एकूण 59 परिणाम
जून 24, 2019
"इंडिया मार्ट'ची बहुचर्चित प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 24 ते 26 जून दरम्यान होणार आहे. या इश्‍यूसाठी प्रतिशेअर किंमतपट्टा रु. 970-973 ठरविण्यात आला आहे. किमान 15 व त्यापुढे 15 शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.  प्रश्‍न : इंडिया...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला प्रतिसाद...
मे 21, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेतील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी फोर्ड मोठी नोकर कपात करणार आहे. फोर्ड मोटर्स सात हजार कर्मचाऱ्यांना कमी करणार आहे.  फोर्डच्या जगभरातील एकूण मनुष्यबळाच्या 10 टक्के नोकर कपात करण्यात येणार असून बऱ्याचशा कर्माचाऱ्यांच्या कामाची पुनरर्चना देखील करण्यात येणार आहे. सर्व...
मे 11, 2019
मुंबई : उद्योग जगत आणि मालकी हक्क म्हणजे 'हॅन्ड इन हॅन्ड' जाणारी गोष्ट. एकीकडे छोटमोठ्या कंपनीची मालकी मिळावी म्हणून उद्योग जगतातील कुटुंबात होणारे वाद आपण पहिले आहेत. दुसरीकडे, हिस्सेदारीच्या माध्यमातून चांगली कंपनी विकत घेण्याचा प्रतिस्पर्धी कंपनीचा प्रयत्न असतो. मात्र, कॉर्पोरेट...
मे 08, 2019
मुंबई - अनिल अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स कम्युनिकेशन ही दूरसंपर्क सेवा पुरवठादार कंपनी अखेर दिवाळखोरीत निघाली आहे. बॅंकांनी राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) कंपनीविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे. कंपनीने ३१ बॅंकांचे सुमारे ५०...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 20, 2019
शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-...
एप्रिल 01, 2019
1) मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - ता. 3 ते 5 एप्रिलपर्यंत या इश्‍यूची प्राथमिक बाजारामध्ये विक्री होणार आहे. रु. 1343 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी किंमतपट्टा रु. 877 ते रु. 880 प्रतिशेअर ठरविण्यात आला आहे. 17 शेअरच्या पटीत मागणी अर्ज करता येणार आहे.  2)...
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
मार्च 29, 2019
बंगळूरू: बिग बास्केट ही किराणा माल वितरणातील कंपनी भारतातील युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झाली आहे. बिग बास्केटने 1,000 कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या मूल्यांकनात 140 टक्क्यांची वाढ झाली आहे. अलिबाबा ही चीनची आघाडीची कंपनी बिग बास्केटमधील...
मार्च 29, 2019
रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून (29 मार्च) सुरु झाली आहे. आयपीओसाठी 3 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार आहे. 10 दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरसाठी कंपनीने प्रतिशेअर 17 ते 19 रुपयांचा किंमतपट्टा शेअर केला आहे. शिवाय किरकोळ...
मार्च 29, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या एमएसटीसी लिमिटेडच्या शेअरने गुंतवणूकदारांची निराशा केली आहे. शेअर बाजारात एमएसटीसीच्या शेअरची 115 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीकडून निश्चित करण्यात आलेल्या  120 रुपये या इश्यू प्राइसपेक्षा 7.5 टक्क्यांनी घसरुन शेअरची नोंदणी झाली आहे. नोंदणीच्या...
मार्च 09, 2019
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) अहमदाबाद खंडपीठाने आर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलसाठीच्या 42,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला  मंजुरी  दिली आहे. एस्साल स्टीलचे प्रमोटर्स मित्तल यांच्या प्रस्तावाच्या स्पर्धेत होते. मात्र एनसीएलटीच्या या निर्णयामुळे एल एन मित्तल यांच्यासाठीचा...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिक सेवा क्षेत्रातील आपले कार्यक्षेत्र अधिक विस्तारताना ‘सकाळ मनी’ने आता देशातील आघाडीच्या बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थांशी (एनबीएफसी) संबंध जोडले आहेत. ‘सकाळ मनी’च्या एकाच छताखाली आघाडीच्या बॅंका आणि ‘एनबीएफसी’ यांच्याकडील व्यवसाय कर्ज (बिझनेस लोन) आणि वैयक्तिक कर्ज (पर्सनल लोन)...
फेब्रुवारी 25, 2019
आर्थिकसाक्षर नसणाऱ्या देशातील गुंतवणूकदारांना फसवून व दिशाभूल करून पॉन्झी, भिशी वा तत्सम योजनेच्या आधारे ठेवी गोळा करणाऱ्यांना केंद्र सरकारने लगाम घातला आहे. राष्ट्रपतींनी २२ फेब्रुवारीला अनियंत्रित ठेवी गोळा करणाऱ्या योजनेसंदर्भात एक अध्यादेश जारी करून अशा ठेव योजनांना नियंत्रणात आणले आहे. पॉन्झी...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि एरिक्सन इंडिया वादामध्ये आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी उडी घेतली आहे. पुलवामा हल्ल्यात देशाचे 40 जवान हुतात्मा झाले. त्या जवानांची 40 कुटुंबे आता जीवनाशी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना हुतात्मा दर्जा देखील दिला जात नाही आणि अनिल अंबानी सारख्या...
फेब्रुवारी 21, 2019
मुंबई: आयटी क्षेत्रातील कंपनी असलेल्या टेक महिंद्राने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने 2.05 कोटी कोटी शेअर बायबॅक करण्याचे ठरवले आहे. कंपनीकडून प्रतिशेअर 950 रुपयांप्रमाणे शेअर खरेदी केली जाणार आहे. कंपनी बायबॅकच्या माध्यमातून 1,956 कोटी रुपयांचे शेअर खरेदी...
फेब्रुवारी 20, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत अंबानींना येत्या चार आठवड्यात ४५३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. अन्यथा तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा...
फेब्रुवारी 14, 2019
नवी दिल्ली: रिलायन्स ग्रुप ऑफ कंपनीज्चे सर्वेसर्वा अनिल अंबानी यांची जीवनशैली राजासारखी आहे. त्यांना राफेल डीलसाठी खर्च करायला पैसे आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील आमचे 550  कोटी रुपये दिले नसल्याने त्यांनी न्यायालयाचा देखील अपमान केला आहे. असा युक्तिवाद स्वीडनची टेलिकॉम ...
फेब्रुवारी 08, 2019
मुंबई - दिवाळखोरीत निघालेल्या कंपन्यांना परकी कर्ज घेऊन कर्जफेड करण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने दिवाळखोरीतील कंपन्यांसाठी निधी उभारणीसाठी परकी कर्जाची नियमावली शिथिल केली जाणार असून, या संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात येतील, असे म्हटले आहे. देशभरातील हजारो कंपन्या...