एकूण 153 परिणाम
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍यकतेनुसार बंद...
जून 14, 2019
रत्नागिरी - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. सहाही ठेकेदार कंपन्यांनी या मुदतीत काम पूर्ण न केल्यास कंपन्यांवर कोट्यवधींची अनामत रक्कम जप्त होणे किंवा दंड वसुलीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र एमईपी कंपनीला मार्च २०२० पर्यंत मुदत दिली...
जून 10, 2019
कणकवली - आचरा येथे ओएफसी केबल ब्रेक झाल्याने गेले दोन दिवस कणकवली उपविभागातील सर्व टेलिफोन एक्‍सेंज स्वीच ऑफ आहेत. शहरातील ओएफसी तुटल्याने सर्व लॅण्डलाईन डेड आहेत. चौपदरीकरणात दिलीप बिल्डकॉन कंपनीचा मुजोरपणाचे मोठे नुकसान भारत दुरसंचार निगमसह सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांचे होत आहे. कणकवली व...
जून 09, 2019
मनमाड : सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण कंपनीतर्फे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे दोन दिवसांपासून मनमाड शहरातील अनेक भागात वीज खंडीत करण्यात आल्याने  नागरिक अंधारात आहेत. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फोन नॉटरीचेबल असल्याने संतापात भर पडली. वीज...
जून 03, 2019
दोडामार्ग - वयाच्या साठी ओलांडलेल्या मणेरी पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट कधी करणार, असा सवाल वाहनचालक करत आहेत. महाडमधील सावित्री नदीवर घडली तशी दुर्घटना टाळण्यासाठी तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे, अशी मागणी युवासेनेचे तालुका उपाध्यक्ष भगवान गवस यांनी केली आहे. गोवा आणि महाराष्ट्र...
मे 27, 2019
जळगाव: अमरावती येथून रेडीमेड कपडे घेवून येणाऱ्या ट्रक मध्ये मागे ठेवलेल्या रेडीमेड कपड्याला अचानक आग लागली. ट्रकचालकाने ट्रक तात्काळ रस्त्याच्या कडेला उतरवून ट्रकमधून उड्या मारल्यामुळे ट्रकचालकासह किन्नर हे दोघ बालंबाल बचावले. यावेळी दोन अग्निशामनच्या बंबांनी आग आटोक्‍यात आणली मात्र तो पर्यंत...
मे 20, 2019
मलकापूर (बुलडाणा) : भरधाव कंटेनर व प्रवासी वाहनाची धडक दिल्याने 13 जण ठार झाल्याची झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर मलकापूर नजीक घडली. आज दुपारी तीन सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये टाटा मजिक वाहनातील 13 जण जागीच ठार झाले असल्याची माहिती आहे.   मलकापूर नॅशनल हायवे 6 वर रसोय...
मे 17, 2019
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणातील विविध प्रश्‍नांबाबत असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या संतापाचा उद्रेक झाला. शहर आणि तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बनगोसावी आणि उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना धारेवर धरले. जमावाने शेडेकरांना धक्काबुक्की...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 14, 2019
चिपळूण - भरणेनाका येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्राथमिक अवस्थेत आहे; मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे भरणेनाका ग्रामपंचायतीला लाखोचा भुर्दंड बसला आहे.  pic.twitter.com/w4BVUVO3mV — sakal kolhapur (@kolhapursakal) May 13, 2019 दहा हजार लोकवस्ती असलेल्या भरणे व भरणेनाका...
मे 11, 2019
जळगाव : तरसोद ते फागणेपर्यंतच्या टप्प्यातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम अंशतः सुरू करण्यात आले आहे. सुमारे शंभर मजूर या कामावर तूर्त काम करीत आहेत. संबंधित कंपनीच्या कंत्राटदाराचे "फायनान्शिअल क्‍लोजर' बाकी होते. ते आता पूर्ण झाले असून, त्यास काम सुरू करण्याचे आदेशही महामार्ग प्राधिकरणाने दिले आहेत...
मे 10, 2019
रत्नागिरी - कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करुन त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यात या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर...
मे 06, 2019
पुणे - यंदा तीव्र उन्हाळा जाणवत असल्याने सर्वत्र पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लॉ कॉलेज परिसर, गोखलेनगर, जनवाडी, पौड रस्ता, वारजे पठार, बावधन बुद्रुक, भूगाव व शिवण्यातील देशमुखवाडी, राहुलनगर, धायरी, नऱ्हे भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर कर्वेनगर, सिंहगड रस्ता, जनता वसाहत भागातील परिस्थिती...
मे 03, 2019
उंब्रज (ता. कराड) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर तासवडे टोलनाका येथे ऑक्सिजन टँकरला वॉल्व्ह लिक झाल्याने गळती झाली आहे. सदरची घटना सकाळी 10 वाजच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरील माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा लेनवर कोल्हापूर...
एप्रिल 27, 2019
जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या महामार्ग चौपदरीकरणातील फागणे ते तरसोद टप्प्यातील कामाच्या भवितव्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन-तीनवेळा निविदा प्रक्रिया झाल्यानंतर कार्यादेश देऊन सुरू झालेले हे काम मक्तेदाराकडील निधीअभावी बंद पडले, ते सुरू झालेच नाही. आता निवडणुकीची आचारसंहिता...
एप्रिल 21, 2019
सोलापूर : राज्यात जानेवारी ते 17 एप्रिल या कालावधीत तब्बल 30 लाख 16 हजार 209 वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम मोडले असून, त्यांच्याकडून 69 कोटी 66 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. राज्यात दरवर्षी सरासरी सव्वा कोटी वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे रस्ते अपघात व मृत्यूचे प्रमाण वाढत आहे...
मार्च 31, 2019
रत्नागिरी - सत्तेचा स्वार्थासाठी गेली पाच वर्षे शिवसेना भाजपशी भांडत राहीली, जनतेची दिशाभूल करत राहीली. कोणतीही विकास कामे केली नाहीत, कोणताही प्रकल्प आणला नसल्याने लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी ते आपसात भांडत होते. जशी निवडणूक जाहीर झाली, तशी त्यांनी युती केली आणि गळ्यात गळे घालून फिरुन चांगले...
मार्च 31, 2019
कणकवली - मुंबई - गोवा महामार्गावर पावलो ट्रॅव्हल्स कंपनीच्या वातानुकूलित लक्झरी बसला आग लागली. सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर घडलेल्या या घटनेत  बस जळून खाक झाली आहे.  ही दुर्घटना मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.  आगीची घटना समजताच घटनास्थळी कुडाळ येथून अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. ...
मार्च 14, 2019
जळगाव : समांतर रस्त्यांसाठी आंदोलन झाल्यानंतर मंजुरी मिळालेल्या शहरातील महामार्ग चौपदरीकरणाची निविदा प्रक्रिया मार्गी लागली असली तरी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच या कामास मुहूर्त लागणार आहे. दरम्यान, चौपदरीकरणाच्या कामासाठी प्राप्त निविदांचा "खेळ' अजून सुरूच असून आता या निविदा...
फेब्रुवारी 11, 2019
कणकवली -  महामार्गाच्या चौपदरीकरणात गडनदी पुलापासून ओसरगावपर्यंतच्या वागदे गावातील 74 खातेदारांना भूसंपादन आणि मोबदल्याबाबत नोटीसा मिळेपर्यंत तेथील चौपदरीकरणाचे काम थांबवावे, असा निर्णय आजच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. प्रांताधिकारी निता शिंदे यांच्या दालनात आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली...