एकूण 36 परिणाम
मे 15, 2019
कोल्हापूरजवळील उजळाईवाडीच्या माळावरचा विमानतळ एरवी शांत-निवांत असतो. रविवारी (ता. 12) या विमानतळावर भल्या सकाळपासून लगबग सुरू होती. ढोलताशांच्या गजरात, लेझीमच्या ठेक्‍यावर ताल धरलेल्या शालेय विद्यार्थिनी पाहुण्यांचे स्वागत करत होत्या. भगवे फेटे बांधलेले कर्मचारी, रंगीबेरंगी नऊवारी...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
डिसेंबर 19, 2018
प्रिय मित्र मा. उधोजीसाहेब, शतप्रतिशत प्रणाम. दिवसभर कामाच्या धामधुमीत होतो. त्यामुळे फोन करायला वेळ झाला नाही. पण तुम्हाला किमान साताठ वेळा उचकी लागली असेल!! कारण तुमची चिक्‍कार वेळा आठवण आली. परवा कोस्टल रोडच्या भूमिपूजनाच्या (तुम्ही परस्पर उरकून घेतलेल्या) कार्यक्रमाला आम्हाला बोलावणे नव्हते. पण...
नोव्हेंबर 28, 2018
बांगलादेशातील आगामी निवडणूक जिंकून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांची अवामी लीग विजयाची हॅटट्रिक करेल अशी चर्चा आहे. पण ‘बीएनपी’ने विरोधी पक्षांची आघाडी उभारून आव्हान दिल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. दु सऱ्या महायुद्धानंतर आशियात निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आज दक्षिण आशियातील जवळजवळ सर्व...
नोव्हेंबर 23, 2018
दहशतवादी घटना ही निव्वळ कायदा-सुव्यवस्थेची बाब नसते, तर तिला आंतरराष्ट्रीय, तसेच देशांतर्गत राजकीय, धार्मिक संदर्भ असतात. पंजाबमधील ताज्या ग्रेनेड हल्ल्यातून हीच बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे. अ मृतसरच्या राजासांसी विमानतळाजवळच्या अडलीवाल गावामधील निरंकारी भवनातील संगत (धार्मिक मेळावा)...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...
नोव्हेंबर 06, 2018
अमेरिका व चीन यांच्यातील व्यापारसंघर्षाची पाकिस्तान ही आणखी एक रणभूमी होत असल्याचे दिसते. या संघर्षात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक भूमिका घेत आहेत आणि चीनला नमविण्यासाठी पाकिस्तानचा प्याद्यासारखा वापर करण्यासही ते मागेपुढे पाहणार नाहीत. प्र स्थापित सरकारच्या विरोधात आंदोलन करताना खुशाल...
ऑक्टोबर 25, 2018
पर्यावरणाची हानी टाळून आर्थिक विकासही अबाधित राखायचा असेल, तर पर्यावरणपूरक ऊर्जेचे पर्याय विकसित करून ते परवडतील अशा दरात उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य ठरते. या अनुषंगाने शाश्‍वत विकासात सौरऊर्जेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प र्यावरणीय प्रदूषण व जागतिक हवामान बदलाच्या धोक्‍याची घंटा सतत वाजत असताना...
सप्टेंबर 13, 2018
विघ्नहर्त्याचा उत्सव आजपासून सुरू होत असून, सध्या भेडसावत असलेल्या अनेक विघ्नांचे निर्दालन बाप्पा करतील, अशीच तमाम भाविकांची भावना असणार, यात शंका नाही; पण या उत्सवाला काही बाबतीत लागलेले अनिष्ट वळण दूर करण्यासाठी त्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज आहे. श्रीगणेश चतुर्थी यंदा बाप्पाला थेट विमानाने...
सप्टेंबर 11, 2018
बेटा : (प्रवासी ब्याग खाली ठेवत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयॅम बॅक!! स्ट्रेट फ्रॉम कैलासा!! मम्मामॅडम : (प्रेमभराने) दमला असशील ना? शाब्बास!! आपल्या खानदानात कुणीही नाही केलं, ते तू करुन दाखवलंस!! शंभू महादेव तुला चांगलं यश देवो!! कशी झाली तुझी यात्रा? बेटा : (अभिमानाने) मस्त! एवढा मी आयुष्यात चाललो नाही...
