एकूण 153 परिणाम
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे...
जून 20, 2019
कोल्हापूर - महालक्ष्मी एक्‍स्प्रेस रेल्वेमुळे कोल्हापूरसहित संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्र मुंबईशी जोडला आहे, परंतु आज गाडीचा प्रवास वेळ खाऊ आहे. ५१८ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी ११ तासांचा वेळ लागतो. म्हणजे गाडीचा सरासरी वेग केवळ ४७ किलोमीटर प्रतितास आहे. जो व्यवहार्य नाही. तो वेग वाढवून कमीत कमी ६०...
जून 19, 2019
मिरज -  आता म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस ( एक्सप्रेस क्रमांक 17301 व 17302 ) मिरजेपर्यंत धावणार आहे. रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शिफारशीनुसार हा निर्णय झाला आहे. कधीपासून धावणार हे जाहीर केलेले नाही, मात्र प्रस्तावाला दक्षिण-पश्चिम विभागाने मंजुरी दिली आहे. यानिमित्ताने मिरजेतून दक्षिण...
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे...
मे 17, 2019
मिरज - मध्य रेल्वेने मिरज-कोल्हापूर-पुणे मार्गार्वर डेमू लोकल रेल्वे देऊन प्रवाशांची चांगलीच गोची केली आहे. डब्यांची कमी संख्या आणि बसण्यासाठी अपुरी आसनव्यवस्था यामुळे प्रवाशांत दररोज हाणामाऱ्या होताहेत. आज सकाळी मिरजेतून सुटलेल्या डेमू गाडीत पाय ठेवायला देखील जागा नव्हती.  सुमारे दोन...
मे 16, 2019
मिरज - मिरज ते कृष्णाघाट रस्त्यावरचे रेल्वेगेट लोहमार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव दोन दिवस बंद ठेवले जाणार आहे. यामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे उड्डाण पुलाची गरज पुन्हा चर्चेत आली.  मिरजेतून कृष्णाघाटसह शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडीला दररोज हजारो वाहने या गेटमधून जातात....
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी साड्या परिधान...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 10, 2019
पुणे : मळवली, बारामती, मिरज, मिरज- कोल्हापूर आदी रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे 16 हजार फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.  या कारवाईतंर्गत प्रवासाचे योग्य तिकिट न बाळगणे, कमी अंतराचे तिकिट काढून दूरच्या...
एप्रिल 20, 2019
पुणे - सात रेल्वे गाड्यांचे क्रमांक शुक्रवारपासून बदलण्यात आले आहेत.  या गाड्या व त्यांचे नवे क्रमांक - मिरज-कोल्हापूर-मिरज पॅसेंजर - ७१४१७/७१४१८, पुणे-कोल्हापूर-पुणे - ७१४१९/७१४२०, मिरज-कोल्हापूर-मिरज - ७१४२१/७१४२२, सांगली-कोल्हापूर-सांगली - ७१४२३/७१४२४, पुणे-सातारा-पुणे - ७१४२५/७१४२६...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी...
एप्रिल 17, 2019
पुणे - पुणे-मळवली, पुणे- बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर आदी विभागांत सरत्या आर्थिक वर्षात विनातिकीट, जवळच्या अंतराचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, अशा तीन लाख ३७ हजार प्रवाशांकडून सुमारे १६ कोटी २९ लाख रुपयांचा दंड मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने वसूल केला आहे.  विशेष तिकीट...
एप्रिल 16, 2019
कोल्हापूर मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांच्यासमोर युतीचे प्रा. संजय मंडलिक यांचे कडवे आव्हान आहे. सतेज पाटील यांची असहकाराची भूमिका आणि नाराजी किती प्रमाणात दूर होते, कार्यकर्ते काय निर्णय घेणार, यावर सर्व अवलंबून आहे. लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघात विद्यमान...
एप्रिल 12, 2019
खासदार महाडिक म्हणाले, ‘‘२०१४  मध्ये देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. या लाटेत भलेभले दिग्गज नेते पराभूत झाले. परंतु, कोल्हापुरातील जनतेने आपल्या पारड्यात मतांचा जोगवा घातला आणि एक ऐतिहासिक विजय खेचून आणला. २०१४ पूर्वी दहा वर्षांपासून करत असलेल्या सामाजिक सेवेची दखल जनतेने घेतली....
एप्रिल 04, 2019
मिरज - कोल्हापूर ते गोंदिया आणि गोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणाऱ्या महाराष्ट्र एक्‍सप्रेसला शुक्रवारपासून (ता. 5) ते 19 एप्रिल (शुक्रवार) पर्यंत रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.  याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे ते भुसावळ आणि पुणे ते कोल्हापूर या...
मार्च 25, 2019
सांगली - मिरज ते कोल्हापूर लोहमार्गाचे विद्युतीकरण गतीने सुरू आहे. येत्या महिन्याभरात विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी घेण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. विद्युतीकरण दृष्टिक्षेपात आल्याने प्रवाशांत उत्साहाचे वातावरण आहे.  मिरज ते जयसिंगपूर, रुकडी, हातकणंगले, कोल्हापूर या टप्प्यात अनेक ठिकाणी...
मार्च 24, 2019
मिरज - मिरज - कोल्हापूर रेल्वेमार्गावरील विद्युतीकरणाच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने आज (ता. २४)पासून पुढील रविवार (ता. ३१) पर्यंत सकाळी साडेआठच्या पॅसेंजर गाडीचे नियोजन बदलले आहे.  मिरजहून सकाळी साडेआठला निघणारी ही गाडी आजपासून हातकणंगलेपर्यंतच धावणार आहे. त्यानंतर ती सकाळी ११.२० ला...
मार्च 19, 2019
हातकणंगले - मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, महिन्याभरात उर्वरित काम पूर्ण होऊन मेअखेरीस या मार्गावरून विजेवर रेल्वे धावण्याची शक्‍यता आहे. यामुळे रेल्वेची गती वाढून प्रवाशांच्या वेळेसह प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे...