एकूण 128 परिणाम
नोव्हेंबर 17, 2019
ब्रिटिश राजवटीच्या काळात क्रांतिकारकांना आश्रय देणारे एक खासगी घर ताब्यात घेऊन त्याला वारसा दर्जा देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारने केला आहे. विख्यात बंगाली क्रांतिकारक बटुकेश्‍वर दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. केंद्र आणि राज्य वादातून सरकारने हा निर्णय केला आहे. वर्धमान जिल्ह्यातील ओआरी...
नोव्हेंबर 12, 2019
भारत व पाकिस्तान यांच्या संबंधातील गोठलेपण आणि वाढता तणाव या पार्श्‍वभूमीवर कर्तारपूर मार्गिका हा सुखद अपवाद म्हणावा लागेल. मात्र, पाकिस्तानचा पूर्वेतिहास लक्षात ठेवून याबाबतीत सावधानता बाळगण्याला पर्याय नाही. आपापल्या कोषात जाण्याची जणू अहमहमिका लागली असावी, असे सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील...
नोव्हेंबर 04, 2019
प्रचंड जिद्द, इच्छाशक्ती, चिकाटी आणि ध्येय गाठण्यासाठी कठोर मेहनतीची तयारी असेल; तर गावखेड्यातील व्यक्तीसुद्धा मोठी झेप घेऊ शकते, हे अमरावती जिल्ह्याच्या धामणगाव रेल्वे तालुक्‍यातील सतीश खंडारे यांनी दाखवून दिले आहे. जम्मू-काश्‍मीरचे विभाजन झाल्यानंतर ३१ तारखेला अस्तित्वात आलेल्या लडाख...
ऑक्टोबर 30, 2019
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अनेक क्षेत्रात खासगीकरणाचा घाट घातल्याचे आतापर्यंत केवळ आरोप होत होते. आता मात्र, त्याचे चित्र दिसू लागले आहे. देशातील ५० रेल्वेस्थानके आणि १५० गाड्यांचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील ४०० रेल्वेस्थानकांना खासगीकरणाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची...
ऑक्टोबर 07, 2019
शिवसेनेची आक्रमकता ही कितीही अगतिक असली, तरी त्यातच मर्दानगी आहे, हे ते आपल्या मतदारांना पटवून देऊ शकतात. नेमका तसाच प्रयत्न ‘आरे’तील वृक्षतोडीच्या प्रश्‍नावर चालू असल्याचे दिसते. हातात तलवार घेऊन युद्ध करणारे योद्धे आपणांस माहीत आहेत. परंतु काही नेते केवळ तलवारीच्या म्यानाने युद्ध करतात. त्याचे...
सप्टेंबर 17, 2019
विदर्भाला स्त्रीशक्तीचा अभिमानास्पद पौराणिक, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अनेक विदर्भकन्यांनी आजवर वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्व गाजवले आहे. विविध क्षेत्रांत मुली विदर्भाचा झेंडा आज पुढे नेत आहेत. आता एका नव्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे आणि ते क्षेत्र आहे एसटी बस चालविण्याचे. राज्य मार्ग...
सप्टेंबर 06, 2019
‘ऑरिक’ अर्थात ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी’च्या ‘शेंद्रा नोड’ने ३६०० कोटींपेक्षा अधिक, तर ‘बिडकीन नोड’ने ५८०० कोटींची बंपर गुंतवणूक पटकावली आहे. ‘डीएमआयसी’च्या सगळ्या ‘नोड’ना मागे टाकत शेंद्रा आणि बिडकीनने ही महाकाय गुंतवणूक मिळवली आहे. ही सकारात्मक वाटचाल पाहता, आता ‘ऑरिक’ने आपल्या परिघाबाहेर...
ऑगस्ट 29, 2019
पूर्वीच्या ठाणे जिल्ह्यात पालघर तालुका (आता जिल्हा) होता. मच्छीमार, आदिवासी, कोळी, आगरी, भंडारी  आदी जाती-जमातींचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्‍याचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार आणि सामाजिक कार्यकर्ते, अशी नवनीतभाई शहा यांची ओळख. भाईंनी आपला व्यवसाय सांभाळतानाच संपूर्ण आयुष्य सार्वजनिक जीवनात...
