एकूण 282 परिणाम
जून 21, 2019
पुणे - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे ते पंढरपूर पालखी मार्गाची पाहणी करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सुरू असलेली विकासकामे आणि दुरुस्तीच्या कामांचा आढावा घेतला. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेऊन पालखी...
जून 20, 2019
रेल्वे पोलिस भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांची संख्या सर्वाधिक सोलापूर - रेल्वेच्या केंद्रीय भरती समितीने रेल्वे पोलिस दल (आरपीएफ) आणि रेल्वे पोलिस सुरक्षा दलाच्या (आरपीएसएफ) उपनिरीक्षक संवर्गाच्या एक हजार 117 जागांची भरती काढली. त्यासाठी दोन ते तीन...
मे 18, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्टेशनवरील पाण्याचा पुरवठा शुक्रवारी दुपारी दोन वाजल्यापासून अचानक बंद झाल्याने हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला. सुमारे पाच तास स्थानकावर पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. तसेच स्वच्छतागृहांतही पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे दुर्गंधी पसरली होती. रेल्वे...
मे 16, 2019
वाशी - भाडे नाकारणे, दिवसाही परतीच्या भाड्याची मागणी करणे, प्रवाशांशी अरेरावी करणे, अशा रिक्षाचालकांच्या वर्तणुकीमुळे नवी मुंबईतील प्रवासी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळेच एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ या वर्षभराच्या कालावधीत नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रवाशांकडून तब्बल ११०...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मे 10, 2019
पुणे : मळवली, बारामती, मिरज, मिरज- कोल्हापूर आदी रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एप्रिल महिन्यात कारवाई करून सुमारे 16 हजार फुकट्या प्रवाशांकडून सुमारे एक कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.  या कारवाईतंर्गत प्रवासाचे योग्य तिकिट न बाळगणे, कमी अंतराचे तिकिट काढून दूरच्या...
मे 06, 2019
नाशिक - ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यांत फणी वादळाने मोठे नुकसान झाले. फणीने प्रभावित झालेल्या राज्यातील वादळग्रस्तांपर्यंत येणाऱ्या मदतीची मोफत वाहतूक करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला. मदतीसाठी दिले जाणारे मदत साहित्य रेल्वे प्रशासन मोफत संबंधितांपर्यंत पोचविणार आहे....
एप्रिल 17, 2019
पुणे - पुणे-मळवली, पुणे- बारामती, पुणे-मिरज, मिरज-कोल्हापूर आदी विभागांत सरत्या आर्थिक वर्षात विनातिकीट, जवळच्या अंतराचे तिकीट काढून लांबच्या अंतरावर प्रवास करणे, अशा तीन लाख ३७ हजार प्रवाशांकडून सुमारे १६ कोटी २९ लाख रुपयांचा दंड मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने वसूल केला आहे.  विशेष तिकीट...
एप्रिल 08, 2019
पुणे : गेल्या 63 वर्षांपासून चिमुकल्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी पेशवे उद्यानातील रेल्वे म्हणजेच "फुलराणी" 63 वर्षांची झाली. सोमवारी सकाळी मोठ्या उत्साहात तिचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या हस्ते फुलराणीच्या आकाराचा केक...
एप्रिल 02, 2019
पुणे : रेल्वे तिकीट विक्रीमध्ये लाखो रुपयांचा अपहार केल्याच्या खटल्यात सबळ पुरावे दाखल न करणा-या केंद्रीय अन्वेषण विभागावर (सीबीआय) न्यायालयाने ताशेरे ओढले. गुन्हा सिद्ध करणारे पुरावे नसल्याने या प्रकरणात आरोपी असलेल्या दोन लिपिक महिलांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.  सीबीआयचे...
एप्रिल 01, 2019
भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे तिसऱ्या रेल्वे लाइनच्या कामासाठी भुसावळ ते भादली दरम्यान तांत्रिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई व सुरत पॅसेंजर या दोन्ही गाड्या २३ एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे चाकरमाने तसेच प्रवासी वर्गाचे मोठे हाल होणार आहेत.  मध्य...
मार्च 27, 2019
नागपूर - आकर्षक मिळकतीचे आमिष दाखवून धोकादायक उद्योगांमध्ये जुंपण्यासाठी नेल्या जात असलेल्या ३१ अल्पवयीन मुलांची हॅंडलर्सच्या ताब्यातून सुरक्षित सुटका करण्यात आली. नागपूर स्थानकावरून २६ तर बल्लारशाह स्थानकाहून ५ मुलांना ताब्यात घेण्यात आले. चाइल्ड लाइन, आरपीएफ, रेल्वे प्रशासनाने...
मार्च 22, 2019
पुणे - पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी दोन सरकते जिने (एक्‍सलेटर) नुकतेच कार्यान्वित झाले. रेल्वे स्थानकावर आणखी तीन सरकते जिने महिन्यात कार्यान्वित होणार आहेत. राजा मोतीलाल बहादूर मिल रस्त्यावरून रेल्वे स्थानकात प्रवेश करताना प्रवाशांना चढण्यासाठी...
मार्च 18, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदांच्या पदाधिकाऱ्यांना आगामी आर्थिक वर्षाचा (२०१९-२०) अर्थसंकल्प मंजूर करता येणार नसल्याचे ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मंजूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आला आहे....
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला...
मार्च 16, 2019
पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर आता पार्सल कार्यालयाच्या शेजारीही एक नवे तिकिट काऊंटर उघडण्यात आले आहे. त्यामुळे पार्सल कार्यालयात येऊन प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर जाणाऱ्या प्रवाशांना तिकिटासाठी दूरवर जाण्याची गरज राहिलेली नाही.  पार्सल कार्यालयाजवळ तिकिट काऊंटर नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय...
मार्च 14, 2019
अमरावती : अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील मतदारांची संख्या 90 लाख 38 हजार 747 असून यात 46 लाख 94 हजार 980 पुरुष तर 43 लाख 40 हजार 468 महिला मतदारांचा समावेश आहे. विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा आणि यवतमाळ-वाशीम असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. विभागातील 90 लाख 38 हजार 747 मतदारांमध्ये सर्वाधिक...
मार्च 11, 2019
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे मध्ये वर्ग (ड) पदाच्या एक लाख पदांसाठी नोकर भरती होणार आहे. उद्या मंगळवार (ता.12 मार्च) रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून अर्ज स्विकारण्यास सुरवात हाईल. रेल्वे विभागाने भरती विषयीची अधिसुचना जाहीर केली आहे. रेल्वे भर्ती मंडळ (Railway...
मार्च 07, 2019
नांदेड : अजमेर येथील ८०७ व्या उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने भाविकांची गैरसोय टळावी यासाठी सहा विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड ही (०७६४१) विशेष गाडी ता. ११ मार्च रोजी नांदेड...
मार्च 06, 2019
नागपूर - छोट्या बोटी घेऊन मासे पकडतो आणि आपली उपजीविका चालवतो. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली. मासेमारी समाजाच्या समस्यांवर सकारात्मक विचार करून समाजाचा उपजीविकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी ऐतिहासिक अध्यादेश शासनाने काढला असून, पाचशे हेक्‍टरपर्यंत तलावाचा ठेका मोफत मिळणार आहे. या अध्यादेशामुळे...