल्या-फुललेल्या बीजाची आणि नंतर हे बीज आपली मायदेशातली मुळं कशी शोधून काढतं त्याची थरारक कथा म्हणजे ‘लायन’ हा चित्रपट. सरू नावाच्या तरुणाच्या ‘अ लाँग वे होम’ या आत्मकहाणीवर बेतलेला हा...
मे 20, 2017
बदलणाऱ्या काळानुसार भटकंतीच्या व्याख्या आणि निकषही बदललेले आहेत. वर्षातून एकदा आखली जाणारी 'फॅमिली ट्रीप' आता वर्षातून दोन ऋतूत निघते. एकदा हिवाळ्यात एकदा उन्हाळ्यात. त्याशिवाय जोडून येणाऱ्या सुट्ट्याचे नियोजन असते ते वेगळे. नोकरी, व्यवसायाच्या वाढत्या व्यापामुळे एक दिवसात चटकन बघता येतील अशी...
एप्रिल 21, 2017
सोमवारी पुण्यातील बाणेर रस्त्यावर असाच एक भीषण प्रसंग घडला. या अपघातामुळे पुण्याची वाहतूक पुन्हा चर्चेत आली आहे. वारंवार अशा घटना समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर...
मार्च 12, 2017
परीक्षांचा काळ सुरू झाला आहे आणि पुढचे एक-दोन महिने सगळीकडं परीक्षांचाच ‘माहौल’ असेल. विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि पालकांसाठीही हा ताणाचाच काळ. हा ताण हलका कसा करायचा, शैक्षणिक वर्ष अगदी शेवटच्या टप्प्यावर असताना अभ्यासाची ‘स्मार्ट’ पद्धत कोणती, राहून गेलेला अभ्यास भरून कसा काढायचा,...
फेब्रुवारी 19, 2017
माणसाचं मन बदलणं, मत बदलणं, सवय बदलणं ही एक अतिशय अवघड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्रत्येक वेळी ती चित्र, शब्द किंवा आवाजानं साध्य होतेच असं नाही. मात्र, आपल्याला अमूक अमूक सवय बदलायची आहे, हे एकदा नक्की झालं की निरीक्षण, व्यवहारज्ञान आणि जिज्ञासू वृत्ती यांचा मेळ घालून ती बदलण्यासाठीचा उपाय...
डिसेंबर 04, 2016
‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य संपादक श्रीराम पवार यांना मी काही दिवसांपूर्वी फोन केला आणि ‘आता हे सदर या वर्षाच्या अखेरीस थांबवण्याची माझी इच्छा आहे,’ असं त्यांना कळवलं. या महिन्याच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये या सदराला साडेचार वर्षं पूर्ण होतील. कधी कधी काही मुद्दे मला महत्त्वाचे वाटल्यानं...
नोव्हेंबर 20, 2016
स्वयंचलित दुचाकी किंवा चारचाकी चालविताना ड्रायव्हिंगचा आनंद मिळतो; पण सायकल चालवताना आपलं नातं जमिनीशी आहे हा ‘फिल’ येतो आणि तो मला महत्त्वाचा वाटतो. मनातला अहंकार किंवा ‘मी’पणा नकळत गळून पडतो. रस्त्यावर आपल्या बाजूनं जाणारे सामान्य लोक, कष्टकरीवर्ग यांच्याशी स्वतःला ‘रिलेट’ करता येतं. सायकल...
ऑक्टोबर 25, 2016
आपण धडधाकट माणसं बहुतांश वेळी आपल्याकडं काय नाही याचं तोंडाचा चंबू करून वर्णन करत बसतो. दिव्यांग खेळाडूंची जिद्द बघितल्यावर आपल्याला खऱ्या समस्यांची जाणीव होते. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण ‘काय नाही’पेक्षा देवानं, निसर्गानं आपल्याला ‘काय दिलं आहे,’ याचे मनोमन आभार मानून पुढं सकारात्मक विचारांनी...
ऑक्टोबर 25, 2016
‘अभ्यासाला खेळाची जोड दे, बघ, पोर कसं टणाटणा उड्या मारतंय’ आजीच्या या प्रेमळ सल्ल्याला डॉक्‍टरांनीही पुष्टी दिली. याची प्रचिती माझा मुलगा प्रकल्प याच्या अनुभवातून मला आली. प्रकल्प सात वर्षांचा असताना माझे यजमान विकास आणि माझी बदली पुण्यात झाली. पुण्यातलं जून ते सप्टेंबरपर्यंतचं हवामान दोन-तीन वर्षं...