एकूण 323 परिणाम
जून 26, 2019
मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा आहे....जनतेचा विश्वास मिळवणे हेच शिवसेनेचे वैशिष्ट्य असून निवडणुका होतील तेव्हा होतील पण मला प्रत्येक मंत्री,आमदार,संपर्क प्रमुख,जिल्हा प्रमुख हा शेतकाऱ्यांसोबत शेतात दिसायला...
जून 25, 2019
उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत....
जून 24, 2019
श्रीरामपूर - शेतकऱ्यांच्या मनातील आग समजावून घेतली नाही, तर ते सत्तेचे आसन जाळून भस्मसात करतील, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिला. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर शिवसेना तो खपवून घेणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावले.  शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नातून येथे...
जून 23, 2019
मुंबई : पीक विमा कंपन्या मागील 5 वर्षांपासून शेतकऱ्यांची लूट आणि फसवणूक करत असताना शिवसेनेला कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर मुंबईतील पीक...
जून 23, 2019
अहमदनगर : मुख्यमंत्रिपदावर कोण असेल, या प्रश्नापेक्षा मला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे महत्त्वाचे वाटते. त्यासाठी माझे प्राधान्य आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (रविवार) स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील, असेही ते म्हणाले.  श्रीरामपूर...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 19, 2019
मुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून...
जून 19, 2019
मुंबई - शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, अशा घोषणा देत काँग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांच्या आमदारांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी विधानभवन परिसर दणाणून सोडला. आर्थिक पाहणी अहवालातले आकडे बोगस आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री...
जून 18, 2019
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (ता. १८) विधिमंडळात सादर करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकारकडून कृषी, सिंचन यावर भर देत अनेक लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या.  विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत...
जून 15, 2019
मुंबई - राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर झाला असला, तरी अनेक शेतकरी पीकविमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शिवसेनेकडून 19 जून या पक्षाच्या वर्धापन दिनापासून 34 जिल्ह्यांत तालुका स्तरावर प्रत्येकी एक पीकविमा योजना मदत केंद्र उभारण्यात येईल, असा निर्णय शुक्रवारी...
जून 14, 2019
मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराची चिंता सोडा, आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना आणि जिल्हा प्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. १६ जून रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला जात असून, या दौऱ्याच्या आधी घेतलेल्या आजच्या बैठकीत त्यांनी...
जून 13, 2019
औरंगाबाद - सरकारने दुष्काळ जाहीर केला तरीही शेतकऱ्यांना पीकविम्याचा परतावा मिळाला नाही. दुष्काळामुळे खरे तर परतावा देऊन विमा कंपन्या कंगाल व्हायला हव्या होत्या, पण त्या नफ्यात राहिल्या. त्यामुळे ही ‘प्रधानमंत्री पीक बीमा योजना’ नव्हे तर ती ‘प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना’ असल्याची...
जून 12, 2019
मुंबई - महापालिका क्षेत्रात वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपन्यांवर महापालिकांकडून मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. मात्र खासगी कंपन्या हाच कर छुप्या पद्धतीने ग्राहकांकडून वसूल करत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. त्यामुळे ग्राहकांची...
जून 11, 2019
पुणे - बारामती लोकसभा मतदारसंघातील गावांमधील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी धरणांतील उपलब्ध पाणी, विद्यमान पाणी योजना, विंधन विहिरी आणि तलावांमधील पाणीसाठ्यांचे योग्य नियोजन करावे, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली.  जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र मोहिते...
जून 10, 2019
जालना -  राज्यात पीकविमा योजनेसाठी नियुक्त केलेल्या विमा कंपन्यांनी गावात फिरून शेतकऱ्यांकडून हप्ते गोळा केले. मात्र, हजारो शेतकऱ्यांना भरपाईपोटी विमा रक्कम मिळाली नसल्याच्या तक्रारी आहेत. शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या विमा कंपन्यांना आता सरळ करणार असल्याचा इशारा...
जून 07, 2019
मुंबई - गंगाखेड शुगर अँड एनर्जी कंपनीच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी मुंबई व परभणी येथील १० ठिकाणी शोधमोहीम राबवली. याप्रकरणी ईडीने विशेष तपास पथक स्थापन केले आहे. गंगाखेड शुगर अँड एनर्जी प्रा. लि. कर्ज गैरव्यवहारप्रकरणी अध्यक्ष रत्नाकर गुट्टे व इतरांविरोधात...
जून 02, 2019
लातूर : स्वयंमूल्य निर्धारण अहवालावर "बी' पॉझिटिव्ह लिहिलेला शेरा रद्द करून "ए' पॉझिटिव्ह करण्यासाठी व्हिस्की, बीअरची लाच मागणाऱ्या निवळी (ता. लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. डॉ. भालचंद्र हरिहर चाकूरकर (वय 43) असे या...
मे 31, 2019
कोयनानगर - कोयना धरणात केवळ दहा टक्केच पाणीसाठा राहिल्याने पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानुसार वीजनिर्मिती बंद करण्यात आली आहे.  दरम्यान, यामुळे चिपळूण व दाभोळ परिसरात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच वीजनिर्मितीचे तीन टप्पे कमी दाबाने सुरू आहेत. मात्र त्यातून १२० मेगावॉट इतकी...
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...