एकूण 17 परिणाम
ऑक्टोबर 08, 2019
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या बहुमताने युती पुन्हा सत्तेवर येण्याचा दावा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कामगिरी उजवी ठरली आहे. युतीला राज्यात पुन्हा दमदार कामगिरी करण्याची संधी जनता देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’चे प्रतिनिधी योगेश कुटे यांच्याशी बोलताना सांगितले. या मुलाखतीचा...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून...
मार्च 11, 2019
सोलापूर : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या सहकार्याने "सकाळ'ने जागतिक महिला दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या म्युझिकल हीलिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून न्यासा संस्थेच्या संचालिका साधना गांगण यांनी सोलापूरकरांच्या चेतना जागविल्या. सोमवारी सकाळी पार्क स्टेडीअमवर हजारो सोलापूरकरांनी या कार्यक्रमास...
जानेवारी 26, 2019
पुणे - ‘परमिट’च्या नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या ११८ खासगी बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) अचानक तपासणी केली. त्यातील ७५ बसवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ४७ बस ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक होते, कर भरलेला नसतो, विमा नसतो, एसी बस असली तरी,...
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
ऑक्टोबर 10, 2018
सोलापूर- राज्यातील नऊ मेच्या शासन निर्णयातून वगळलेल्या 51 शाळा व 19 तुकड्यांच्या तपासणीमध्ये शिक्षण संचालकांनी मनमानी केली होती. शासनाने सांगितलेल्या मुद्यांच्या बाहेर जाऊन त्यांनी तपासणी केल्याने अनेक शाळा अपात्र झाल्या होत्या. या शाळांची तपासणी आता आयुक्त कार्यालयाकडून होणार असल्याने शिक्षण...
जुलै 27, 2018
सोलापूर : सोलापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. मागील सात-आठ दिवसापासून आंदोलन सुरू असूनही सरकार याची दखल घेत नसल्याने समाजाच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला.  पालकमंत्री देशमुख यांच्या घरासमोर पोलिसांचा...
जुलै 26, 2018
लातूर : मराठा समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्र बंदही पुकारण्यात आला; पण अद्याप या मागणीचा सरकार दरबारी विचार झाला नाही. त्यामुळे आंदोलनाची धग सुरूच आहे. अशा स्थितीत लिंगायत समाजही पुढे आला आहे. ‘तुमचे आश्वासन पूर्वीच मिळाले;...
मे 04, 2018
दौंड (पुणे) : लिंगाळी (ता. दौंड) येथे पूर्ववैमनस्यातून विनोद बाबूलाल नरवाल (वय 42) या व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी तीन महिलांसह एकूण 20 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी याप्रकरणी त्यापैकी तिघांना अटक केली आहे. उर्वरित १७ आरोपी फरार असून, त्यामध्ये रेल्वे...
मार्च 17, 2018
अक्कलकोट : विवेकानंद प्रतिष्ठान व सोलापूर जिल्हा योग समिती यांच्या वतीने घेण्यात आलेल्या योग गुरू रामदेवबाबा यांच्या योग शिबिरास आज पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. एवन चौकातील राजे फत्तेसिंह मैदानावर दि. १७ ते १९ मार्च हे तीन दिवस दररोज पहाटे ५ ते साडेसात या वेळेत हे शिबित घेतले जात आहे. त्याला...
जानेवारी 02, 2018
सोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - विद्यार्थी कायद्यात बदल करण्यात आले असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांमध्ये निवडणुका घेता येणार आहेत. या निवडणुकांमध्ये ‘यिन’चे प्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करा, पण...
नोव्हेंबर 27, 2017
मुंबई - विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना भाजप आणि कॉंग्रेस पक्षाने "थांबा आणि पाहा'ची भूमिका घेत अजूनही आपले उमेदवार निश्‍चित केले नाहीत. कॉंग्रेस पक्षाने बैठकीचा जोर लावला असून, भाजप रात्री उशिरा बैठक घेऊन उमेदवाराच्या नावावर चर्चा करणार आहे....
सप्टेंबर 19, 2017
सोलापूर - वर्तमानपत्रांमध्ये सध्या व्यावसायिक स्पर्धा खूपच वाढली आहे. या स्पर्धेच्या युगात कोणाचेही चारित्र्यहनन होणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे. हे करत असताना परखड लिहिणाऱ्या पत्रकारांची संख्या वाढायला हवी, असे मत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. ...
मार्च 30, 2017
सोलापूर - जुनी मिल जागेच्या फसवणूकप्रकरणी उद्योजक कुमार करजगी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. घरासाठी आयुष्याची पुंजी लावणाऱ्या सर्वसामान्यांची या घटनेमुळे झोप उडाली आहे. घरांच्या विक्रीसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या जातात. या योजनांवर डोळे झाकून विश्‍वास न ठेवता कागदपत्रांची पाहणी करून,...
मार्च 19, 2017
नीतिमूल्ये जपणारा माणूस समाजात परिवर्तन घडवू शकतो. परिवर्तन घडविण्याची "डीएव्ही'मध्ये क्षमता आहे. संस्थेच्या देशभरात 914 शाखा आहेत. 60 हजार शिक्षक कार्यरत असून 20 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेमार्फत केवळ विद्यार्थी नव्हे तर "मनुष्य' घडविण्याचे काम अविरत केले जाते, असे दयानंद शिक्षण...
फेब्रुवारी 17, 2017
भाजपचे मंत्री प्रचारासाठी रस्त्यावर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोचली आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री रस्त्यावर उतरले आहेत. चक्क पदयात्रा काढत आहेत.  सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख हे त्यांच्यावर...