एकूण 180 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई - लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) दामिनी व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार करण्यात येणार आहे. या ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी महिला प्रवाशांनी हेल्पलाइन क्रमांक १८२ वर संपर्क साधायचा आहे.  लाखो महिला दररोज लोकलने प्रवास करतात. चोरी, दागिने हिसकावणे, छेडछाड,...
ऑक्टोबर 18, 2019
नाशिक : मध्य रेल्वेच्या विविध एक्‍सप्रेसमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळ्यावर रेल्वे पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. अशाच गितांजली एक्‍सप्रेसमधील प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या टोळीच्या रेल्वे पोलिसांनी हुकूमदेव राजकुमार यादव (वय २७) या संशयिताच्या मुसक्‍या आवळल्या आहे...
ऑक्टोबर 13, 2019
रुकडी - पुणे येथील दाम्पत्याने रुकडी (ता. हातकणंगले) येथे रेल्वेखाली आत्महत्या केली. अविनाश कालेकर (वय 45) व हर्षदा कालेकर (वय 35) अशी मृतांची नावे आहेत. आत्महत्येमागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. सकाळी आठच्या सुमारास कोल्हापूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या हैद्राबाद एक्स्प्रेसखाली या दाम्पत्याने ...
ऑक्टोबर 12, 2019
सांगली - टूरिस्ट लॉजमध्ये वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय २०, पंचशीलनगर) या तरुणीचा खून करून पसार झालेला संशयित अविनाश लक्ष्मण हात्तेकर (वय २५, रा. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर) याला एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अटक केली. हात्तेकर याने खुनाची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात...
ऑक्टोबर 09, 2019
भुसावळात खून का बदला खून...!  भुसावळ : राजकारण असो अथवा भाईगिरी या सर्वांचा काळ व वेळ ठरलेली असते. दीड वर्षांपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याची निर्दयी हत्या केल्याचा आरोप मृत सागर खरात याच्यावर होता. ज्या तरुणाच्या वडिलांचा खून झाला, त्याने शहर पोलिस ठाण्यात...
ऑक्टोबर 06, 2019
नागपूर  : धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी देशविदेशातील अनुयायी नागपुरात येत असतात. गर्दीच्यावेळी कोणतीही अनुचित घटना घडून नये, यादृष्टीने विशेष काळजी घेण्यात येत आहे. नागपूर व अजनी रेल्वेस्थानकांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात राहणार असून, प्रत्येक संशयितांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे....
सप्टेंबर 28, 2019
जालना -  तालुक्‍यातील सिरसगाव शिवारात एक पित्याने आपल्या सहा वर्षांच्या मुलासह रेल्वे खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.28) सकाळी उघडकीस आली.सय्यद अनिस सय्यद सुलताना (वय 30), सय्यद अरफान सय्यद अनिस (वय 6 दोघे रा. रेवलगाव, ता. परतूर, जि. जालना) असे या मृतांची नावे आहेत...
सप्टेंबर 27, 2019
रायगड : पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या छतावर चढलेल्या महिलेला वाहतूक पोलिसांनी शिताफीने वाचविल्याची घटना काल गुरुवारी सायंकाळी माणगाव येथे घडली. विशाल येलवे आणि योगेश मदने असे या वाहतूक पोलिसांचे नाव आहे. या पोलिस कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. माणगाव...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : दगडफेक करणाऱ्यांवर, तसेच "फटका गॅंग'वर वचक बसण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व लोकलच्या छतांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केली; मात्र अद्याप एकाही लोकलवर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत.  रुळांवर उभे राहून...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : तांत्रिक बिघाडामुळे मोनो रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. चेंबूर वाशीनाका मैसूर कॉलनी आणि भारत पेट्रोलियम दरम्यान मोनोरेल्वे अडकली होती. एक तासापासून अधिक काळ प्रवासी मोनोत अडकले होते. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या होत्या. मोनोच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या...
सप्टेंबर 18, 2019
धावत्या रेल्वेसमोर झोकून तरुणीची आत्महत्या    जळगाव : शहरातील अशाबाबानगर परिसरातील तरुणीने धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकाच्या सुमारास घडली. घटनेची माहिती रेल्वे उपस्टेशन प्रबंधकांनी रामानंदनगर पोलिसांना वेळीच कळविली. तसेच परिसरातील...
