एकूण 31 परिणाम
जून 14, 2019
चंद्रपूर, : समाज कल्याण सभापती बिरजू पाझारे आणि समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव यांची जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चांगलीच कानउघाडणी केली. एका कार्यक़्रमाच्या मुख्य बॅनवरून भोंगळे यांचे नावच गायब करण्यात आले. त्यामुळे ते संतप्त झाले. शेवटी या दोघांनीही आपली चूक कबुली केली आणि वेळेवर...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...
मे 02, 2019
मतदारसंघात तसे पाहिले, तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेनेकडे आहेत; पण लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर कदाचित त्यांचा हुरूप वाढू शकतो. लोकसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होईल, असा...
एप्रिल 14, 2019
चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमध्ये एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीचे आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोअर झोनमधील खातोडा गेटपासून काही अंतरावर असलेल्या एका आंब्याच्या झाडाखाली या वाघिणीचा...
मार्च 31, 2019
संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...
जानेवारी 02, 2019
मुंबई - अद्याप अनेकांची नववर्षाच्या स्वागताची झिंग उतरली नसताना राज्य सरकारने नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी तळीरामांच्या खिशाला हात घातला आहे. सरकारने भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर आकारल्या जाणाऱ्या उत्पादन शुल्कात 15 ते 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ मंगळवारपासून अमलात आली असून,...
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
डिसेंबर 23, 2018
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य वन व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे चौथे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी (ता. 23) प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. अधिवेशनाचे उद्‌घाटन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाला वनराज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, प्रधान...
डिसेंबर 16, 2018
चंद्रपूर : जिल्ह्यात वाढलेल्या वाघांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. रोज माणसांवर वाघांचे हल्ले होत आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प वगळता संरक्षित जंगलातही वाघांची संख्या झपाट्याने वाढली. त्यांना क्षेत्र अपुरे पडत आहे. त्यामुळे नवा अधिवास शोधताना वाघ आता अगदी शहराच्या वेशीवर येऊन ठेपले...
डिसेंबर 13, 2018
चंद्रपूर : "अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (गुरुवार) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.  यवतमाळ जिल्ह्यात "अवनी' वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार...
डिसेंबर 13, 2018
मुंबई - राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यांत कॉंग्रेसने बाजी मारली आहे. या सरसीमुळे राज्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असला, तरी राज्य पातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांचा जनाधार तोळामासा असल्याचे अलीकडेच झालेल्या नगर परिषदा, नगरपंचायत, महापालिका निवडणूक निकालांवरून सिद्ध...
डिसेंबर 11, 2018
नागपूर - गेल्या 27 वर्षांपासून एकहाती सत्ता राहिलेल्या ब्रह्मपुरी नगर परिषदेवर कॉंग्रेसने कब्जा केल्याने चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यातील प्रभावाला ग्रहण लागल्याची चर्चा आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील राजकारण मुनगंटीवार यांच्याभोवती फिरत आहे. केंद्रीय मंत्री...
डिसेंबर 10, 2018
नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे 3600 मतांनी विजयी झाल्या. काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मतदारसंघातील महत्त्वपूर्ण नगर परिषद घेऊन वर्चस्व सिद्ध केले.  या नगरपरिषदेवर गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व होते...
सप्टेंबर 17, 2018
गोंडपिपरी जि.चंद्रपूर : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून राज्यात तेरा कोटी वृक्षलागवडीची मोहिम फत्ते करण्यात आली. यापुढील काळात त्यांनी 33 कोटी वृक्षलागवडीची संकल्पना ठेवली आहे. याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातील रोपवाटिकांत सुरू असलेल्या रोपांच्या कामाची पारदर्शकता स्पष्ट...
ऑगस्ट 23, 2018
चंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर...
मे 28, 2018
चंद्रपूर - जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केल्याची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २७) ‘मन की बात’मध्ये घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांनी शौर्य मोहिमेचे कौतुक केल्याबद्दल आभार मानत आनंद व्यक्त केला. आदिवासी...
एप्रिल 25, 2018
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाद झाला आहे. या प्रकरणी बसपतर्फे पाझारे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पाझारे यांच्या या वक्तव्यामुळे...
डिसेंबर 30, 2017
गडचिरोली - भाजप सोशल मिडीया सेलचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य व राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक अमोल कोंडबत्तुलवार यांचा आज (शनिवार) पहाटे कार अपघातात मृत्यू झाला. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर भुयार जवळ आज पहाटे हा अपघात झाला. कोंडबत्तुलवार यांच्या कारला (एमएच 34 7001)...
ऑगस्ट 31, 2017
अकोला : मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके विकास कामाच्या दृष्टीने पिछाडीवर असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यांमध्ये रोजगार निर्मितीसह दारिद्र निर्मुलन, शिक्षण, उद्योग आदी विकास कामांवर भर दिला जाणार आहे. पिछाडीवर असलेल्या तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याचाही...
जुलै 14, 2017
वर्धा - विदर्भातील वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन दारूबंदीच्या जिल्ह्यांचा मिळून प्रभाग निर्माण केला जात आहे. या प्रभागात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी तसेच अवैध दारू व हातभट्ट्या रोखण्याकरिता स्वतंत्रपणे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची २२ पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे...