एकूण 16 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचा आज नव्वदावा वाढदिवस. अशा वेळी एका उभरत्या गायिकेला आठवतेय त्यांनी दिलेली दाद. त्या दिवशी आम्ही सगळेच खूप आनंदात होतो. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा ऐंशीवा वाढदिवस होता. षण्मुखानंदचा हॉल खचाखच भरलेला. विनोद तावडे, जावेद अख्तर आणि लतादीदी...
फेब्रुवारी 27, 2019
खाद्या माणसाने आपल्याला मदत करून दिलासा दिला तर त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटत राहते. ती व्यक्त झाली तरच आपले भाव त्या व्यक्तीपर्यंत पोचतील. त्या व्यक्तीची तशी अजिबात अपेक्षा नसतेसुद्धा, पण ते व्यक्त करणं ही आपलीही भावनिक गरज असते. आज मला अशाच एका व्यक्तीबद्दलची माझी कृतज्ञता जाहीररित्या व्यक्त...
फेब्रुवारी 16, 2019
जीवन प्रवाही आहे खरे, पण त्यात थोडे थोडे थांबेही हवेत. पुढच्या प्रवासाला सुरवात करण्याआधीचे क्षणिक विराम. "गोमू संगतीनं माझ्या तू येशील का?' विचारल्यावर तिने "न्हाय' म्हटले आणि अगदी शेवटी "हाय' म्हणण्याच्या अगोदर क्षणिक विराम अर्थात "पॉज' घेतला आहे. आता या पहिल्या "न्हाय'च्या नंतरचा हा छोटा "पॉज'...
नोव्हेंबर 08, 2018
जन्मशताब्दी हे निमित्त. पु. ल. देशपांडे यांचे चाहते व टीका करणारे यांचा वाद अजूनही रंगतो. या वादाला एका वाचकाने दिलेले हे उत्तर... प्रिय पु.ल., तुम्हाला जाऊन इतकी वर्षे झाली, तरी प्रसंगोपात तुमची आठवण येतच असते. रोजच्या धावपळीतून फुर्सत मिळते किंवा कधी एकाकी वाटते, तेव्हा तुमचे एखादे पुस्तक हाताशी...
ऑक्टोबर 02, 2018
पायरीवरून पाय निसटला आणि पाऊल पूर्ण वाकले. शस्त्रक्रियेनंतर पाऊल नीट झाले. मामेबहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेले होते. लग्नघरी सर्व नातेवाईक भेटले. गप्पा-विनोद चालू होते. गुरुजींनी मुलीच्या मामाला मुलीला घेऊन येण्यास सांगितल्यावर एकच धांदल उडाली. लग्नमंडप खाली असल्याने...
ऑगस्ट 16, 2018
नमस्कार... आपल्या सर्वांचे अतिशय लाडके व्यक्तिमत्व असलेले तसेच सुप्रसिध्द जेष्ठ कविवर्य  आणि भारताचे मा. पंतप्रधान सन्माननिय जेष्ठ नेते श्री. अटल बिहारी वाजपेयीजी यांची एक खूपच छान अशी आठवण, जी आजतागायत मला सदैव तत्पर आणि प्रसन्न ठेवते व माझ्या मनात, त्यांच्या बद्दलचा आदर नेहमीच वाढत ठेवते... सन...
एप्रिल 09, 2018
अक्षरांचा घोळ झाल्यावर किती फजिती होते, गमतीशीर विनोद घडतात, नाही? आपल्याबाबतीत, आसपास अशा काही गमती-जमती घडून गेल्या असतील. आठवल्या तरी आता हसू फुलवणाऱ्या... माझे पती, प्रा. सुहास जोग यांचे संपूर्ण आयुष्य त्यांचे विद्यार्थी व पक्षिप्रेम   यांच्यामध्ये गुंतले होते. त्यांना अतिशय जलद व...
जानेवारी 22, 2018
सत्तरावा वाढदिवस सायकलवरून कन्याकुमारीला जाऊन साजरा करायचा, ही कल्पना कशी वाटते? सायकलप्रेमी समूहाने ठरवले आणि आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस सायकल सफर करून साजरा केला. माझ्या सायकलप्रेमी गटाने माझा सत्तरावा वाढदिवस पुणे- कन्याकुमारी असा सायकल ट्रेक करून कन्याकुमारीला साजरा करायचा असे ठरवले आणि तसे...
