एकूण 35 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला...
ऑक्टोबर 15, 2019
डहाणू ः वाढवण बंदर उभारणी, अदानी इन्फास्ट्रक्‍चर्स कंपनीसह औष्णिक वीज प्रकल्प विस्तार करण्यास अडथळा ठरणाऱ्या डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरण बरखास्त करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटी डहाणू, तडियाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : उस्मानाबाद/परंडा - महायुतीची सत्ता आल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि शरद पवारांनाही स्वस्थ बसू देणार नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
परंडा (उस्मानाबाद) : राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारची विमा कंपनी स्थापन करणार असून, विरोधकांनी शेतकऱ्यांच्या सुखाच्या आड येऊ नये, असे मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.  परंडा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रचारार्थ सोमवारी...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
ऑगस्ट 30, 2019
मुंबई: युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचा विरोध असतानाही भाजपने कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने आरे वसाहतीत मेट्रोची कारशेड उभारण्यासाठी वृक्षतोडीचा प्रस्ताव महापालिकेत मंजूर करून घेतला. भाजपच्या या खेळीमुळे धक्का बसलेली शिवसेना न्यायालयात धाव घेणार आहे. राज्याच्या...
ऑगस्ट 30, 2019
सिंधुदुर्गनगरी - वायंगणी-तोंडवळी येथील प्रस्तावित सी-वर्ल्ड प्रकल्प उभारण्याची पुणे येथील ज्या कंपनीने जबाबदारी घेतली होती, ती त्यात अपयशी ठरली. तिने येथील गाशा गुंडाळला आहे, असा दावा करत माझा या प्रकल्पाला विरोध नाही; पण हा प्रकल्प खाजगी व्यक्ती किंवा समूह उभारणार असल्याने जमिनींचे भूसंपादन...
ऑगस्ट 24, 2019
हंगाम कोणताही असला, तरी शेतकरी कायम संकटात असतो. या भयावह वास्तवाची चर्चा सुरू झाली की निवडणुकीचा काळ आला, हे समजायचे. ओलिताखाली येण्यासाठी तडफडणाऱ्या शेतीला सिंचनाची जोड मिळत नाही, हवामानाचा अंदाज नीटसा येत नाही, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांचे हितसंबंध वरपर्यंत गुंतले असल्याने त्यांच्या...
ऑगस्ट 21, 2019
काश्मीर वाचविणे यालाच आमचे सर्वोच्च प्राधान्य : इम्रान खान... उद्धव यांचे बंधूप्रेम ..! राज ठाकरे यांची केली पाठराखण... पारले जी: 10 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट... सेक्रेड गेम्स 2 : गुरुजींचा आश्रम कुठे आहे माहित आहे का?... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ'...
ऑगस्ट 02, 2019
मुंबई : इन्शुरन्स कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे 'इरडा'चे (इन्शुरन्स रेग्युलरीटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) असून, ते त्यांनी करावे. शिवसेनेचे खासदार 'इरडा'च्या अध्यक्षांना भेटून जाब विचारणार आहेत. यावेळी इरडाच्या अध्यक्षांनी जर टाळाटाळ केली तर शिवसेनेचे खासदार अध्यक्षांविरोधात हक्कभंग प्रस्ताव...
जुलै 24, 2019
मुंबई : शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचे पैसे तातडीने मिळालेच पाहिजे, यासाठी प्रभादेवी येथील आयसीआयसीआय लोंबार्ड विमा कंपनीवर शिवसेनेच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.  माहिम विधानसभेचे आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी प्रभादेवी ते टाटा प्रेस येथील आयसीआयसीआय...
जुलै 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्‍कम मिळालीच पाहिजे. यासाठी विमा कंपन्यांनी आणि बॅंकांनी १५ दिवसांत जी काही प्रकरणे आहेत, ती निकाली काढली काढावीत; अन्यथा आम्ही सोळाव्या दिवसापासून शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. राज्यातील...
जुलै 17, 2019
मुंबई : शिवसेना ‘स्टंट’ करते, असे म्हणणारे नालायक आहेत, हे उद्धव ठाकरेंचे विधान राज्यातील लाखो शेतकऱ्यांचा अवमान करणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. एकाच वेळी सरकारमध्ये रहायचे आणि दुसरीकडे विरोधी पक्षात असल्याचा आव आणायचा, अशी शिवसेनेची ‘चित भी...
जुलै 17, 2019
मुंबई : शेतकऱ्यांना हक्क मिळावा म्हणून हा मोर्चा आहे. आमच्या मोर्चाला नौटंकी म्हणणारे नालायक आहेत. आम्ही ज्यांनी पिकविलेले अन्न खात आहे, त्यासाठी आम्ही जागतोय. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या शेतकऱ्यांशी बांधील आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.   पीकविमा कंपन्या या शेतकऱ्यांवर...
जुलै 14, 2019
मुंबई - पीककर्जात शेतकऱ्यांना नाडणाऱ्या विमा कंपन्यांना शिवसेना धडा शिकवणार असल्याचा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्यानंतर आता बुधवार (ता. 17) च्या मोर्चाचे जंगी आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा मोर्चा शिवसेनेचे मुंबईत प्रचंड मोठे शक्‍तिप्रदर्शन व्हावे, यासाठी...
जुलै 12, 2019
सांगली - एकीकडे सत्तेचे लाभ घ्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांविषयी कळवळा व्यक्त करायचा. ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आता सर्वांना कळाली आहे. आता कोणीही फसणार नाही. तुम्हाला खरंच शेतकऱ्यांचा कळवळा आहे तर मग तुम्ही सरकारला जाब का विचारला नाही याचे उत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्यावे, अशी...
जून 26, 2019
मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत शेतात दिसायला...
जून 24, 2019
श्रीरामपूर - शेतकऱ्यांच्या मनातील आग समजावून घेतली नाही, तर ते सत्तेचे आसन जाळून भस्मसात करतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर शिवसेना तो खपवून घेणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावले.  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून येथे...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक...