एकूण 17 परिणाम
जुलै 02, 2019
जळगाव - आदर्शनगर परिसरातील शिरसोली नाका पेट्रोलपंपामागे वास्तव्यास असलेल्या तरुणाचा मेहुणीवर जीव जडला आणि तो पत्नी, दोन मुलांना सोडून मेहुणीला सोबत घेत पसार झाला. परिसरात या घटनेबद्दल अनेक चर्चांना ऊत आला आहे. दरम्यान, याप्रकरणी संबंधित तरुणाची पत्नी दोघा मुलांना घेऊन पोलिसांत दाखल झाली आणि तिने...
फेब्रुवारी 23, 2019
सातारा - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ व ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा अशी नोंद झालेल्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’मधील सातारा शहर व तालुक्‍याचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सर्वसाधारण विभागात ‘अ’ गटात आर्यन एस. शिळीमकर, ‘ब’ गटात अपूर्वा हेमंत पवार, ‘क’ गटात सानिका प्रकाश...
जानेवारी 11, 2019
यवतमाळ : निमंत्रणवापसी, बहिष्कार, राजीनामा आदी कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात उद्या (शुक्रवार) सकाळी आठला ग्रंथदिंडीने होणार आहे. समता मैदानातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरीत तीन दिवस चालणाऱ्या या...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
नोव्हेंबर 16, 2018
माहूर : माहूर शहरात आबासाहेब पारवेकर मार्केटच्या बाजूला असलेल्या खुर्चीच्या गोदामाला शुक्रवारी (ता. 16) सकाळी आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या आगीत खुर्ची, गादी व ईतर फायबरचे सामान जळून खाक झाले. साठ लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांचे लहान...
सप्टेंबर 03, 2018
खानापूर : येथील नगर पंचायतीसाठी 31 ऑगस्ट ला झालेल्या निवडणुकीचा निकाल लागला. यामध्ये आठपैकी पाच विद्यमान नगरसेवकांना मतदारांनी कौल दिला. तसेच तीन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली. तर 12 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात तरूणांची संख्या अधिक आहे. माजी उपनगराध्यक्षा फकिरव्वा गुडलार,...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे....
जुलै 11, 2018
प्रत्येक पावसात होणारी ससेहोलपट आता मुंबईकरांना नवी नाही. आपला वाली कोणीही नाही, हे एव्हाना त्यांना कळून चुकले आहे. शाळांना सुटी देण्यासारख्या निर्णयातही पुरेशा गांभीर्याचा अभाव असणे हे या अनास्थेचेच ताजे उदाहरण. मुंबईत पाऊस असला तरी शाळा-महाविद्यालयांनी सुटी घेण्याचे कारण नाही, अशी मास्तरकी खुद्द...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
मे 04, 2018
दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...
मार्च 27, 2018
कणकवली - येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्हांचे वाटप झाले. यात निवडणूक प्रचारात गुंतलेल्या अनेक उमेदवारांनी चिन्ह वाटप कार्यक्रमाकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांना सर्व प्रभागात "जग' ही निशाणी मिळाली आहे. तर गाव आघाडीच्या उमेदवारांना "टोपी' ही निशाणी आहे...
मार्च 13, 2018
शहरातील शिवाजीनगर भुरे मामलेदार प्लॉट भागात मंगळवार सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. पार्टेशन एकमेकांना लागून असलेल्या चौदा पार्टेशनच्या खोल्या अवघ्या अर्ध्यातासातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. आगीने रौद्ररुप धारण केल्याने घरातील स्वयंपाक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने...
मार्च 04, 2018
बारामती - छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज बारामतीत अत्यंत उत्साहाने व जोरदार साजरी करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या असून पावला पावलावर विविध संस्था व संघटनांनी शिवजयंतीच्या मिरवणूकीचे स्वागत करण्यासाठी स्टेज उभारलेले दिसून आले. आज बारामती शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे...
मार्च 02, 2018
पाथर्डी (नगर) : "कानिफनाथ महाराज की जय' अशा जयघोषात, भक्तिभावाच्या वातावरणात मढी येथे आज कानिफनाथांच्या यात्रेला जल्लोषात सुरवात झाली. कैकाडी समाजाची मानाची काठी वाजतगाजत कानिफनाथ गडावर पोचली. मानकरी नारायणबाबा जाधव यांच्या हस्ते पूजापाठ करून नाथमंदिराच्या मुख्य कळसाला मानाची काठी भेटविण्यात आली. ...
जानेवारी 21, 2018
जुन्नर: अष्टविनायकांपैकी श्री क्षेत्र ओझर ता.जुन्नर येथे माघ शुद्ध चतुर्थीनिमित्त गणेश जयंती सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. फुलांचा वर्षाव करून भक्तीमय वातावरणात मोरया गोसावींची पदे म्हणत गणेश जयंती साजरी करण्यात आली. पहाटे ५ वाजता मंदिर उघडण्यात येऊन श्री विघ्नहर गणपती देवस्थान...
जानेवारी 11, 2018
जळगाव - शहरातील महामार्गावरील अपघातांची  वाढती संख्या पाहता, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय ते बांभोरीपर्यंत बारा किलोमीटरदरम्यान समांतर रस्ते केले जातील. त्यासाठी केंद्र शासनातर्फे शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. सध्या रस्त्यांचा प्रकल्प अहवालाचे काम सुरू आहे. दोन महिन्यांत...