जानेवारी 05, 2018
शाळेची सहल गोव्यात गेली होती. पहिल्यांदा नादुरुस्त गाडीतील शिक्षक मागेच राहिले. तर नंतर परतीच्या मार्गावरच मुले हरवली. संपर्काची साधनेही नव्हती. अजून त्या आठवणीनेही काळजात धस्स होते. दापोडीतील स्वामी विवेकानंद व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षिका होते. एकदा शाळेची सहल गोव्याला गेली होती. सहलीसाठी दोन...
नोव्हेंबर 29, 2017
'दिवाळी पहाटेच्या' दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. सर्व गायक, वादक, नर्तक उत्तम साथ देत होते; पण अजूनही खर्च आणि पैसे यांचा मेळ बसत नव्हता... एकल सादरीकरण करणाऱ्या कलाकारांची "आम्ही एकपात्री, महाराष्ट्र' ही आमची राज्यस्तरीय संस्था. या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षे आम्ही मनोरंजनाबरोबरच सामाजिक...
ऑक्टोबर 05, 2017
बालासोरचा समुद्र ओहोटीच्या वेळी तीस-चाळीस किलोमीटर आत सरकतो आणि दारूगोळ्याच्या चाचण्या घेण्यासाठी मोठी रेंज उपलब्घ होते. ब्रिटिशांनी शोधलेली ही रेंज गेली शंभर वर्षे वापरात आहे. आम्ही तिघे बालासोरला निघालो होतो. चाळीस मिलिमीटर विमानविरोधी गनच्या दारूगोळ्याची चाचणी घेण्यासाठी आम्ही चाललो होतो. त्या...
मार्च 31, 2017
परदेशात अचानक वेगळाच मार्ग आपल्याला सुचवला जातो. आपल्यालाही त्यातील थ्रिल त्या मार्गावर जायला लावते. पण जोशात सुरू केलेल्या प्रवासात काहीतरी चुकते आणि मग थ्रिलची जागा चिंता घेते. आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो. मेलबर्नहून सिडनीला जायचा बेत होता. संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेन होती. आरक्षण आधीच झालेले...
मार्च 30, 2017
"व्हॉट्‌सऍप'वरून स्त्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. त्या आभासी जगात व्यक्त होतात; पण हा संवाद त्यांना त्यांच्या वास्तव जगात अधिक सुंदर करीत असतो. ती अधिक बोलकी होऊ लागली, सर्जनशील होऊ लागली, स्वीकारशील होऊ लागली. परवा माझ्या मैत्रिणीचा "काय म्हणता?' (व्हॉट्‌सऍप) वरून एक संदेश आला. "आयुष्य म्हणजे एक...
मार्च 24, 2017
  एखाद्या ठिकाणी आपण निर्हेतूक उभे राहायचे. नजर कोरी ठेवून समोरचे दृश्‍य टिपायचे. कानातून आरपार आवाज स्वीकारायचे. अशावेळी वाऱ्याची झुळूक जराही स्पर्श न करता दूर राहील, तर कुणी धसमुसळा धक्का मारून जाईल. तो गर्दीचा प्रवाह असतो कधी शांत, कधी रोंरावता....   स्थळ : महाबळेश्वर ... बाजार. बाजारातील एका...
ऑक्टोबर 12, 2016
आयुष्यात अनेक वेळा अनेक प्रसंगाना सामोरे जावे लागते. विविध प्रसंगांना मनुष्य तोंड देत असतो. घडून जाते काही नकळत. आपण विचार करीत राहतो, इतका मूर्खपणा आपण कसा केला?  नागपूरला नात्यातले लग्न होते. रजा मिळाली तर जायचे ठरविले होते. ‘महाराष्ट्र एक्‍स्प्रेस’चे आरक्षण करून ठेवले होते. रेल्वेचे आरक्षण...
जुलै 05, 2016
राज्यपालांच्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वाने आम्ही भारावून गेलो. चुरचुरीत विनोद, आठवणी दिलखुलास पद्धतीने सांगत त्यांनी सर्वांना आपलेसे केले. गप्पा मारता-मारता सिक्कीमची भौगोलिक रचना, हवामान, लोकांचे स्वभाव, चालीरीती, तेथील स्वच्छता या बाबीही त्यांनी मोकळेपणाने सांगितल्या. त्यांनी बारकाईने...