एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
जपानमधील दिवसेंदिवस कमी होत जाणारे मनुष्यबळ आणि वाढत जाणारा जपानी नागरिकांचा वयोगट, यामुळे भारतासारख्या ‘तरुण’ देशातील तरुणांना तेथे मोठी संधी आहे. मात्र, या संधीला बुद्धिमत्तेची जोड आवश्‍यक आहे. तेव्हा योग्य मार्गदर्शन घेऊन निर्णय घेतल्यास तरुणांना जपानसारखी दुसरी संधी नाही. जपानची ओळख ‘पोलादी...
सप्टेंबर 03, 2019
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही संकल्पना आता नवीन राहिलेली नाही. कित्येक क्षेत्रांत त्याचा यशस्वी वापर होत आहे. उदा. लष्कर, उत्पादन क्षेत्र, वैद्यकीय सेवा, दूरध्वनी, आर्थिक व्यवस्थापन आदी क्षेत्रांत याचा कित्येक पातळ्यांवर वापर होत आहे. प्राणी आणि कीटकांच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचे...
ऑगस्ट 31, 2019
औद्योगिक क्रांतीनंतरच्या गेल्या दोनशे वर्षांमध्ये पृथ्वीतलावरचा माणूस हळूहळू यंत्रांच्या आहारी गेला. दैनंदिन आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या कामांपासून ते कारखान्यांमधल्या वस्तुनिर्मितीपर्यंत माणसाचा प्रत्येक पळ व प्रत्येक घटका यंत्रांशी जोडली गेली. मानवजात आता एका स्थित्यंतराच्या टप्प्यावर उभी आहे. हा...
ऑगस्ट 24, 2019
बौद्ध धर्माबद्दल लोकांची रुची कायम राहावी यासाठी जपानमधील सुमारे ४०० वर्षांपूर्वीच्या एका बौद्ध मंदिरामध्ये ‘रोबो पुजारी’ नियुक्त करण्यात आला आहे. धर्माकडे बघण्याचा दृष्टिकोन यामुळे बदलेल, असा विश्वास मंदिराच्या विश्वस्तांना वाटतो आहे... मंदिरांमध्ये सर्वसाधारणपणे पुजाऱ्याचे काम पुरुष...
ऑगस्ट 01, 2019
चीनला धडा शिकवण्याच्या उद्देशाने अमेरिकेने सुरू केलेल्या व्यापार युद्धात सध्या तह झालेला असला, तरी ऑक्‍टोबरपर्यंत सर्व चिनी आयात मालावर 25 टक्‍क्‍यांपर्यंत शुल्क लागू करण्याचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मानस आहे. तो त्यांनी प्रत्यक्षात आणला, तर चीनच्या प्रगतीला निश्‍चितच खीळ बसेल; पण सर्वच...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
एप्रिल 29, 2019
परवा एका सत्कार समारंभाला गेलो होतो. विदर्भातील यवतमाळजवळच्या पाटणबोरी गावातून आलेला हा चोवीस वर्षांचा तरुण आज जागतिक कीर्तीचा संशोधक म्हणून नावाजला गेला आहे. त्याचं नाव अजिंक्‍य रवींद्र कोत्तावार. लहान असताना अजिंक्‍य उनाडक्‍या जास्त करायचा. आई- वडिलांनी परिचयाच्या आध्यात्मिक व्यक्तीकडे नेल्यावर...
मार्च 06, 2019
सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...
जानेवारी 22, 2019
भारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय? या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍चित आणि गुंतागुंतीची राहील यावर अवलंबून असेल. सद्यःस्थितीत भारतात आर्थिक विकासदराची (देशांतर्गत एकूण उत्पादन - जीडीपी) चर्चा मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरू...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
मे 01, 2018
उद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उ द्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भलामोठा कारखाना,...
नोव्हेंबर 04, 2017
स्वतंत्रपणे विचार करणारी आणि कार्य करणारी व्यक्ती बनविणे, हे शिक्षणाचे ध्येय असायला हवे, असे अल्बर्ट आईन्स्टाइन यांनी म्हटले होते. विज्ञानशिक्षणाचा उद्देश वैज्ञानिक माहितीचे आकलन होणे, तिचे विश्‍लेषण करणे आणि त्या आधारे योग्य शिक्षणापर्यंत पोचणे हा असायला हवा. पण सध्या शालेय स्तरावर काय चित्र...
