एकूण 8 परिणाम
जानेवारी 15, 2018
चंद्रपूर जिल्ह्यातील चारगाव (धरण, ता. वरोरा) येथील मधुकर भलमे यांनी अल्पभूधारक असतानाही आपल्या उत्तम आर्थिक नियोजनातून यशाचे शिखर गाठले आहे. तुरीसारख्या कोरडवाहू मानल्या जाणाऱ्या पिकाची १०८ एकर क्षेत्रावर लागवड करीत, उत्तम नफा मिळविण्याचे मजूरविरहित तंत्रज्ञान विकसित केले आहे. वाटणीनंतर केवळ दोन...
जानेवारी 04, 2018
"जेथे नवनवी योजना फुले, विकसोनी देतील गोड फळे  ग्रामराज्याचे स्वप्नही भले, मूर्त होईल त्या गावी''  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा... राष्ट्रसंतांच्या याच विचारांचा वारसा जपत सामूहिक प्रयत्नांतून माहूली जहाॅंगीर (ता. जि. अमरावती) गावाने...
डिसेंबर 08, 2017
जावरा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील विनोद राठी गेल्या ४४ वर्षांपासून थोड्याथोडक्या नव्हे, तर आपल्या १३० एकरांवर सुनियोजनबद्ध शेती करीत आहेत. अंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून त्यांनी पीककपद्धतीची आखणी केली आहे. सुमारे २४ एकर क्षेत्र त्यांनी बारमाही भाजीपाला शेतीसाठी दिले आहे. पारंपरिक...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - नोटाबंदीला आज (ता. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षानंतरही नोटाबंदीचे व्रण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आजही कायम आहेत.  या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही नोटाच थोडी बंद केल्या, काही दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाच स्वप्न दाखवून...
सप्टेंबर 01, 2017
गडचिरोली जिल्ह्यातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांचे भात हेच मुख्य पारंपरिक पीक आहे. मात्र शेतीत नव्या वाटा चोखाळल्या तरच प्रगती होते हे जाणून त्यांनी मत्स्यपालनाकडे आपला कल वळवला आहे. मागील वर्षी त्यांनी २५ क्विंटल माशाची विक्रीही साधली. जोडीला राईस मीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
ऑगस्ट 01, 2017
अमरावती जिल्ह्यात चिंचोली बु. (ता. अंजनगावसूर्जी) येथे अमोल घोगरे यांची सुमारे १३ एकर शेती आहे. त्यात कांदा, कापूस, सोयाबीन अशी पिके असतात. आर्थिक उन्नतीसाठी अमोल यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यायचे ठरवले. त्यांचा पिंडच व्यावसायिक असल्याने त्यातील नव्या बाबी शोधण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला....
जुलै 04, 2017
परसोडा (ता. आर्णी, जि. यवतमाळ) या गावाशी जवळची सुमारे २० खेडी जुळलेली आहेत. आर्णी-दिग्रस मार्गावर हे गाव अाहे. त्यामुळे आर्णी व दिग्रस या दोन्ही तालुक्‍यांच्या ठिकाणी जायचे असल्यास याच गावावरून जावे लागते. आर्णी येथे डाळ मिल नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी एक किंवा दोन पोती तूर प्रक्रियेसाठी नेल्यास...
जून 23, 2017
प्रयोगशील वडिलांचा आदर्श कायम ठेवत हिंगणा (जि. नागपूर) येथील विठ्ठलदास मणियार आपल्या १४ एकर शेतीचे उत्कृष्ट व्यवस्थापन सांभाळले आहे. पेरू व सीताफळ ही मुख्य पिके व त्यात पपईचे आंतरपीक ही पीकपद्धती यशस्वी केली आहे. जोडीला थायलंडचा पेरू व लिंबू यांचाही प्रयोग करीत नव्या पिकाच्या वाटा चोखाळल्या आहेत. ...