सप्टेंबर 07, 2019
टेकाडी (जि. नागपूर) : नागपूर-कोलकाता रेल्वेमार्गावर रुळांची दुरुस्ती करणाऱ्या दोन मजुरांना रेल्वेगाडीने चिरडल्याची घटना मौदा तालुक्‍यातील गांगणेर शिवारात गुरुवारी (ता. पाच) दुपारी घडली. रेल्वेगाडीचा वेग लक्षात न आल्याने दोघांच्याही शरीराचे तुकडे झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे...
सप्टेंबर 06, 2019
खापरखेडा : साहोली- पारशिवनी टी पॉइंट मार्गावरील कन्हान नदीच्या पुलावरून उडी मारून एका प्रेयसीने गुरुवारी (ता. 5) सायंकाळी चारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रियकराच्या डोळ्यादेखतच प्रेयसीने उडी मारली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राप्त माहितीनुसार, पूजा...
ऑगस्ट 31, 2019
भुसावळला क्षुल्लक कारणावरून रेल्वे गॅंगमनचा खून  भुसावळः रेल्वेत गॅंगमन असलेल्या तरुणावर एका तरुणाने पेपर कटरने गळ्यावर वार केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर रोडवरील हॉटेल खान्देश परमीट रूम ऍण्ड बिअर बारमध्ये शुक्रवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत पिंटू उर्फ...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. साडेसहा वर्षांत तब्बल ११८ दगडफेकीच्या घटना घडल्या असून त्यात ११३ प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे ११८ प्रकरणातील केवळ २१ प्रकरणे सोडविण्यातच रेल्वेच्या जीआरपीला यश आले आहे. त्यामुळे दगडफेकीच्या घटनांवर रोख लावण्यासाठी रेल्वे...
ऑगस्ट 27, 2019
मुंबई, ता. 26 : मुंबईत लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील साडे सहा वर्षांत तब्बल 118 दगडफेकीच्या घटना घडल्या असून यात 113 प्रवासी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या 118 प्रकरणातील केवळ 21 प्रकरणे सोडविण्यातच रेल्वेच्या जीआरपीला यश आले आहे. त्यामुळे दगडफेकीच्या घटनांवर रोख लावण्यासाठी...
ऑगस्ट 23, 2019
लंडनः पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांना लंडनमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करुन त्यांच्यावर अंडी फेकली आहेत. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने रद्द केल्यानंतर भारताला अण्वस्त्र...
ऑगस्ट 20, 2019
मुंबई : जानेवारी ते जूनपर्यंत मध्य रेल्वेवरील 281 प्रवाशांना फटका गॅंगचा फटका बसला आहे. अशा प्रकारचे 146 गुन्हे 2017 मध्ये दाखल झाले होते. मागील वर्षापासून या गुन्ह्यांत वेगाने वाढ होत असून, उकल होण्याचे प्रमाण नगण्यच आहे. फटका टोळीसाठी मध्य रेल्वेचा हार्बर मार्ग सोन्याची अंडी देणारी कोंबडी झाला...
ऑगस्ट 20, 2019
खोपोली : खोपोलीत लोकलवर दगडफेकीच्या प्रमाणात वाढ झाली असून माथेफिरूंची तीन-चार जणांची टोळी सक्रिय असण्याची शक्‍यता आहे. हे माथेफिरू लोकलवर दगडफेक करून फरारी होत असल्याने पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.  खोपोली रेल्वेस्थानकातून निघालेल्या चालत्या कर्जत लोकलवर अज्ञात माथेफिरूने रहाटवडे पाताळगंगा...
ऑगस्ट 19, 2019
औरंगाबाद -  रेल्वेची धडक बसल्याने लष्करातील जवानाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.19) दुपारी एकच्या सुमारास औरंगाबादच्या छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ उघडकीस आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, दैवत दत्तात्रय साळुंके (वय 36) असे मृताचे नाव आहे. ते मूळ सातारा जिल्ह्यातील काले (ता....