एकूण 157 परिणाम
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास...
जून 11, 2019
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे संकेत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज (मंगळवार) दिले. तसेच या विस्तारात महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेसह इतर काही पक्षांनाही संधी दिली...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
जून 11, 2019
नाशिक : युतीत मतभेद नाही. "ये दोस्ती हम नहीं तोडेंगे,' असे म्हणत "अबकी बार 220 पार' या न्यायाने एकदिलाने काम करून राज्यात भाजप-शिवसेना युतीच्या 220 जागा निवडून आणायचा आमचा निर्धार आहे. आमचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या भाजप कार्यकर्त्यांना तशा स्पष्ट सूचनाच आहेत. त्यामुळे राज्यात आगामी मुख्यमंत्री...
जून 06, 2019
मुंबई - राज्य सरकारने बारामतीला जाणाऱ्या कालव्याचे पाणी बंद केले आहे. या पार्श्‍वभूमीवर बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला ‘पाण्यावरून राजकारण करू नये,’ असा टोला लगावत ‘घरचा आहेर’ दिला. दरम्यान, सरकार राजकारण करीत नसल्याचे स्पष्टीकरण अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
जून 04, 2019
गोखलेनगर - ‘‘मानव पर्यावरणाचे नुकसान करून स्वत:च्या पायावर दगड मारून घेत आहे. नद्या, नाले, तळी याचे माणसांकडून शोषण केले जात आहे. पर्यावरणाची चावी वृक्षांत आहे. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी झाडे लावण्यात येतील,’’ अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गोखलेनगर येथे भांबुर्डा वन...
जून 04, 2019
वृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
जून 03, 2019
पुणे : राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी वन विभागांबरोबर वनेतर जमिनीवर वृक्ष लावण्याची आखणी करीत आहोत. नव्वद दिवसांत ३३ कोटी वृक्षारोपण करण्यात येणार असून, या मोहिमेमुळे महाराष्ट्राला वनीकरण क्षेत्रात देशात आघाडी घेण्याची संधी मिळाली असल्याचे मत राज्याचे वनमंत्री सुधीर...
जून 01, 2019
नाशिक - विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर संबंधिताने पाचपट झाडे लावण्याचा नियम आहे. पण पूर्णवेळ यंत्रणेअभावी त्याचे उल्लंघन होते. त्यावर उपाय म्हणून वृक्षतोडीनंतरही झाडे न लावणाऱ्यांना दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.  राज्यस्तरीय...
जून 01, 2019
नाशिक - पावसाळी अधिवेशनाला १७ जूनपासून सुरवात होत असून, त्यापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणाने सांगत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असा निर्वाळा दिला. वन विभागाच्या अधिकारी परिषदेनंतर त्यांनी...
मे 30, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवावरून कॉंग्रेस पक्षाची उपयोगिता संपल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेसमधील चांगल्या व सेवाभाव जोपसणाऱ्या नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांचा सदुपयोग केला जाईल, असा टोला राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी बोलताना हाणला.  33 कोटी...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 28, 2019
गणनेनंतरची आकडेवारी प्रसिद्ध; संख्या वाढली मुंबई - देशात व्याघ्रगणना पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील वाघांची संख्या 245 असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने वाघांच्या वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला. भारतीय वन्यजीव संस्थानमार्फत...
मे 24, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील युतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचे संकेत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला खूष करण्यासाठी उपमुखमंत्रिपद देण्यात येणार असून, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना या पदावर बढती मिळणार आसल्याची...
मे 22, 2019
मुंबई - भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी राज्यातील दुष्काळ असलेल्या जिल्ह्यांतील चारा छावण्यांना भेट देतील आणि भाजपची प्रत्येक जिल्हा शाखा दुष्काळग्रस्त भागात सेवाकार्य करेल, असा निर्णय मंगळवारी पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या वेळी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र...
मे 19, 2019
मुंबई - ‘अरुण बोंगिरवार हे केवळ अधिकारी नव्हते, तर ते प्रशासनातला एक स्वतंत्र ‘पॅटर्न’ होते,’ असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे काढले. प्रशासकीय सेवेत लोकाभिमुख, पारदर्शक व सकारात्मक काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर...
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
मे 08, 2019
चंद्रपूर : कर्जाचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या सावकाराने कर्जदाराच्या मुलाला आणि पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना मंगळवारी (ता. 7) चंद्रपुरात घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी जसबीर भाटिया ऊर्फ सोनू याच्याविरोधात जिवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत तोही जखमी झाला आहे. सरकारनगरात हरिश्‍...
मे 02, 2019
मतदारसंघात तसे पाहिले, तर विधानसभेच्या सर्व जागा भाजप आणि शिवसेनेकडे आहेत; पण लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने केलेल्या आघाडीने त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. निकालानंतर कदाचित त्यांचा हुरूप वाढू शकतो. लोकसभा निवडणूक निकालाचा थेट परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होईल, असा...