ऑक्टोबर 23, 2017
'Everybody is a genius. But if you judge a fish by its ability to climb a tree, it will live its whole life believing that it is stupid.' हे विधान वाचल्यावर यातला विरोधाभास आणि फोलपणा लक्षात आल्यामुळे आपल्याला हसूही येतं आणि आपण अंतर्मुखही होतो. आपल्या आजच्या शिक्षणाचं हे वास्तव आहे...
ऑक्टोबर 20, 2017
कुठल्याही शाळेत जा. प्रत्येक ठिकाणी लहान मुलांच्या शाळेत "ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार', "जॉनी जॉनी येस पापा' किंवा "लकडी की काठी' यासारखी बडबडगीते ऐकायला मिळतात. मराठी भाषक असलेली लहान मुलंही मराठी बडबडगीतांबरोबरच इंग्रजी, हिंदी बडबडगीते म्हणत मोठी होत असतात. लहान मुलं शिशुगटात असतात तोपर्यंत...
जून 01, 2017
जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसला, तरीही ती वनस्पती बरीच लोकप्रिय आहे. साहजिकच आपल्याला हे फूल अनेक घरांच्या सभोवताली दिसून येईल. जास्वंदीची श्वेत, लालबुंद, पीतरंगी, भगवी, गुलाबी किंवा जांभळी फुले सार्वजनिक उद्यानात उठून दिसतात. जास्वंदीच्या एक हजार सूक्ष्म रंगच्छटा आहेत! नजरेत भरणारा रंग आणि पाच...
मार्च 11, 2017
विश्‍वाच्या उत्पत्तीचा हिशेब मांडणारे प्रकांड शास्त्रज्ञ डॉ. स्टिफन हॉकिंग यांनी नुकत्याच एका मुलाखतीत विश्‍वाच्या अंताचा आडाखा सांगून टाकल्याने वैज्ञानिक जगतात पुन्हा एकदा चर्चा झडू लागल्या आहेत. आक्रमकता हा मानवप्राण्याचा निव्वळ स्वभावधर्म नसून डार्विनच्या सिद्धान्तानुसार तो मानवी गुणसूत्रातच...
मार्च 09, 2017
कीटकांच्या कौशल्याचा वापर करून जगभरातील संशोधक नावीन्यपूर्ण असे उडणारे कीटक-रोबो बनवत आहेत. युद्ध, टेहळणी, आपत्तीच्या वेळी शोध, परग्रहांवरील संशोधन यासाठी या कीटक-रोबोची मोठीच मदत होणार आहे. मानव हा पृथ्वीवरचा असा एकमेव जीव आहे, जो पंख नसतानाही उडू शकतो, इतर जीवांकडे असणारे पंख...
फेब्रुवारी 23, 2017
तंत्रज्ञानातील प्रगतीच्या विलक्षण वेगाशी जुळवून घेताना समावेशक विकासाशी त्याची सांगड कशी घालायची, हे जगभरातील राज्यकर्ते, धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ यांच्यापुढचे सध्याचे बिकट आव्हान आहे. या कूटप्रश्‍नाची निरगाठ सुटली नाही तर त्यातून तयार होणाऱ्या असंतोषाचे, अस्वस्थतेचे उद्रेक शमवणे कठीण होईल, ही भीतीही...
जानेवारी 16, 2017
देशातील सीमान्त आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना म्हणजे ज्यांच्या शेताचे आकारमान दोन हेक्‍टरपेक्षा कमी आहे, त्यांना शेती क्षेत्रात पुरेसे काम मिळत नाही. परिणामी, त्यांना पुरेसे म्हणजे निर्वाहापुरते उत्पन्नही मिळत नाही. ही स्थिती लक्षात घेऊन अशा लोकांना औद्योगिक वा सेवा अशा क्षेत्रात सामावून घेण्यासाठी...
डिसेंबर 06, 2016
आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी श्रीशके 1938  आजचा वार : सोमनाथ मंडेवार!..हे वऱ्हाडी नाव कुठून आले?.. आय मीन सोमवार.  आजचा सुविचार :  जंगल जंगल बात चली है,  जंगल जंगल पता चला है,  चड्डी पहन के फूल खिला है,  खिला है....  ..............  नमा नम: नमो नम: नमो नम:..सध्या नागपुरात...