ऑगस्ट 07, 2019
साल : २०२४. वेळ : दुपार्ची. स्थळ : डाल लेक परिसर, श्रीनगर, इंडिया! सकाळीच बुलेट ट्रेनने श्रीनगर ऊर्फ नौगाम रेल्वे स्थानकात उतरलो. हल्ली मुंबई-श्रीनगर रेल्वे प्रवास अक्षरश: सहा तासांचा झाला आहे. नौगामच्या हमालाने ब्याग उचलायचे तीनशे रुपये सांगितले. आम्ही पाठीवर ब्याग घेऊन...
जुलै 29, 2019
बालकवींच्या कवितेमुळे मनामनांत रुतून बसलेला श्रावणमास आठ दिवसांवर येऊन ठेपेपर्यंत वरुणराजा महाराष्ट्रावर रुसला होता. मात्र, अचानक गेल्या आठवड्यात ‘गडद निळे गडद निळे जलद’ क्षितिजावर दाटी करू लागले आणि गेले तीन दिवस महाराष्ट्राच्या बहुतेक भागांवर अक्षरश: कोसळले. भुरभुरणाऱ्या श्रावण सरींचा विलोभनीय...
जुलै 24, 2019
चांद्रयान-2 ह्या भारतीय बनावटीच्या अंतराळयानाचे अखेर आठवडाभर लेट का होईना पण डिपार्चर झाले, ह्याबद्दल आम्ही समस्त भारतीयांचे हार्दिक अभिनंदन करितो. ह्या डिपार्चरबद्दल प्रारंभी आम्ही (अनवधानाने) रेल्वे खात्याचेच अभिनंदन करू लागलो होतो. पण श्रीहरिकोटा येथील काही शास्त्रज्ञांनी फोन करून "...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
जुलै 04, 2019
मुंबई आणि पुणे परिसरातील पावसाचे थैमान हळूहळू कमी झाले असले, तरी राज्यभरात अन्यत्र पावसाचा जोर कायम आहे आणि पावसाच्या या तडाख्यात रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. या आपत्तींसाठी मुसळधार पावसाकडे बोट दाखविण्यात येत असले, तरी हे सारे जीव समाजात फोफावलेल्या '...
जून 28, 2019
आदरणीय माननीय श्रीमान उधोजीसाहेबांच्या चरणी लाख लाख दंडवत आणि कोटी कोटी मानाचे मुजरे. पत्र लिहिण्यास कारण की काल रोजी बॉम्बेमध्ये यशवंतराव प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मी जातीने हजर होतो. तेथे केलेल्या भाषणात आपण आपल्या सर्व मावळ्यांना, मंत्र्यांना आणि आमदारांना...
जून 23, 2019
‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प हे चीनचे भूव्यूहात्मक पाऊल आहे. त्याच्या माध्यमातून आर्थिक, राजनैतिक व लष्करी सत्तेचा विस्तार करण्याचे स्वप्न चीनला साकार करावयाचे आहे. मात्र, या प्रकल्पामुळे काही देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत, हा धोका लक्षात घ्यावा लागेल.   चीनला जागतिक व्यवस्थेची परिमाणे...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 18, 2019
आर्थिक आघाडीवर मोठी कामगिरी करण्याचे ध्येय असेल, तर मुळापासून सुरवात करावी लागेल. ‘जीडीपी’ काढण्याची शास्त्रशुद्ध, निर्दोष पद्धत तयार करणे आणि एकूणच या उपक्रमाविषयीचा विश्‍वास पुन्हा निर्माण करणे हीदेखील त्यातील एक मुख्य बाब. भ व्यदिव्य घोषणा आणि संकल्प यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात महत्त्व...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 06, 2019
उत्तर महाराष्ट्र त्यातही खासकरून खानदेशच्या विकासाचा मोठा अनुशेष गेल्या 50 वर्षांपासून आहे. 2014पासून केंद्रात आणि राज्यातही भाजपचे सरकार आहे. खानदेशातील नंदूरबार महापालिका वगळता बहुतेक सर्व लहान-मोठ्या पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. सर्वाधिक आमदारांची संख्या भाजपचीच आहे. अलीकडे लोकसभा निवडणुकीत...
जून 04, 2019
मोदी यांच्या दुसऱ्या सत्ताग्रहणास चार दिवस उलटायच्या आतच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर येत आहे. सत्तेला धोका नसला तरी या अस्वस्थतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.  लोकसभा निवडणुकीच्या आधी मित्रपक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पदरी दणदणीत असा त्रिशतकी...