एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
आपली कुठे कशी फजिती होईल याचा नेम नसतो. डिंकाचा लाडू पाहिला की अजून ‘त्या’ फजितीचा किस्सा आठवतो. नगरला नुकताच बॅंकेत नोकरीस लागलो होतो. त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे पहिले क्लिअरिंग करून साडेबारा वाजता बॅंकेत आलो. क्लिअरिंग रजिस्टर, चेक्‍स आणि स्टेट बॅंकेतील शीट अधिकाऱ्यांना सुपूर्त केले आणि तासाभरात...
ऑक्टोबर 01, 2019
त्या सगळ्याच खंबीर व्यक्तींची जीवनऊर्जा अतिशय जबरदस्त होती. पण, त्यांनी कर्त्या दिवसांत माणसे दुखावली, त्यामुळे निवृत्तीनंतर ती एकटी पडली. ते ‘नेव्ही’मध्ये उच्चपदस्थ होते. त्यांना न्यायला अतिशय चकाकणारी काळ्या रंगाची शोफर ड्रीवन अँबेसेडर यायची. त्यांचा दराराही खूप होता. आम्ही त्यांच्यापुढे जायला...
जून 07, 2019
सिमेंट आणि प्लॅस्टिकचे जंगल सोडून प्लॅस्टिकमुक्त जंगलची सफर स्मरणीय ठरली. जिम कॉर्बेटमध्ये मात्र हा प्लॅस्टिकचा राक्षस बोकाळलेला नाही. नातीची परीक्षा संपल्यावर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कला भेट द्यायची असा बेत ठरला. मुलांनी सगळी रिझर्व्हेशन्स आधीच करून ठेवली होती. आम्हीही पुण्याच्या सिमेंटच्या जंगलातून...
मार्च 08, 2019
गुन्हा नव्हता मनात तरी पोलिस समोर उभे पुन्हा. नंतरच्या नाट्यात, तुरुंगात जायच्याऐवजी पैशांवर निभावले. आम्ही एका प्रवासी कंपनीबरोबर काश्‍मीर, वैष्णोदेवी, अमृतसर येथे सहलीला गेलो होतो. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून बाहेर पडता पडता मखमली निळ्या, केशरी, लाल रंगांच्या म्यानातील छोट्या तलवारी दिसल्या....
डिसेंबर 12, 2018
स्त्रियांची कर्तबगारी, हस्तकौशल्य सगळेच जाणतात. तिचे कौतुक नजरेत हवे. शब्दांत हवे. तिच्या हाताला किती छान चव आहे, प्रत्येक पदार्थ उत्कृष्ट. पदार्थ खाल्ला की तृप्त होतं. समाधान मिळते प्रत्येकाला. तिच्या हाताला किती छान वळण आहे, अक्षर कसे मोत्याच्या दाण्यांसारखे. तसेच चित्रकलाही तिची सफाईदार आहे....
डिसेंबर 07, 2018
जंगलातून रेल्वे जाताना रुळावर आलेल्या हत्तीला धक्का बसला आणि हत्तींनी रेल्वे रोको आंदोलन केले. हरिद्वारहून डेहराडून एक्‍स्प्रेसने दिल्लीला जाणार होतो. दुपारी एक वाजता गाडी होती; पण गाडी उशिरा येणार होती. सुमारे तासभर स्थानकातील गंमत पाहण्यात गेला. नव्या सूचनेनुसार गाडी सात...
नोव्हेंबर 27, 2018
प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही. मुलगा बिकानेरला असताना आम्ही दोघे व आम्हा दोघांच्या बहिणी त्याच्या पतींसह असे सहा जण राजस्थानला गेलो होतो. तीन आठवड्यांची सहल करून परतीला निघालो. परतीची गाडी बिकानेरवरून सकाळी नऊच्या सुमारास होती....
ऑक्टोबर 31, 2018
तंबाखूचे व्यसन लागले होते. पण एकवेळ अशी आली की चांगलीच अद्दल घडली आणि त्यातून व्यसनमुक्तीही. मित्राला भिगवण मालधक्‍क्‍यावर माल उतरवून घेण्याचे काम मिळाले होते. व्यवस्थापक म्हणून माझी नेमणूक झाली होती. भिगवण गावात कार्यालय. गावापासून मालधक्का दोन किलोमीटरवर. चंद्रपूरहून सिमेंट गोण्या आल्या होत्या....
ऑक्टोबर 29, 2018
माझा मुलगा पाच-सहा वर्षांचा असतानाची गोष्ट. नाशिकला राहात होतो. माझे पती त्यांच्या कंपनीतर्फे ‘प्लास्ट इंडिया’ प्रदर्शन पाहायला दिल्लीला जाणार होते. बरोबर एक सहकारी असणार होता. पण, पंजाब मेलचे रिझर्व्हेशन काही मिळाले नाही. विमानाचे तिकीटही मिळेना. त्यामुळे जाणे रद्द होणार, असेच दिसत होते. मला...
सप्टेंबर 17, 2018
आयुष्यातील अनेक अपघातांतून मला जीवदान मिळाले. देव तारी त्याला कोण मारी? रिक्षाने जाताना समोरून आलेल्या गाडीने जोरात धडकत दिली. पलट्या खाऊन रिक्षा प्रभात रस्त्यावर कोपऱ्यातील झाडावर आदळली. ड्रायव्हर जखमी. माझ्या कंबर-पाठीला मार. एकदा अलका टॉकीजजवळ पतीबरोबर स्कूटरवर होते. पोलिसाने हात दाखवल्यावर...
