एकूण 14 परिणाम
जानेवारी 02, 2019
नागपूर : नऊ वर्षे सलग यशस्वी आयोजन करून लाखो वाचकांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे गेली तीन वर्षे आयोजन नागपुरात होऊ शकलेले नाही. परिणामी देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारा नागपूरचा पुस्तक मेळा आता "राष्ट्रीय' यादीतूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
जुलै 11, 2018
यवतमाळ जिल्ह्यात पुसद तालुक्‍यातील शेलूवाडी हे रामजी वाटोळे यांचे मूळगाव. उदरनिर्वाहाचे मुख्य साधन नसल्याने मिळेल त्या मजुरीवर गुजराण करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. काही वेळा उपाशीपोटी दिवस काढावे लागत. परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष सुरूच होता. मजुरी कामातून ते काही रक्कम शिल्लक टाकू लागले...
जुलै 10, 2018
रत्नागिरी - कोकणात स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचे आश्‍वासन मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय देण्याच्या आश्‍वासनामुळे कोकणवासीयांच्या स्वतंत्र विद्यापीठाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘मासे...
एप्रिल 17, 2018
बडनेरा (ता. जि. अमरावती) येथील दारोकार कुटुंबाची सुमारे चार एकर शेती. शेतीमध्ये भाजीपाला पिके घेण्यावर त्यांचा भर असतो. शेतीला पूरक व्यवसायाची जोड म्हणून दारोकार कुटुंबातील अाशिष अाणि पंकज या उच्चशिक्षित तरुण भावंडांनी नंतर कुक्कुटपालनामध्ये अधिक लक्ष घातले. अार्थिक स्थैर्य मिळावे म्हणून त्यांनी...
मार्च 19, 2018
विदर्भातील उन्हाळ्यात असणारे जिवाची  काहिली करणारे तापमान हीच पोल्ट्री व्यवसायाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. पूरक व्यवसायामध्ये पोल्ट्री उद्योग सुरू करण्याचे अनेक प्रयत्न अयशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत. अगदी अकोला जिल्ह्यातील ९९ टक्के पोल्ट्री बंद झाल्या, पर्यायाने शेतकऱ्यांच्या आशा- आकांक्षांना...
मार्च 04, 2018
अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील उमरी (इत बारपूर) येथील विभा रमेश तळोकार या दर्यापूर येथील संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणीत नोकरीला होत्या. परंतु १९९६-९७ मध्ये सुतगिरणी बंद पडल्यानंतर त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला. प्रति महिना अवघे ६०० रुपये मेहताना त्यांना मिळत होता....
डिसेंबर 08, 2017
जावरा (ता. तिवसा, जि. अमरावती) येथील विनोद राठी गेल्या ४४ वर्षांपासून थोड्याथोडक्या नव्हे, तर आपल्या १३० एकरांवर सुनियोजनबद्ध शेती करीत आहेत. अंगी व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून त्यांनी पीककपद्धतीची आखणी केली आहे. सुमारे २४ एकर क्षेत्र त्यांनी बारमाही भाजीपाला शेतीसाठी दिले आहे. पारंपरिक...
नोव्हेंबर 08, 2017
पुणे - नोटाबंदीला आज (ता. ८) एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षानंतरही नोटाबंदीचे व्रण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आजही कायम आहेत.  या तळतळणाऱ्या हिरव्या पिकांची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, तुम्ही नोटाच थोडी बंद केल्या, काही दिवसांसाठी का होईना शेतकऱ्यांच्या जगण्याच्या वाटाच बंद केल्या. सुखाच स्वप्न दाखवून...
मार्च 13, 2017
पारशिवणी तालुक्‍यातील बच्छेरा हे आदिवासीबहूल गाव. गट ग्रामपंचायत चारगाव अंतर्गत या गावाचा समावेश होतो. या गावापासून ४० किलोमीटर अंतरावर मध्य प्रदेशची सीमा आहे. याच गावातील चंद्रकला चक्रवर्ती यांनी किफायतशीर शेतीचा पॅटर्न रुजविला. मध्य प्रदेशातील बरेला हे चंद्रकलाताईंचे सासर, तर नागपूर माहेर. सासरी...
फेब्रुवारी 22, 2017
दुर्गम भंडारा जिल्ह्यात विविध पिके घेण्यावर आणि पर्यायाने उत्पन्नावर मर्यादा येतात. मात्र सोनपुरी (साकोली) येथील कठाणे भावंडांनी शेतीला डेअरी, शेळीपालन व पोल्ट्री या तिघेही पूरक व्यवसायांची जोड दिली आहे. त्याद्वारे उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण करीत आर्थिक उत्कर्ष साधला. धान उत्पादक जिल्ह्यात...
जानेवारी 08, 2017
साकोलीपासून अकरा किलोमीटर अंतरावरील शिवणी बांध हे झोडे कुटुंबीयांचे मूळ गाव. या गावालगत त्यांची शेती आहे. झोडे कुटुंबीयांनी वडिलोपार्जित अकरा एकर शेतीत भर घालीत हे क्षेत्र अठरा एकरांवर नेले आहे. रमेश झोडे हे शासकीय नोकरीत आहेत. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी रमेश यांच्या पत्नी...
डिसेंबर 09, 2016
नागपूर - उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत मांडलेल्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयकास आज एकमताने संमती देण्यात आली. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या विद्यापीठांच्या विविध निवडणुका, अभ्यास मंडळांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे...
ऑगस्ट 22, 2016
नागपूर - शेतीसमोरील आव्हानांचा वेध घेता यावा, याकरिता अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या बंगल्याच्या परिसरातील पडीक जमिनीवर मूग, उडदाची लागवड केली आहे. या शेतीचे व्यवस्थापन सेंद्रिय पद्धतीने करणाऱ्या या ध्येयवेड्या अधिकाऱ्याने आपल्या या शेतीला गायी व शेळीपालनाच्या माध्यमातून पूरक...