एकूण 9 परिणाम
जानेवारी 09, 2019
सोलापूर : चौकीदार चोर है.. असे म्हणत काळे झेंडे दाखवत कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनाचा तफा अडविण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, महापालिका गटनेते चेतन नरोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
जुलै 27, 2018
सोलापूर : सोलापुरातील सकल मराठा समाजाच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. मागील सात-आठ दिवसापासून आंदोलन सुरू असूनही सरकार याची दखल घेत नसल्याने समाजाच्यावतीने सरकारचा निषेध करण्यात आला.  पालकमंत्री देशमुख यांच्या घरासमोर पोलिसांचा...
जुलै 25, 2018
मुंबई - राज्यभरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर आज मुंबईसह नवी मुंबई, रायगड, पालघर, सातारा जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मुंबई मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची मंगळवारी दादर येथील शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक झाली. यात सरकारच्या मराठाविरोधी धोरणांचा निषेध करून...
जुलै 02, 2018
हिंगणा - भरधाव जाणाऱ्या सिमेंट मिक्‍सर टॅंकरने दोन दुचाकीला उडविले. या अपघातात  दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. एक दिवस उलटूनही टॅंकर चालकाला अटक न केल्यामुळे पोलिसांविरोधात संतप्त किन्ही (धानोली)व मांगलीच्या ग्रामस्थांनी रुग्णालयासमोर रविवारी(ता.१) सकाळी आंदोलन सुरू केले. ...
जून 08, 2018
निफाड : नाशिक औरंगाबाद महामार्गावर आज (ता. 8) सकाळी दहा वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासह अन्य मागण्यांसाठी निफाडला शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत तासभर रास्तारोको अंदोलन केले. आंदोलनास पाठींबा देत निफाड बंद ठेवण्यात आला.  या बंदला शंभरटक्के प्रतिसाद...
फेब्रुवारी 21, 2018
लासूर स्टेशन - लासूर स्टेशन (ता. गंगापूर) येथील आडत व्यापारी विनोद जाजू यांच्या राहत्या घरी मंगळवारी (ता.२०) पहाटे दोन चोरट्यांनी मारहाण करून १३ तोळे सोने व एक लाख रुपये रक्‍कम असा एकूण पाच लाख साठ हजारांचा ऐवज लुटला. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत जखमी झालेले विनोद जाजू...
फेब्रुवारी 20, 2018
औरंगाबाद - नारेगाव (मांडकी) येथील कचरा डेपोविरोधात सोमवारी (ता. १९) चौथ्या दिवशीही नागरिकांचे आंदोलन सुरूच असून, या काळात सुमारे दीड हजार टन कचरा शहराच्या विविध भागांत साचलेला आहे. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, कचऱ्याच्या कोंडीवर...
जानेवारी 02, 2018
सोलापूर - भीमा-कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारत शेतमालाच्या गाड्या उतरण्यास नकार दिल्याने मंगळवारी (ता.2) बाजार समितीत तणाव निर्माण झाला. मध्यरात्रीपासूनच हमाल-तोलारांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांची चांगलीच...