एकूण 39 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
गंगापूर (जि.औरंगाबाद) - शहरातील तीन उच्चशिक्षित बेरोजगार तरुण वर्गमित्रांनी गावातच रोजगार शोधला आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत त्यांनी तीन वेगवेगळे ऍप तयार करून घेतले असून, "व्हेनडेली' नावाने घरपोच अन्नपदार्थ पुरविण्याची सेवा सुरू केली आहे. तरुणांच्या या संकल्पनेला...
सप्टेंबर 11, 2019
अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या रेपाळा (जि. जालना)  येथील रामेश्‍वर सपकाळ या उमद्या तरुणाने न खचता, जिद्दीने बारा वर्षांपासून दुग्धव्यसाय टिकवून धरला आहे. अलीकडील काळात भले नुकसान सहन करावे लागत आहे, मात्र प्रतिकूलतेतही नऊ जनावरांचा सांभाळ, दररोज ४५ ते ५० लिटर दूध संकलन व थेट...
ऑगस्ट 27, 2019
मेढा  : वीज म्हटलं की खरं तर अंगावर काटा उभा राहतो. मग ती आकाशात कडाडणारी असो वा आपल्या रोजच्या वापरातील. सर्वसामान्य नागरिक विजेच्या खांबाखाली उभे राहतानाही घाबरतो. पण, विजेच्या खांबावर चढून काम करणारी तरुणी पाहिली की तोंडात बोट तर जाईलच, पण तिची जिद्द व तिचा धाडसीपणा पाहून नक्कीच सलाम करावा, अशी...
जुलै 31, 2019
सातारा : गेली 48 वर्षे सातारा शहरात सुरू असलेला हा मदतीचा ज्ञानयज्ञ अतिशय मोलाचा आहे. रा. ना. गोडबोले ट्रस्ट व त्यातून मिळणारी मदत तुमच्या ध्येयाला साकार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. मीही या ट्रस्टद्वारे 80 च्या दशकात पाचवी ते दहावीपर्यंत मदत घेतली आहे. ते दिवस आम्ही विसरणार नाही. एकाग्रता,...
मे 14, 2019
टाकळी हाजी - नथानी कुटुंबाच्या पुढाकारातून कवठे येमाई (ता. शिरूर) येथील हिलाळ वस्तीवर राहणाऱ्या १५ आदिवासी कुटुंबांना रेलफोर कंपनीमार्फत स्लॅबची मोफत घरे बांधून देण्यात आली. दरम्यान, शिरूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात मोठ्या प्रमाणात भिल्ल व आदिवासी समाज झोपड्या करून राहतात. कवठे येमाई येथे हिलाळ...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 22, 2019
पुणे -  रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये (आयसीयू) मुलावर उपचार सुरू होते. शेतीत काबाडकष्ट करणारे त्याचे वडील रुग्णालयात मुलगा केव्हा बरा होईल, हा विचार करीत बसले होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खुर्चीजवळच भरपूर नोटा पडलेल्या दिसल्या. क्षणभरही मन विचलित होऊ न देता त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ही...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.  तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम मिळाल्याने...
नोव्हेंबर 01, 2018
जळगाव  - जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत १,८४२ शाळांपैकी सुमारे २१२ शाळा डिजिटल शिक्षणासंबंधी कार्यरत झाल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुमारे ५० लाखांवर खर्च झाला आहे. डिजिटल शिक्षणासंबंधी शाळांमध्ये कार्यवाही सुरू आहे. परंतु, या शाळांना वीजजोडणीची गरज आहे. मागील तीन वर्षांपासून डिजिटल...
ऑगस्ट 28, 2018
पिंपरी - निळा गणवेश आणि बादलीबरोबरच तिच्या केसांच्या जटा हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले होते. मात्र, त्या कापल्यास आपल्याला किंवा आपल्या परिवारास अपाय होण्याच्या अंधविश्वासावर मात करून तिने अखेर जटा कापल्या. हाजा दत्ता देढे असे या कचरावेचक महिलेचे नाव. तिने केलेले धाडस हा सर्वांच्याच...
जुलै 03, 2018
सातारा - तरुण वडिलांना ‘टाइप वन डायबेटी’स... कुटुंबिक आर्थिक दारिद्य्राने ग्रासलेले... त्यातच अवघ्या दीड वर्षाच्या मुलीला मधुमेह जडला... एकावरच खर्च करणे परवडत नाही... अशीच थोडीफार अवस्था असलेल्या पाच मुलांसाठी साताऱ्यातील एक डॉक्‍टर ‘इन्सुलिन’ बनला आहे. एवढेच नव्हे, तर तब्बल दहा वर्षांपासून १२०...