ऑगस्ट 23, 2018
समोरच्याचा अंदाजच नसतो आपल्याला, पण आपण सहज खिल्ली उडवतो. नंतर आपली चूक उमजते. येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगाधिकारी (वर्ग-एक) म्हणून मी कार्यरत होतो. प्रजासत्ताक दिन जवळ आला होता. बंदीजनांचे सांस्कृतिक कार्यक्रम आखत होतो. सर्व विभागांमध्ये सूचना पाठविली, ज्या बंदींना गायन, वादन कार्यक्रमात भाग...
जून 20, 2018
शिवरंजनीला रेल्वेच्या शिट्ट्यांची दाद मिळाली, तर अनाथघरच्या मुलींनी सुंदर नृत्य सादर करीत दाद मिळवली. कलावंतांना अनपेक्षितपणाला सामोरे जावे लागते, त्यातून आनंदाचे क्षण ओंजळीत पडतात. आगरतळ्याच्या गणपती उत्सवात सतारवादन सादर करण्यासाठी निघाले. विमानतळावरून बाहेर पडून आगरतळ्याच्या रस्त्याला लागलो आणि...
जून 19, 2018
वाफेच्या इंजिनची मजाच काही और होती. त्या इंजिनचा डौल आजही कायम आहे. झुक-झुक आगीनगाडीच्या गाण्यावर ताल धरत एक पिढी मोठी झाली...! नुकतेच एका सांस्कृतिक कार्यक्रमात एका कलाकाराने निरनिराळ्या आवाजांची नक्कल करून दाखवली. रूळ बदलताना रेल्वेचा होणारा आवाज अगदी हुबेहूब काढला. त्याच वेळी मी 40-50 वर्षे मागे...
जून 13, 2018
माझ्या आणि आईच्या नात्यात विलक्षण ऋणानुबंध होते. आईने सख्ख्या मुलांसह सावत्र मुलांनाही तितक्‍याच मायेने वाढविले. परिस्थितीनुरूप ती शिकत गेली. मला आईची तीव्रतेने आठवण झाली आणि मी अस्वस्थ झाले. तिचा जन्म झाला तेव्हा तिचे वडील नीरा रेल्वे स्टेशन मास्तरच्या चाळीत नुकतेच राहावयास गेले होते...
मार्च 30, 2018
लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते. कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली....
फेब्रुवारी 22, 2018
नुसतेच भटकायचे नाही, तर वेगवेगळ्या धर्मीयांची मंदिरे पाहायची हे त्या जोडीला वेड आहे. बेथलेहेमच्या चर्चच्या घंटांचा नाद त्यांना बोलावू लागला आणि ते दोघे तिथे पोचले. येशूच्या जन्मभूमीत येशूच्या जन्मदिवशी जायचे ठरवले आणि आम्ही निघालो. सध्याच्या पॅलेस्टाइन प्रदेशातील बेथलेहेम येथील "चर्च ऑफ नेटिव्हिटी...
फेब्रुवारी 07, 2018
अफवा पसरवून एखाद्याला नामोहरम करणे सहज शक्‍य असते. लढण्याच्या अन्य मार्गांपेक्षा अफवेच्या वाटने जाणे तुलनेने सोपेही असते. पण तेच अस्त्र आपल्यावरही उलटू शकते, या बूमरॅंग सत्याचा विसर पडू देऊ नये. दाबून ठेवलेली वाफ जशी विध्वंसक असते ना, तशीच अफवाही विध्वंसक असते. अफवेची वाफ काय करील, हे सांगता येत...
जानेवारी 16, 2018
पावसाळी काळोख्या रात्री आमराईतून नदी ओलांडताना एकाची सोबत मिळाली खरी; पण तो कोण होता? मधेच कधी, कुठे निघून गेला? संध्याकाळ होताच पावसाच्या एक- दोन सरी पडण्याचे ते दिवस. त्याकाळी पुण्याहून मुंबईकडे सायंकाळी साडेपाचला निघणाऱ्या गाडीने मी कर्जतला जात असे. शांत, आवाज न करणारे अक्षरशः रेडियमचे शेकडो...
डिसेंबर 16, 2017
"खिसेकापूंपासून सावध राहा' असा इशारा बस थांब्यांवर, रेल्वे स्टेशनवर वाचलेला असतो. पण खिसेकापूंचा अनुभव आलेला नसतो. ऐकून काही गोष्टी माहीत असतात, पण त्यांची "हाथ की सफाई' पाहिलेली नसते. लोकल प्रवासातील खिसेकापूंचे अनेक अनुभव गाठीशी आहेत. जोगेश्‍वरीत आसपास राहणाऱ्या काही खिसेकापूंबरोबर...
नोव्हेंबर 13, 2017
‘ब्रह्मांड आठवणे’, ‘तोंडचे पाणी पळणे’, ‘पायात गोळे येणे’, ‘मटकन बसणे’, ‘जीव भांड्यात पडणे’ वगैरे शब्दप्रयोग आपण अनेक वेळा ऐकतो. कधीमधी त्यातल्या एखाद्याचा आपल्याला अनुभवही येतो; पण या सगळ्याच्या सगळ्या अवस्थांचा अनुभव पंधरा- वीस मिनिटांत येणे, हे तसे दुर्मिळच.  गोष्ट तशी जुनी... वीस वर्षांपूर्वीची...