ऑगस्ट 24, 2018
राज्यांचा महसुली जमा-खर्च शिलकीचा असावा, निदान तो समतोल असावा, अशी अपेक्षा अनाठायी नाही. पण प्रत्यक्षात वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्या, वाढते खर्च, वाढते कर्ज, उत्पन्नाचे कुंठित मार्ग, वाढते आर्थिक परावलंबन हे नित्याचे होणे ही चिंतेची बाब आहे. पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने विधानसभेत ११ हजार ४४५...
ऑगस्ट 17, 2018
हिंदुत्व किंवा भारतीयता म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग - न्यायालयाने केलेले हे वर्णन मूर्तिमंत जगणारे कालजयी नेतृत्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी. संकुचितता, सांप्रदायिकता हे शब्द त्यांच्या मनाजवळ कधीही घुटमळले नाहीत. "वसुधैव कुटुंबकम', जगातले सर्व विचार, सर्व वारे माझ्या घरात खेळू देत म्हणणारी भारतीय...
ऑगस्ट 17, 2018
अजित वाडेकरविषयी कर्णधार, फलंदाज, पदाधिकारी आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यक्ती म्हणून खूप काही बोलावेसे वाटते. त्याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमध्ये आपल्या संघाने कसोटी मालिका जिंकून पराक्रम केला. विजयी संघाचे मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून "सीसीआय'पर्यंत उघड्या मोटारीतून मिरवणूक...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज.उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेंव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
ऑगस्ट 06, 2018
प्रिय मित्र उधोजीसाहेब यांसी, जागतिक मैत्री दिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. फारा दिवसांत आपली गाठभेट नाही. अर्थात दोन जीवलग मित्र रोज भेटले नाहीत, तरी ते शेवटी मित्रच असतात. मनाने ते एकमेकांसोबत आणि एकमेकांसाठीच जगत असतात. आपले असेच आहे की नाही? आजच्या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने थेट "मातोश्री'...
जुलै 26, 2018
विषुववृत्ताच्या थोडेसे दक्षिणेला मध्यपूर्व आफ्रिकेचा दौरा आम्ही काढला तोच मुळी विस्मयाने. युगांडा, टांझानिया, बुरुंडी आणि कांगोच्यामध्ये एक रवांडा नावाचा देशदेखील आहे, हे आम्हाला माहीतच नव्हते. रवांडा? ते "खांडा' असे असावे, असे आम्हाला वाटत होते. पण र-वां-डा असेच निघाले. मनाला वैषम्य वाटले. तब्बल...
जुलै 12, 2018
माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शिक्षा झाल्याने पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी त्यांच्या पक्षाला कमकुवत करण्याचे षडयंत्र यशस्वी ठरले आहे. तेथील निवडणुकीत लष्कराची भूमिका नेहमीच कळीची राहिली आहे. या वेळीही त्याचा प्रत्यय येत आहे. पा किस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ येत्या शुक्रवारी...
जून 23, 2018
अनेक राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून हजारो कोटींची कर्जे घेऊन विजय मल्ल्या इंग्लंडला पळून गेला. सतरा बॅंकांची नऊ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम त्याने बुडवलेली आहे. प्राप्तिकर खाते, केंद्रीय अन्वेषण विभाग, सक्तवसुली संचालनालय त्याच्या मागावर असून, मल्ल्याला परत आणण्याची पराकाष्ठा करताहेत. हिरे व्यापारी नीरव...
जून 11, 2018
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (एकशे आठ वेळा लिहिणे) एकही बदली न करता परदेश दौऱ्यावर सटकण्याची ही माझी चार वर्षांतली पहिलीच खेप असावी! निघताना सटासट हातासरशी डझनभर बदल्या करून घ्याव्यात असे वाटले होते. पण आता बदल्या उरल्याच नाहीत, असे पीएने सांगितल्याने नाइलाज झाला. मुंबईचा पाऊस वैताग आणतो. हवामान...
मे 12, 2018
...जनकपूरच्या विमानतळावर टूरिस्ट उतरला. जनकपूर हे नेपाळमध्ये येते. तिथे विमानतळ आहे की नाही, ते आम्हाला माहीत नाही. पण आमचा टूरिस्ट मात्र विमानतळावरच उतरला हे शतप्रतिशत सत्य आहे...बऱ्याच दिवसांनी परदेशात पाऊल ठेवल्याचा आनंद त्या टूरिस्टाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नेपाळ! जगातील...