एकूण 138 परिणाम
जून 18, 2019
वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषिकेश सोनटक्‍के (टाकरखेडा, जि. अमरावती) या २४ वर्षीय तरुणाने चार वर्षांतच संत्रा शेतीत दमदार पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सध्या दहा एकरांतील ११०० झाडांचे काटेकोर व्यवस्थापन तो आत्मविश्‍वासपूर्वक करतो आहे. स्वतः प्रशिक्षण, मार्गदर्शन घेत अन्य शेतकऱ्यांनाही...
जून 17, 2019
चाऱ्यासारखी पीकपद्धती देखील शाश्‍वत उत्पन्नाचा पर्याय ठरू शकतो, हा विश्‍वास नागपूर जिल्ह्यातील अरोली गावच्या शेतकऱ्यांनी खरा करून दाखविला आहे. ४५ शेतकऱ्यांच्या विश्वास गटाने नुसत्या चारा पिकातून तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. या शेतकऱ्यांनी घरपोच चारा ही संकल्पनाही राबवली आहे. ...
जून 07, 2019
अत्यंत अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, त्यातून साकारलेले काटेकोर बाग, पाणी, रोग व्यवस्थापन या घटकांच्या जोरावर वाघोली (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील प्रवीण बेलखेडे यांनी सुमारे पाच एकरांतील संत्रा झाडांचे उत्पादन व त्याचा दर्जा सातत्याने उत्तम राखण्याचा प्रयत्न केला आहे....
मे 31, 2019
कोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...
मे 21, 2019
कधीकाळचे केळीचे हब वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुका कधी काळी केळीचे हब म्हणून नावारूपास होता. पवनार तालुक्‍यात सुमारे ३० वर्षांपूर्वी केळीची लागवड व्हायची असे येथील कुंदन वाघमारे सांगतात. दररोज सरासरी ३५ ते ४० ट्रक येथून ‘लोड’ व्हायचे, अशी माहिती ३५ वर्षांपासून केळी व्यापारात असलेल्या सेलू येथील सुदेश...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
एप्रिल 16, 2019
अकोला - जिल्ह्यात पाणी समस्येने बागायती क्षेत्रातील शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण केली आहे. अनेकांवर उभी पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. यावर्षी एक हेक्टरमध्ये लागवड केलेल्या केळी बागेवर अडीच लाखांचा खर्च करणाऱ्या हिवरखेड येथील विनोद रेखाते या तरुण शेतकऱ्याचीही अशीच अवस्था झाली आहे....
एप्रिल 09, 2019
धामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या  ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...
मार्च 22, 2019
जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी तालुक्‍यांमध्ये काकडीचे पीक घेतले जाते. त्यातील वाळके नावाने लोकप्रिय असलेल्या काकडीला उन्हाळ्यात सर्वाधिक मागणी असते. ती शेतकऱ्यांना अधिक दरही मिळवून देते. त्याचबरोबर लांब, आखूड सफेद असेही प्रकार जिल्ह्यातील शेतकरी घेतात. मार्च-एप्रिलमध्ये काकडीला...
मार्च 22, 2019
निंभा (ता. पारशिवणी, जि. नागपूर) येथील अनिकेत वैद्य हे मेकॅनिकल इंजिनियर. त्यांनी विशाखापट्टणम व त्यानंतर हैदराबाद येथे खाजगी बॅंकेत नोकरी केली. त्यांचे वडील अविनाश ‘बीएसएनएल’ मध्ये नोकरीस होते. पिता-पुत्र दोघेही नोकरीत असले तरी शेतीची आवड मात्र दोघांनी जपलेली होती. त्यामुळेच वडिलांनी...
मार्च 05, 2019
कुसुंबा (जि. धुळे) - दुर्दम्य इच्छाशक्ती व ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा असली, की यशश्री निश्‍चितच आपल्या गळ्यात माळ घालते, याची प्रचिती येथील शेतकरी कुटुंबातील दिव्यांग सचिन शिवाजी शिंदे याने दिली आहे. अपंगत्वावर मात करून सचिनने पुरवठा निरीक्षकपदाच्या परीक्षेत अपंग संवर्गातून राज्यात पहिला क्रमांक...
फेब्रुवारी 22, 2019
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागली आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी...
जानेवारी 13, 2019
शेतकरी आत्महत्या हा विषय कायम अस्वस्थ करत आला. या अस्वस्थतेला वाट मिळाली "गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटात. हा चित्रपट म्हणजे खरं तर आमच्या संतापाचा उद्रेक होता. पटकथा म्हणून त्या चित्रपटाकडं बघितलंच नव्हतं. ते एक गाऱ्हाणं होतं. तो अन्यायाविरोधातला आमचा आमच्या परीनं केलेला एक आवाज होता. आजही हा...
जानेवारी 01, 2019
नागपूर : राजकुमार हिराणींच्या ‘थ्री इडियट्‌स’ या चित्रपटातील कथेला साजेसे वास्तववादी कथानक येथे आकार घेत आहे. मोठ्या शहरातींल गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांना तिलांजली देत रासायनिक अंशमुक्त शेती, पर्यावरण, माती सुपीकता, संवर्धन, गोरक्षण ही ध्येये उराशी बाळगून विदर्भातील तीन तरुणांनी एकत्र येत शेतीत ‘...
डिसेंबर 12, 2018
शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर रघुपतराव देशमुख यांची सुमारे ५० एकर शेती  खारपाण पट्ट्यात आहे. येथे विविध पिके घेण्यास मर्यादा येतात. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांची सुमारे १५० एकर शेती कसायला घेत कापूस या मुख्य पिकाद्वारे त्यांनी एकूण २०० एकरांंपर्यंत शेतीचा विस्तार साधला आहे. चार...
डिसेंबर 02, 2018
पुणे : "पाऊस अवकाळी झाला आहे. रान उदास झालंय, विहिरी-नद्या-नाले कोरडे झालेत. गवत वाळून चाललंय. उभी पिकं करपून जात आहेत. शेतकऱ्यानं कसं जगायचं... अशा व्यथा मांडत ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर, रोजगाराच्या शोधात शहरात दाखल झाले आहेत. निदान शहरात तरी हाताला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा आहे. ही संख्या...
नोव्हेंबर 24, 2018
नागपूर -  ‘ॲग्रोवन’मधील यशोगाथांची दखल घेत अशा प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शिवारातील प्रयोगांची चाचपणी करून अशी मॉडेल इतरांसमोर नेण्यात येणार आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने त्यासाठी पुढाकार घेतला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या नापिकीला कंटाळून केली असल्याचे कुटूंबाचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.  विनोद आप्पाराव रेवळे (वय 31...
ऑक्टोबर 05, 2018
(पुणे) : ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने सहा वर्षांपूर्वी अमेरिकेतून आयात केलेल्या उच्च आनुवंशिकतेच्या होल्स्टिन वंशाच्या गाईच्या भ्रूणाचे प्रत्यारोपण (एम्ब्रियो ट्रान्स्फर) यशस्वी झाले असून, शारदानगरमधील या प्रयोगात सध्या सात सरोगेट गाई "गर्भवती' आहेत. ही "गुड न्यूज' ऐकून माजी केंद्रीय कृषिमंत्री...