एकूण 13 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
मु्ंबई : महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत मोठा राजकीय धक्का देणारा दिवस म्हणून, आजच्या दिवसाची नोंद होणार आहे. शनिवारी (ता.23) सकाळी संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना, राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : भाजपचे एक ज्येष्ठ नेते आणि मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मागील दोन दिवसांपासून वारंवार गोड बातमीचे दाखले देत आहेत. आता ही गोड बातमी म्हणजे नेमकी कोणती सरकार पक्षात कोणी बाळंत होणार आहे की कोणाचे लग्न वगैरे ठरले आहे. अर्थात गोड बातम्यांचे कितीही दाखले दिले तरी पाळणा हलणार का? तो कसा...
नोव्हेंबर 04, 2019
भाजप-शिवसेना युतीत समसमान सत्ता वाटपावरून वाद सुरू झाल्याने विधानसभेच्या अध्यक्ष पदाला पुढील राजकीय हालचालीच्या दृष्टीने महत्त्व येणार आहे. हे अध्यक्षपद मिळविण्यासाठी शिवसेना प्रयत्न करणार का, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांचा येत्या आठवड्यात शपथविधी होईल....
नोव्हेंबर 02, 2019
सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे ती सत्ता स्थापन करण्याबाबतची. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या युती पक्षांमध्ये मुख्यमंत्री आमचाच यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे ती शिवसेनेचे राज्यसभा खासदार...
नोव्हेंबर 02, 2019
नाशिक : सध्या राज्यात सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. या राजकीय स्थितीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे विधान केले होते. या विधानाचा खरपूस समाचार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यासंदर्भात पवार यांनी मिश्‍कीलपणे...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : 'भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रपती राजवटीची भाषा करून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. आधी ईडी व आता राष्ट्रपतींना या विषयात आणून ते धमकीची भाषा करत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात सत्तास्थापन करण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे अशी भाषा करणे साफ चुकीचे...
नोव्हेंबर 02, 2019
मुंबई : राष्ट्रपती आमच्या मुठीत आहेत किंवा राष्ट्रपतींच्या सहीशिक्क्याचा रबरी स्टॅम्प राज्यातील ‘भाजप’ कार्यालयातच पडून आहे आणि आमचे राज्य आले नाही तर त्या रबरी शिक्क्याचा वापर करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची आणीबाणी लादू शकतो असा या धमकीचा अर्थ आहे असे जनतेने समजायचे का? राष्ट्रपती राजवटीची...
नोव्हेंबर 01, 2019
सध्या महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा चालू आहे ती सरकार स्थापन करण्याची आणि जागा वाटपाची. मुख्यमंत्री आमचाच यावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून जागा वाटपात मित्रपक्षांमध्ये एकमत होत नाहीय. त्यात शिवसेना नेत्याने केलेल्या एका वक्तव्याने युतीमध्ये अजूनच दरी निर्माण झाली आहे. ''...
एप्रिल 07, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली, तरी नेत्यांचे मनोमिलन अद्याप झालेले नाही. त्यामुळे राज्यातील युतीच्या अनेक जागा "डेंजर झोन'मध्ये असल्याचे सध्याचे चित्र आहे.  लोकसभा निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले आहेत. जागावाटप झाले असले; तरी स्थानिक...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 21, 2017
महापालिकांसमोर आर्थिक संकट; कायदा एक सप्टेंबरपासून लागू करण्याची सूचना मुंबई - वस्तू व सेवाकर अर्थात "जीएसटी' कायद्याने महानगरपालिका आर्थिक कात्रीत सापडण्याची भीती व्यक्त करत विरोधकांनी सरकारला सावधगिरी बाळगण्याचा सल्ला शनिवारी विधिमंडळात दिला. "जीएसटी' कायदा लागू करण्यासाठी विधिमंडळाचे...
एप्रिल 22, 2017
लातूर - लातूर, चंद्रपूर आणि परभणी महानगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत लातूरच्या "देशमुख गढी'ला खिंडार पाडत भाजपने सत्ता हस्तगत केली. तेथे 70 पैकी 36 जागा भाजपने जिंकल्या. 65 वर्षांनंतर भाजप येथे प्रथमच सत्तेवर आला असून, गेल्या निवडणुकीत शून्य संख्याबळ असलेल्या या पक्षापुढे अन्य पक्षांचा सफाया झाला...