एकूण 376 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निरंतर कोकण कृती समिती मार्फत, कोकणच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. काय अपेक्षा आहेत कोकणवासियांच्या लोकप्रतिनिधींकडून ? कोकणातील साैंदर्य, येथील संस्कृती अबाधित राहावी अशीच जनतेची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने कोकणच्या  जनतेवतीने देण्यात आलेला जाहीरनामा असा...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (बातमीदार) : जून ते ऑक्‍टोबर असा लांबलेला पाऊस परतीच्या वाटेला लागला आहे. वातावरणात अचानक होणारे बदल यामुळे रणरणते ऊन, घाम आणि मध्येच येणारा पाऊस असे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ऑक्‍टोबर महिन्यातील उन्हाचे चटके सुरू झाल्‍याने नागरिकांनी उन्‍हाची काहिली मिटवण्‍यासाठी उसाच्‍या चरख्‍याकडे धाव...
ऑक्टोबर 15, 2019
विक्रमगड ः परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये धुवाधार पावसाचा सामना केलेल्या विक्रमगडमधील नागरिकांना आता ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका बसू लागला आहे.  सायंकाळी वाऱ्यासह पाऊस; तर दुपारी रणरणत्या उन्हाचा सामना करताना नागरिकांचे हाल होत आहेत. वातावरणातील या बदलांमुळे संसर्गजन्य आजारांची...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई - मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवनेरी आणि अश्‍वमेध बसगाड्यांत श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्याचे समजते. बसमधील अस्वच्छता आणि एसीच्या दूषित हवेमुळे प्रवाशांना नाकावर रुमाल बांधून बसावे लागते, असेही सांगण्यात आले.  एसटी...
ऑक्टोबर 15, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे. मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या...
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
ऑक्टोबर 12, 2019
कामठी : नामांकित कंपनीच्या तेलाच्या रिकाम्या डब्यातून निकृष्ट दर्जाच्या खाद्य तेलाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना गुरुवारी रात्री जुनी कामठी पोलिसांनी अटक केली आहे. दिवाळीत खाद्य तेलाची मागणी वाढत असल्याने केवळ नफा कमविण्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी दोन्ही आरोपी खेळ करीत होते. ही कारवाई गुरुवारी...
ऑक्टोबर 12, 2019
पुणे - दिवाळीनिमित्त बाजारात विक्रीसाठी येणारी साडेपाचशे किलो भेसळयुक्त बर्फी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथून जप्त केली. या बर्फीचे नमुने तपासण्यासाठी राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.  निमगाव केतकी येथे महेश भरत फुटाणे यांच्या मालकीच्या शुभम...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : बीएसएनएल बंद करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आल्याच्या वृत्ताने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडवून दिली आहे. आजारपणासाठी असणारी "एमआरएस' योजनासुद्धा बंद होणार असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये पसरली असून निवृत्त कर्मचारीसुद्धा चांगलेच हादरले आहेत. अनेकांनी केंद्रीय आरोग्य योजनेत (सीजीएचएस) नोंदीसाठी...
ऑक्टोबर 07, 2019
मुंबई : दर्जेदार शिक्षण, आरोग्य, सुनियोजित शहर, सुविधायुक्त गावे, पर्यावरण संवर्धन, शेतीला गती, उद्योग यांचा आघाडीच्या शपथनामामध्ये समावेश असून, ग्रामीण मतदाराबरोबरच शहरी मतदारालाही आकर्षित करण्याचा प्रयत्न, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केला आहे. जागा वाटपामध्ये काँग्रेसने 157, राष्ट्रवादीने 117 तर...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
सप्टेंबर 30, 2019
पोलादपूर (बातमीदार) : पोलादपूर तालुक्‍यातील पळचिल या आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यात आली असून अद्याप ती अर्धवट अवस्थेत आहे. या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने उद्‌घाटन होण्यापूर्वीच ती नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन इमारतीमध्ये शेवाळ, झुडपे वाढले असून, सर्प व विंचू,...
सप्टेंबर 29, 2019
सिव्हिलसमोर रास्तारोको : गंभीर जखमींवर उपचार सुरू; वीज कंपनीकडून आपत्ती भरपाई  नाशिक : सिडकोतील शिवपुरी चौकामध्ये घराच्या दुसऱ्या मजल्यासमोरच उच्च वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून सासू-सुनेचा जागीच मृत्यु झाला तर त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत....
सप्टेंबर 25, 2019
उरण : संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना उरण नगरपालिकेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जागोजागी पडलेला कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावरून उरण नगरपालिकेने शहरात स्वच्छतेसंदर्भात केवळ बॅनरबाजी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप...
सप्टेंबर 24, 2019
मोखाडा ः मोखाडा तालुक्‍यातील १३ पाणलोट सचिवांचे २०१६ मध्ये केलेल्या कामाचे मानधन न मिळाल्यामुळे त्यांनी सोमवारपासून (ता.२३) खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.  मोखाडा तालुक्‍यात १३ गावांमधून पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबवण्यात आला आहे; परंतु येथे कार्यरत असलेल्या...
सप्टेंबर 20, 2019
पनवेल : मागील काही महिन्यांपासून मदतनीसांशिवाय शवविच्छेदन करावे लागत असल्याने पालिकेने मदतनीस उपलब्ध करून द्यावेत आणि त्यांचा पगार पालिकेच्या तिजोरीतून द्यावा, या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी नागनाथ यमपल्ले यांनी दिली;...
सप्टेंबर 19, 2019
प्रत्येक आई आपल्या बाळासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते निवडतात. हे काही कोणत्याही संशोधनाच्या आधारे सांगण्याची गरज नाही. आई आपल्या बाळासाठी त्याचा खाऊ, कपडे आणि इतर लागणाऱ्या गोष्टींची निवड अगदी पारखून करत असते. हजारो गोष्टींमधून जे सर्वोत्तम आहे तेच ती कोणतेही तडजोड न करता निवडत असते. जर आपण 10...
सप्टेंबर 19, 2019
नवी मुंबई : पायाभूत सुविधांच्या जुन्याच कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा मुदतवाढ देणे, निविदा न काढता दरपत्रकांवरून साहित्य खरेदी करणे, प्रयोगशाळांचे प्रमाणपत्र न घेता देयके चुकती करणे व कार्यादेश देण्यास विलंब, अशा अनेक आक्षेपांमुळे शहरात सुरू असलेल्या विकासकामांचा दर्जा घसरण्याची दाट शक्‍यता वर्तवली...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : मुंबईतील आरोग्य व्यवस्थेवरील ताण दिवसेंदिवस वाढत असून शहरी भागात 64 हजार लोकांसाठी केवळ एक सार्वजनिक दवाखाना असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. इतकंच नाही तर पालिकेच्या दवाखान्यांमध्ये 19 टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती प्रजा फाउंडेशनच्या वार्षिक अहवालात समोर आल्याने...
सप्टेंबर 11, 2019
टिटवाळा : कल्याण पंचायत समितीच्या जीर्ण झालेल्या इमारतीत कर्मचारी-अधिकारी जीव मुठीत घेऊन काम करतात. या इमारतीच्या जागी नवीन इमारत उभारणे अपेक्षित असताना या इमारतीच्या डागडुजीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे कल्याण तालुक्‍याचा कारभार धोकादायक...