जून 14, 2018
गंगापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कनकोरी (ता. गंगापूर) येथील कृष्णा रावसाहेब पवार या तरुणाने उद्योगभरारी घेतली आहे. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या दुर्धर आजारामुळे वडिलोपार्जित एक एकर जमीन विकावी लागली. त्यातच १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले. आईने दु:ख गिळून मोलमजुरी करून...
मे 02, 2018
कळंबोली - अनेक वर्षांपासून पनवेल परिसरात विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारे आणि रोटरी क्‍लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात रमणारे सुरेश शेडगे यांनी लग्नाच्या २० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहपरिवार मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदान संकल्पनेतून प्रेरणा...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात रोज शेकडो गरजू रुग्ण येतात. त्यांच्यासोबत असलेल्या नातलगांना बऱ्याचदा उपाशीपोटी झोपावे लागते. प्रसंगी ॲडमिट नसलेल्या रुग्णांनाही पैशाअभावी दिवसभर उपाशी राहावे लागते. त्यांच्या सोयीसाठी सकल जैन समाज, भगवान महावीर जन्मकल्याणक समिती आणि जैन ॲलर्ट ग्रुपतर्फे आता वर्षभर...
फेब्रुवारी 28, 2018
सांगली - तिच्या आई-वडिलांनी चार घरची धुणी-भांडी करून जगण्यासाठी संघर्ष केला. माझी चारही मुले शिकवणारच, असा ध्यास माऊलीने धरला. पत्र्याच्या खोलीत सात जणांच्या कुटुंबाने उभी हयात घालवली. थोरल्या म्हणजे...निशा मोरे हिने या परिश्रमाचे चीज केले. ती सी.एस. (कंपनी सेक्रेटरी) परीक्षेत यशस्वी...
फेब्रुवारी 21, 2018
सातारा - आपल्या रोजच्या गरजेपैकी 70 ते 80 टक्के विजेची निर्मिती आपल्याला छतावर करता येते. त्यातून विजेच्या बचतीबरोबरच पैशांची बचतही होते. उन्हामुळे इमारत गरम होऊन भोवतालचे वाढणारे तापमान रोखण्यात मदत मिळते. ऊर्जेबाबत स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणाऱ्या देवी चौकातील एका इमारतीमुळे गेल्या दोन वर्षांत...
जानेवारी 24, 2018
नाशिक  - विदर्भातील दुष्काळ अन्‌ रोजगाराची संधी नसल्याने अंबादास रोठेंनी नाशिक गाठले. बांधकामावर वॉचमन म्हणून राहायची सोय झाल्यावर त्यांनी अकोल्याहून बिऱ्हाड इथेच आणले. सगळ्यात धाकट्या नीलेशने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कंपाउंडर म्हणून कामाला सुरवात केली. शिक्षणाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे डॉक्‍...
जानेवारी 09, 2018
धुळे - घरात अठरा विश्‍वे दारिद्र्य...भूमिहीन शेतमजुराच्या घरातील सात बहिणींचा एकुलता भाऊ...खर्च पेलवणार नाही म्हणून शिक्षणाला तिलांजली देत मजुरी करणाऱ्या बहिणी, आईवडील त्याला शिक्षणासाठी पैसा कमी पडू देत नाहीत...या स्थितीची तो जाणीव ठेवत मास्टर ऑफ कॉम्प्युटरची पदवी घेतो आणि वार्षिक ४० लाखांचा पगार...
डिसेंबर 09, 2017
ऑनलाइनच्या जमान्यात कोणी ‘ऑफलाइन’ व्यवसाय सुरू करण्याचे ठरविल्यास स्वाभाविकच तुमच्या मनात काही प्रश्‍न निर्माण होतील. मात्र, ‘प्रवाहाविरुद्ध’ जाण्याचे धाडस दीप्ती आचार्य या तरुणीने दाखविले आहे. लहान मुलींसाठी ‘डिझायनर कपडे’ तयार करण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला असून, स्वतःचा वेगळा ब्रॅंड निर्माण...
नोव्हेंबर 09, 2017
रत्नागिरी - नवनिर्मितीचा ध्यास, काम करण्याची जिद्द आणि चिकाटीमुळे केवळ स्वतःच्या  कल्पनाशक्तीच्या जोरावर लाकडावर कोरीव कामात विविध संकल्पना साधणारा कुर्णे (ता. लांजा) येथील रुपेश पांचाळ पुरातन मंदिरांना झळाळी आणणारा कलाकार ठरतो आहे. पावस, आडीवरे, कशेळी येथील मंदिरांसह ११ मंदिरांना त्याने नवा ‘लुक‘...