एकूण 50 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकांची मनसोक्त करमणूक केली. त्यांच्या या कामाबद्दल त्यांनी आता सरकारकडे करमणूक कर भरावा, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.  गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीचे...
मे 10, 2019
नवी दिल्ली : तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचा वापर "वैयक्तिक टॅक्‍सी'प्रमाणे केल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप माजी नौदल प्रमुख ऍडमिरल (निवृत्त) एल. रामदास यांनी आज फेटाळला. त्या वेळी आयएनएस विराटचे कमांडिंग ऑफिसर असलेले व्हाइस ऍडमिरल (निवृत्त) ...
मे 03, 2019
नवी दिल्ली: निवडणूकीच्या रिंगणात सनी देओल असो वा सनी लिओनी. काही झाले तरी ते पडणारच, असे काँग्रेस नेते राजकुमार चब्बेवाल यांनी एका प्रचारसभेत म्हटले आहे. अभिनेते सनी देओल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून, पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून ते निवडणूकीच्या रिंगणात आहेत. होशियारपूर...
मे 03, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकारांना...
मे 02, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली.  शरद पवार...
एप्रिल 29, 2019
पनवेल : पनवेलमधील सुकापूर आणि देवद गावांमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटप करणाऱ्या युती, आघाडीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख महेंद्र गगलानी आणि प्रभाग प्रमुख विनोद मोहरे यांनी यासंदर्भात...
एप्रिल 28, 2019
पनवेल : पनवेलमधील सुकापूर आणि देवद गावात पैसे वाटपाचे प्रकरण समोर आले. यामध्ये सुकापुरतून राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकर्त्यास तर, देवद येथून शिवसेनेच्या कार्यकर्त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. या कार्यकर्त्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  निवडणूक भरारी पथक क्रमांक 5 मधील प्रभाग...
एप्रिल 25, 2019
पिंपरी : ''भारतीय जनता पक्ष आणि पाकिस्तानचे नाते जुने राहिले आहे. भाजपचे सरकार असताना त्यांनी पाकिस्तानवर प्रेम दाखवले आहे, या दोघांची मैत्री म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी (ता. 25) केली.  मावळ मतदारसंघातील महाआघाडीचे...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 22, 2019
लोकसभा 2019 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणूक प्रचारातील भाषा अतिशय खालच्या पातळीला गेली आहे. जेव्हा पवार यांच्यासारखे नेते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करतात, तेव्हा निवडणूकीत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसत आहे, अशी जोरदार टीका शिक्षण मंत्री विनोद...
एप्रिल 21, 2019
पुणे : देशातील छपन्न पक्ष एकत्र आले तरी छप्पन इंचवाल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव करू शकत नाहीत. त्यांचे अबतक छप्पन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा घणाघात शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी केला. बारामती लोकसभा युती उमेदवार कांचन कुल यांच्या हिंजवडी येथील प्रचाराच्या सांगता सभेत ते...
एप्रिल 20, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकावर सुटाबुटातील सरकार असे आरोप करणाऱ्या काँग्रेसचे खरे रूप आता समोर आले आहे. अंबानी, कोटक यांच्या सारख्या उद्योगपतींच्या जोरावरच काँग्रेस पक्ष चालत असल्याचे आता स्पष्ट झाल्याची जोरदार टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केला....
एप्रिल 18, 2019
बारामती शहर : लोकसभा निवडणुकीतील भाजप-महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शुक्रवारी (ता.19) बारामतीत सभा होणार आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील रेल्वे ग्राऊंडवर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली....
एप्रिल 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण त्या जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात...
एप्रिल 18, 2019
मुंबई - सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून माफीची अपेक्षा करणाऱ्या भाजपच्या विनोद तावडे यांनी आधी नोटाबंदीमुळे जनतेला झालेल्या त्रासाबद्दल नरेंद्र मोदी यांना कोणत्या चौकात शिक्षा द्यायची, याचे उत्तर द्यावे. पन्नास दिवस द्या, त्यानंतर जनता सांगेल ती शिक्षा भोगायला तयार...
एप्रिल 18, 2019
मुंबई - राज ठाकरे यांनी प्रचार सभा सुरू केल्यापासून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे. देशातील पहिले डिजिटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरून मनसे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. "तावडे यांना एकदा तरी तुमच्या गाडीत बसायची...
एप्रिल 18, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांच्या खर्चाबाबत भाजपने प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर राज्य निवडणूक अधिकारीही बुचकळ्यात पडले आहेत. एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नसणाऱ्या पक्षाच्या नेत्यांची सभा झाल्यास तो खर्च कोणाच्या खात्यात मांडायचा, याबाबत केंद्रीय...
एप्रिल 17, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ...म्हणून राज यांच्या सभांना गर्दी 'चौकीदार चोर है'पेक्षा ‘लाव रे तो व्हिडिओ’ची दहशत जेथे पवार तेथे राज यांची स्क्रिप्ट - ...
एप्रिल 17, 2019
लोकसभा 2019 नवी मुंबई : लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळीला जोरात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसली असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. दोनच दिवसांपुर्वी राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकीज असून काल सोलापूरमध्ये शो होता, तर आज कोल्हापूरमध्ये आहे, अशा शब्दात तावडे यांनी राज...
एप्रिल 17, 2019
मुंबई - ज्या ठिकाणी शरद पवार असतील, तेथे राज ठाकरे पोचतात, तिथे दोघांमध्ये गुफ्तगू होते आणि त्यानंतर राज ठाकरेंच्या पुढच्या भाषणाची स्क्रिप्ट तयार होते, असा टोमणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लगावला.  तावडे म्हणाले की, काल...